अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती.
खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवनीत राणा यांनी फेसबूकवर पोस्ट करत माहिती दिली की, माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते.
महाराष्ट्राच्या या सुंदर महिला खासदार ला झाला कोरोना
