गजरेवाली म्हणाली अरबाज कडून गजरा घ्या, मलाईका ने अशी दिली

मलाईका अरोरा सध्या अर्जुन कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळे खूपच चर्चेत आहे. ह्याशिवाय मलाईका आपल्या लूक मुळे लोकांच्या चांगलीच पसंतीस पडते. वेस्टर्न असो कि भारतीय ट्रेडिशनल पेहेराव, मलाईका खूपच चांगल्याप्रकारे परिधान करते. तिच्या ड्रेसिंग सेन्सची बॉलिवूड पासून ते सोशिअल मीडियावर चर्चा होत असते. ती तिच्या फिटनेसबद्दल सुद्धा ओळखली जाते. ती अनेकदा जिमच्या बाहेर दिसून आली आहे. ती जेव्हा जिम मधून बाहेर पडते तेव्हा तिच्या मागे मीडियावाले फोटोज आणि व्हिडीओसाठी हाथ धुऊन लागतात. मलाईका अरोरा जवळजवळ रोजच जिमच्या लूकमध्ये नजर येते. तिला अनेकदा त्याच ठिकाणी पाहिले जाते, जिथे ती आपल्या फिटनेस सेशन साठी जात असते आणि काही फॅन्स तिची वाट सुद्धा पाहतात जेणेकरून तिला भेटता यावे आणि तिच्यासोबत एक सेल्फी घेता यावी.

नेहमीप्रमाणे आपल्या फिटनेस सेशन वरून निघताना ती नेहमीप्रमाणे तिची वाट पाहत असलेल्या फोटोग्राफर्सना पोज देत होती. तितक्यात तिथे तिचा सामना एका गजरा विकणाऱ्या बाईशी झाला. ह्याच दरम्यान काही असं घडलं कि ती थोडीसी अनकंफर्टेबल झाली. खरंतर, जिमच्या बाहेर एक गजरा विकणारी बाई तिला गजरा विकत घेण्यासाठी सांगत होती. त्यावर मलायकाने खूपच प्रेमाने तिला नकार दिला. परंतु ती बाई मालयकाचा पाठलाग करत करत मालयकाच्या कार पर्यंत पोहोचली आणि सतत तिला गजरा विकत घेण्यास सांगत होती. त्याच दरम्यान त्या बाईने मलायकाला सांगितले कि अरबाजच्या तर्फे तरी गजरा घ्या. त्यावर मलाईकाने विचित्र रिऍक्शन दिले. मलाईकाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते कि तिला त्या बाईचे बोलणे जराही आवडले नाही. तरीसुद्धा मलाईका त्या गजरा विकणाऱ्या बाईला काहीच न बोलता गाडीत बसून निघून गेली. ह्या दरम्यान मलाईका सोबत तिची बहीण अमृता अरोरा, सीमा खान, अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅबीएला सुद्धा दिसून आल्या.मलाईका आणि अरबाज ह्यांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ साली ख्रिश्चन आणि मुस्लिम पद्धतीने दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या १९ वर्षानंतर २०१७ मध्ये हे जोडपे वेगळे झाले. त्यांच्या वेगळे होण्यामागचे कारण अर्जुन कपूर असल्याचे बोलले जात आहे. मलाईका आणि अरबाज ह्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. अरहान चे सध्याचे वय १७ आहे. अर्जुन कपूर आणि मलायका एकमेकांच्या खूपच जवळ आले. हे दोघेही सतत वेगवेगळ्या पार्टी आणि बॉलिवूड कार्यक्रमात एकत्र दिसून येतात. सध्या अशी चर्चा आहे कि लवकरच मलाईका आणि अर्जुन कपूर लग्न करू शकतात. अर्जुन कपूरने मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत मलाईका अरोरावर बोलताना सांगितले कि, लोकांनी विचार करायला हवे कि आम्ही काहीच लपवत नाही आहेत. आम्ही स्वतः समोर येऊन आमच्या नात्याबद्दल बोललो आहोत. असं आम्ही ह्यासाठी केले कारण आम्हांला वाटते कि, मीडियाने आमच्या नात्याला सन्मान, दया आणि प्रामाणिकपणाच्या दृष्टिकोनातून समजले आहे. ह्यामुळे आम्ही मीडियासोबत जे काही असेल ते नक्की शेअर करू.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *