aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

मराठमोळ्या माधुरी दीक्षित ची बहीण पहा किती सुंदर दिसते

बॉलीवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित आजही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिने बरेच सुपरहिट चित्रपट केले. तिचा अभिनय, तिची नृत्यशैली ही अप्रतिम आहे. तिने जीवनात मेहनत करून खूप यश कमावले आहे. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो इथे आपण माधुरी बद्दल नाही तर

तिची बहीण रूपा दीक्षित हिच्याबद्दल बोलणार आहोत. रूपा ही बॉलीवूडपासून खूप दूर आहे. तिला चित्रपट आणि लाईमलाईट असलं काही सुद्धा आवडत नाही. नुकत्याच त्या दोघींना मुंबईमध्ये एकत्र पाहिलं गेलं. माधुरीने त्या दोघींचा शाळेत असतानाचा फोटोसुद्धा शेअर केला. तो फोटो एक नृत्य स्पर्धेचा आहे. त्यात त्या

दोघीही आहेत आणि ओळखू पण येत नाहीयेत की, माधुरी कोण आहे कारण त्यांचे चेहरे बरेच मिळते जुळते आहेत. त्या फोटोला पोस्ट करताना तिने लिहिले आहे की, ‘तो फोटो माझ्या सगळ्यात आवडीचा फोटो आहे ज्यात माझी बहिण आहे. आम्ही शाळेत असताना नृत्य स्पर्धेमध्ये एकत्र भाग घ्यायचो’. तिच्या काही चाहत्यांनी

त्या पोस्टवर कंमेंट देखील केल्या आहेत की तुम्ही मागे आहेत. तर एकाने अस लिहिलं आहे की तुम्ही उजव्या बाजूला ज्या आहेत ते आहे. कोरोनामुळे माधुरी दीक्षित ही घरातच राहत आहे. ती घरात राहून शास्त्रीय नृत्य शिकत आहे. माधुरीने असाच एक विडिओ तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे. ज्यात माधुरी शास्त्रीय नृत्य करत आहे आणि तिचा मुलगा तबला वाजवत आहे.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *