टॉपलेस फोटोशूटमुळे मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगावकर झाल्या होत्या

९० च्या दशकात आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. सौंदर्याची खान असणाऱ्या वर्षा उसगावकर यांनी अभिनय व सौंदर्याच्या जोरावर रसिकांना जणू भुरळ घातली होती. ‘गंमत जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यासारखे मराठी चित्रपटात वर्षा उसगावकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या त्या आजही वयाची पन्नाशी उलटली असली तर अगोदरसारख्याच सुंदर दिसतात.
सध्या तरी त्या आता कोणत्याही चित्रपटात काम करत नसल्या तरी त्यांना बऱ्याचदा अवॉर्ड फंक्शन मध्ये पाहिले गेले आहे. वर्षा उसगावकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केलेल्या आहेत. ‘परवाने’, ‘तिरंगा’, ‘हस्ती’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या.
त्यांनी मराठीसृष्टीत व हिंदीत सौंदर्य आणि अभिनयकलेच्या जोरावर त्यांनी मोठे नाव कमावले. वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटात नेहमीच सोज्वळ आणि बबली गर्लच्या भूमिका निभावल्या पण त्यांनी केलेल्या एका फोटोशूटमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.परंतु याच दरम्यानच्या वर्षा उसगांवकर एका फोटोशूटमुळे वादाच्या भोवऱ्या सापडल्या गेल्या होत्या. त्यांनी एका इंग्रजी मासिकेसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होते. वर्षा उसगांवकर यांचं हे फोटोशूट रसिकांना पटले नव्हते. अनेकांनी या फोटोशूटवरुन त्यांच्यावर जबरदस्त टीका देखील केली होती.

याशिवाय छोट्या पडद्यावरही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. महाभारत या मालिकेत त्यांनी अभिमन्यूची पत्नी ‘उत्तरा’ ही भूमिका साकारली होती. ‘चंद्रकांता’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी रूपमती ही भूमिका साकारली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *