काजोल च्या बेस्ट फ्रेंडशी अजूनही नाही बोल्त अजय देवगण

काजोल आणि अजय देवगण यांची बॉलीवूडमधली सगळ्यात चांगली जोडी आहे. त्या दोघांचे लग्न होऊन आता २० वर्षे झाली. दोघेही खूप वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करत आहेत. लग्नाला एवढे वर्षे होऊन गेले पण दोघांच्या नात्यामधला गोडवा अजूनही तसाच आहे. दोघांचे स्वभाव एकमेकांच्या बिलकुल विरुद्ध आहेत.

अजय हा लाजाळू आणि शांत तर काजोल ही बोलायला लागली की कधी बोलायचं थांबेल अस वाटत समोरच्याला. काजोल काही वेळेस आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलली असेल पण अजय कधीही नाही बोलत. परंतु अजयने आता एक गोष्ट अशी समोर आणली आहे जी ऐकून आणि वाचून तुम्ही चकित व्हाल.

अजयने सांगितले की त्याला काजोल मध्ये काय आवडते आणि ती का आवडते. अजय म्हणाले की काजोल ही खूप बोलते. ही त्या गोष्टीमधली एक आहे ज्यांनी मला खूप त्रास दिलाय मग ते चित्रपटाच्या सेटवर असो किंवा घरी. तुम्ही तिला कितीही शांत आहे असं म्हणालात तरी ती शांत नाही बसत. याच गोष्टीमुळे मी तिला खूप चिडवतो आणि तिची गंमत करत असतो.

जेव्हा ती शांत बसते तेव्हा मला तिची आठवण येते. मला असं वाटत की तिने तिचा स्वतःचा स्वभाव माझ्यासाठी बदलू नये, तिने जसे आहे तसेच राहावे आणि मला त्रास द्यावा. ती एक चांगल्या अभिनेत्रीबरोबरच एक चांगली बायकोही आहे. मी तिच्याबरोबर काम करायला नेहमी खुश असतो आणि असेल.

आत्ताच आलेल्या तानाजी या चित्रपटात आपण त्या दोघांना पाहिले. यामध्ये अजय हे तानाजी मालुसरे तर काजोल ही त्यांची पत्नी होती. हा चित्रपट खूप सुपरहिट झाला.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *