या अभिनेत्रीने अक्षय कुमारला रातोरात बनवले स्टार

रविना टंडन, रेखा, शिल्पा शेट्टी आणि आयशा जुलका सारख्या अभिनेत्रींना डेट करून अक्षय कुमारने ट्विंकल खन्ना बरोबर लग्न केले. परंतु यासगळ्या अभिनेत्र्यांऐवजी अजून एक अभिनेत्री आहे जिने अक्षयला बॉलीवूडमध्ये प्रवेश दिला. एवढंच नाही तर या अभिनेत्रीबरोबरच अक्षय कुमारच नातं देखील चर्चेत आलं होतं.

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण इथे बोलत आहोत तिचे नाव पूजा बत्रा आहे. जिने अक्षयला एक स्टार बनायला मदत केली. पूजा बत्राने १७ वर्षांची असताना मॉडेलिंग चालू केले होते. १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा पुरस्कार तिने तिच्या वयाच्या १८ वर्षी प्राप्त केला. ‘विराट’ या चित्रपटामधून पूजाने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

पूजा बत्राने ‘हसीना मान जायेगी, कह नहीं प्यार नहीं, जोड़ी नंबर 1, नायक, परवाना, इत्तेफाक, हम तुम शबाना, भाई, साजिश और चंद्रलेखा’ या चित्रपटात काम केले आहे. मॉडेलिंगच्या वेळी ती पहिल्यांदाच अक्षय कुमारला भेटली होती. याच कारणामुळे ती बॉलीवूड पार्ट्यांमध्ये सामील असायची. अक्षय कुमार हे पूजाच्या बरोबर एक पार्टीमध्ये जात होते.

पूजाने अक्षयला खूप साऱ्या निर्माता आणि दिग्दर्शकांची भेट करून दिली होती. परंतु नंतर अक्षय कुमार जसे त्यांच्या करिअरमध्ये पुढे गेले जेवढं यश मिळवलं तेवढं पूजा नाही मिळवू शकली. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती बॉलीवूड पासून लांब गेली. २००३ मध्ये अचानक एक बातमी आली की तिने

एनआरआय डॉक्टर सोनू एस अहलुवलिया बरोबर लग्न केले . परंतु ९ वर्षांनी तिचा घटस्फोट झाला आणि नंतर तिने बॉलीवूडमध्ये खलनायकाची भूमिका करणारे नवाब शाह यांच्याबरोबर लग्न केले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *