वायरल डान्स मधली मुलगी आहे पुण्याची पहा

पुण्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली असताना पुण्यातील एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पुण्यातील आंबेगाव पठार येथील मोहननगर भागात राहणाऱ्या सलोनी सातपुते हिचा कोरोनाबाधित बहिणीची घरवापसी झाल्यानंतर रस्त्यावर उतरवून डिजे लावून केलेला भन्नाट डान्स हा सोशल मीडियावरचा चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये सलोनी ही ‘टाय टाय फिश…’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

मात्र, सलोली इतका भन्नाट डान्स नेमकं कोणासाठी करतेय, याचं कोड अनेकांना पडलं असेलच. तिच्या या व्हायरल व्हिडिओमागील रिअल कहाणी आम्ही आपल्यासाठी घेवून आलो आहे.पुण्याच्या स्वामी समर्थ भागात राहणाऱ्या सलोनीचे आई-वडील, आजी-आजोबा आणि बहीण अर्थात घरातील सगळेच कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकटी सलोनी कोरोना निगेटिव्ह आहे. त्यामुळे ती घरी आहे. सलोनीची बहीण कोरोनावर मात करून घरी आली तेव्हा तिनं आपल्या बहिणीचं दणक्यात स्वागत केलं. ‘टाय टाय फिश…’ या गाण्यावर डान्स करतच तिनं आपल्या बहिणीला कॉलनीच्या गेटपासून घरापर्यंत आणलं. सलोनीचं हे स्पिरिट पाहून बहीणही नाचात सहभागी झाली आणि मास्क घालूनच ती पण थिरकली आणि हाच डान्स व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घरातील सगळेच कोरोनाबाधित झाल्याने परिसरातील लोकांच्या आमच्याकडे पाहाण्याच्या नजरा बदललेल्या. मात्र काही मित्र-मैत्रिणी आणि मुख्यतः डॉक्टर्स यांनी दिलेली साथ मोलाची ठरली. एकेक करत सगळे कोरोनातून बरे झाले. सर्वात शेवटी बहीण रुग्णालयातून घरी आली तेव्हा तर डिजे लावून ‘डंके की चोट पर बेभान नाच करत आपल्या भावनांना मुक्त वाट करून दिल्याचं सलोनी सातपुते हिनं सांगितलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *