Breaking News
Home / कलाकार / या अटीवर नीता अंबानीने मुकेश अंबानी सोबत लग्न केले होते

या अटीवर नीता अंबानीने मुकेश अंबानी सोबत लग्न केले होते

नीता अंबानींना आजच्या घडीला कोण ओळखत नाही? ह्या गोष्टीत काहीच शंका नाही कि त्या एक लोकप्रिय व्यक्ती आहेत आणि त्यांच्या समोर मोठे मोठे बिजनेस परिवार सुद्धा छोटे वाटतात. परंतु हे सर्व लग्नानंतर झाले आहे, लग्नाअगोदर तर त्या एक सामान्या व्यक्ती होत्या, आजच्यासारखी कोणी सेलिब्रेटी नव्हत्या. भारतातील सर्वात श्रीमंत घरातील सून असलेल्या नीता अंबानी आपल्या लाइफस्टाइल बद्दल नेहमीच चर्चेत असतात. आजकाल सोशिअल मीडियावर त्यांच्या महाग साडी पासून ते स्पेशिअल चहा बद्दल खूप चर्चा रंगल्या. परंतु तुम्हांला माहिती आहे का, आजच्या जमान्यात भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली महिला म्हणून ओळख असणाऱ्या नीता अंबानी लग्नाच्या अगोदर फक्त ८०० रुपयाची नोकरी करत होत्या. आणि ह्यापेक्षा सुद्धा रंगतदार आहे मुकेश अंबानी आणि नीता ह्यांच्या लग्नाची कहाणी. खरंतर जेव्हा धीरूभाई अंबानी आपला मोठा मुलगा मुकेश अंबानींच्या लग्नाचे नातं नितासमोर ठेवले तेव्हा सामान्य घरात वाढलेल्या नीताने लग्नासाठी एक मोठी अट ठेवली. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि कोणत्या अटीवर नीता आणि मुकेश अंबानींचे नाते जुळले. लग्ना अगोदर नीता कोणी मोठ्या सेलिब्रेटी नव्हत्या, तर त्या फक्त शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका होत्या आणि त्यांना ह्या कामाचे ८०० रुपये प्रति महिना पगार मिळत होता, जे अंबानी परिवाराच्या दृष्टीने लाखों पटीने कमी होती. पण असं म्हणतात ना, नशिबात जे लिहिलं असतं ते होऊनच जातं. तसंच काहीसं नीता अंबानींच्या आयुष्यात घडलं. मुकेश आणि नीता दोघेही एकमेकांसोबत फिरू लागले. काहीच दिवसात दोघे एकमेकांना डेट करू लागले. पण जेव्हा मुकेश अंबानीने नीता समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा नीता ने एक अट समोर ठेवली. आणि ती हि होती कि लग्नानंतर देशाच्या सर्वात श्रीमंत कुटुंबाची सून बनल्यानंतरसुद्धा तिला एक सामान्य जीवन जगायचे आहे आणि शिक्षिकेची नोकरी करायची आहे.कारण नीता याना मुलांना शिकवायला खूप आवडत होते. ज्यामुळे त्यांनी मुकेश अंबानी समोर लग्नानंतर सुद्धा शाळेत काम करण्याची अट ठेवली. नीताने अट ठेवली कि, “मी जरी मोठ्या घराची सून बनली तरी मी टिचिंगची नोकरी नाही सोडणार. मला शिकवायला खूप आवडते आणि मला हे काम पुढे चालू ठेवायचे आहे.” आणि मुकेश ला नीता पसंदच होती. म्हणून त्यांनीसुद्धा नीताची हि अजब अट ताबडतोब मान्य केली. आणि त्यांनी नीताला शिकवायची परमिशन दिली. आणि ह्याच अटीसोबत नीता आणि मुकेशचं नात्याचं लग्नात रूपांतर झालं. जे आज सुद्धा एक पावरफुल कपल च्या स्वरूपात ओळखले जात आहे.

About nmjoke.com

Check Also

कटप्पा ची मुलगी पाहून तुम्ही वेडे व्हाल एकदा पहाच

बाहुबली या चित्रपटाने भारतीय सिनेमा जगात आतापर्यंत आलेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *