NMJOKE

मिस इंडिया असून देखील या अभिनेत्रीला लोकांनी पसंती दिली नाही, लहान वयात चार मुलांची आई झाली

मिस इंडिया बनलेली अभिनेत्री सेलिना जेटलीने गेल्या महिन्यातच २४ नोव्हेंबरला आपला ३८ वा जन्मदिवस साजरा केला. मिस इंडियाचा मुकुट जिंकल्या नंतर सेलिनाने बॉलिवूड चित्रपटात पदार्पण केले. पण तिला बॉलिवूडमध्ये काही कमाल दाखवता आली नाही. २००१ मधे सेलिनाने मिस इंडियाचे मुकुट जिंकले होते आणि मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत जागा बनवली होती. नंतर २००३ मधे ‘जानशीन’ चित्रपटातून चित्रपटात पदार्पण केले. बीबीसी च्या सांगण्यानुसार मीडियाशी बातचीत करताना सेलिना स्वतःला साधारण मानते, घरातील काम काज करणारी घर सांभाळणारी मुलगी मानते. स्वयंपाक बनवण्याची तिला खूप आवड आहे. एका मुलाखतीत सेलिना म्हणाली की मी 16 वर्षाची असताना एका माणसावर मन बसलं होतं. तो वयाने माझ्या पेक्षा खूप मोठा होता. माझे मित्र आणि नातेवाईक या सर्वांचा आमच्या नात्याला नकार होता. पण मला काही फरक पडत नव्हता. एके दिवशी मी कोणालाही न सांगता त्याच्या घरी पोहोचले. तिथे मी माझ्या बॉयफ्रेंडला माझ्या बेस्ट फ्रेंड असलेल्या मैत्रिणी बरोबर पाहिले. त्यानंतर माझं मन तुटलं आणि मला या गोष्टीचा धक्का बसला.

सेलिना म्हणते की नंतर मला समजलं प्रत्येकाने कोणा सोबत राहायचं आणि कोणा सोबत नाही हे आपल्यावर असते. ब्रेकअप नंतर मला बॉयफ्रेंड फोन करून म्हणाला कि, मला माफ कर, मला देवाने असेच बनवले आहे. त्याचे हे वाक्य माझ्या मनाला खूप टोचले. त्या नंतर मी बरेच वर्ष एलजीबीटी ऍक्टिविस्ट राहिले. यूएन ने मला या कामाचा गुडविल ऍम्बॅसिटर बनवले. सेलिना ‘नो एन्ट्री’, ‘गोलमाल’, ‘टॉम डिक एंड हैरी’ ह्यासारख्या चित्रपटात दिसली. ती २०११ साली बिजनेसमॅन पीटर हॅग सोबत विवाह बंधनात अडकली. पीटर ऑस्ट्रियामध्ये एक हॉटेल व्यावसायिक आहे. सेलिना त्या वेळी दुबईला भारतीय फॅशन ब्रँडच्या स्टोरला लॉंच करायला गेली होती. सेलिना आणि पीटरची पहिली भेट दुबई मध्ये झाली होती. पहिल्याच भेटीत पीटर सेलिनाच्या प्रेमात पडला होता. पीटर ने जेव्हा सेलिनाला प्रपोज केले तेव्हा तिने सुद्धा नकार दिला नाहीआणि त्याला डेट करू लागली. ऑगस्ट २०१० मधे ते तिच्या आई वडिलांना भेटायला आले. त्याच दिवशी आमचा दोघांचा साखरपुडा झाला. साल २०१२ मधे तीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांची नावे विराज आणि विंस्टन. त्यांनतर २०१७ मधे पुन्हा आई बनली आणि पुन्हा जुळी मुले झाली. ज्यांची नवे आर्थर आणि शमशेर आहेत. त्यापैकी सेलिनाचा एक मुलगा जास्त दिवस जिवंत राहू शकला नाही.सेलिनाच्या संपत्ती बद्दल बोलाल तर ती करोडोंची मालकीण आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या मते तिच्याजवळ १६ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. ती लवकरच ‘ए ट्रीब्युट टू रितुपर्णो घोष : सिजन्स ग्रीटिंग्स’ मधे दिसणार आहे. चित्रपटात तिच्या सोबत वरिष्ठ कलाकार लिलिट दुबे आणि नवीन चेहरा अझहर खान दिसणार आहे. सेलिना आपल्या फिटनेस बद्दल खूप जागरूक असते. तिच्या आपल्या फिटनेसबद्दल एका मुलाखतीत सांगितले कि ती ह्यासाठी अनेक गोष्टी आणि टिप्स पाळते. जसे कि तणावापासून दूर राहणे. तणावापासून दूर राहण्यासाठी ती आपल्या मित्रांसोबत फिरायला जाते, जेव्हा सुद्धा टेन्शन मध्ये असते तेव्हा ती पियानो वाजवते, ज्यामुळे ती स्वतःला खूप चांगले अनुभवते. ह्याशिवाय ती रोज ४५ मिनिटं व्यायाम करते. ह्याशिवाय ती तेलकट पदार्थांपासून दूर राहते आणि दिवसातून १५ ग्लास पाणी पिते.
Exit mobile version