करिनाने केला ७ वर्ष्यानंतर खुलासा यामुळे दोनवेळा सैफ ला दिला होता लग्नासाठी नकार

सैफ अली खान आणि करीना कपूर ह्यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. दोघांना तैमूर अली खान नावाचा मुलगा देखील आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींमध्ये ह्या दोघांचे नाव घेतले जाते. काही दिवसांपूर्वीच करिनाने एका मुलाखतीत सांगितले कि, सैफ ने तिला दोनवेळा लग्नासाठी विचारले होते. परंतु तिने दोन्ही वेळा नकार दिला होता. जेव्हा तिसऱ्यांदा त्याने विचारले, तेव्हा ती लग्नासाठी तयार झाली. पिंकविला साठी दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने सांगितले कि, “सैफ ने मला दोन वेळा सांगितले कि आपल्याला लग्न करायला हवं. पहिल्यांदा त्याने हि गोष्ट ग्रीस मध्ये असताना सांगितले. त्यानंतर लद्दाखला असताना पुन्हा एकदा विचारले. त्यावेळी माझी भूमिका ‘मला माहिती नाही’ अशी होती. कारण मी त्याला पूर्णतः ओळखत नव्हती. त्यामुळे मला काही कळतच नव्हते. मी खूप संभ्रमात होते. ह्यामुळे तेव्हा मी त्याला नकार दिला. हा नकार त्याला अजून चांगल्याप्रकारे ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी होता.”

ह्याच मुलाखतीत करीना कपूरने लग्नानंतर चित्रपटांतून ब्रेक घेण्याबाबत सुद्धा चर्चा केली. तिने सांगितले कि, “मला वाटते कि मी आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय घेतला. मला माहिती होते कि माझे वैयक्तिक जीवन आणि प्रोफेशनल जीवन खूपच वेगळे असणार. परंतु मी सैफला अगोदरच सांगितले होते कि, मी चित्रपटांत काम करणे कधीच बंद करणार नाही आणि त्याने सांगितले कि तुला चित्रपटांत काम करणे सोडायला सुद्धा नाही पाहिजे.” करीना कपूर आणि सैफ अली खान ह्या दोघांनी ‘ओमकारा’, ‘एलओसी कारगिल’, ‘टशन’, ‘कुर्बान’ आणि ‘एजंट विनोद’ सारख्या चित्रपटांत एकत्र काम केले होते. ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. जवळजवळ चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. डेटिंगच्या दिवसांमधील गोष्ट कराल तर, सैफ अली खानने आपल्या हाथावर करीना कपूरच्या नावाचे टॅटू गोंदवले होते. सैफ करिनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. दोघांनी अगोदर कोर्टात लग्न केले होते.करीना कपूरने आपल्या लग्नाबद्दल सांगितले होते कि, अगोदर दोघेही घरातून पळून जाणार होते. कारण ते दोघांनाही आपले लग्न पूर्णतः गुप्तरित्या ठेवायचे होते. ह्यानंतर एक शानदार रिसेप्शन पार्टी ठेवली गेली होती. पार्टीत चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. करीनाचे हे लग्न एक खास कारणामुळे सुद्धा चर्चेत होते, ज्याचे कारण म्हणजे करिनाने आपल्या रिसेप्शन मध्ये तोच लेहंगा परिधान केला होता जो शर्मिला टागोर ह्यांनी आपल्या लग्नात परिधान केला होता. आता सैफ आणि करीनाच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. परंतु ह्या दोघांची केमिस्ट्री आज सुद्धा खूप चांगली आहे. तुमच्या माहितीसाठी, सैफ २००४ साली आपली पहिली पत्नी अमृता सिंग पासून वेगळा झाला होता आणि ह्यानंतर २०१२ मध्ये त्याने करीना कपूर सोबत लग्न केले. सैफ आणि अमृता दोघांना दोन मुले आहेत, इब्राहिम आणि सारा. तर करीना पासून सैफला एक तैमूर नावाचा मुलगा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *