Breaking News
Home / कलाकार / ऋषी कपूर ची हि इच्छा रणबीर पूर्ण नाही करू शकला

ऋषी कपूर ची हि इच्छा रणबीर पूर्ण नाही करू शकला

दिग्गज अभिनेता ऋषि कपूर च्या निधनामुळे भारतातच नाही तर भारताबाहेर देखील शोककळा पसरली. ऋषि कपूर यांचे निधन झाले यावर कोणाचा विश्वास देखील बसत नाही. ऋषि कपूर यांनी मुंबई मधील एन एच रिलायन्स हॉस्पिटल मध्ये आपला अखेरचा श्वास घेतला. प्रत्येक वडिलांची आपल्या मुलांकडून काहीतरी एक इच्छा असते अशीच इच्छा ऋषी कपूर यांची देखील होती जी त्यांचा मुलगा रणबीर पूर्ण करू शकला नाही. आपल्या आयुष्यात अनेक सुपरहिट चित्रपट करून ऋषि कपूर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ऋषि कपूर यांच्या निधनाची बातमी वेगाने सर्वाना समजली. त्यांच्या आठवणीत अनेकांनी आपल्या व्हाट्सअप स्टेट्स, फेसबुक अश्या अनेक सोशल साइट्सवरून ऋषि कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले आहे. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते कि आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाचे लग्न व्हावे अशीच इच्छा ऋषि कपूर यांची देखील होती जी रणबीर पूर्ण करू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलीया विषयी ऋषि कपूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले होते कि मला सर्व माहित आहे.ऋषि कपूर म्हणाले होते कि माझे लग्न माझ्या वयाच्या २७ व्या वर्षी झाले. रणबीर चे वय आता ३५ वर्षे आहे त्याने आता लग्न करायला हवे. ऋषि कपूर पुढे असे देखील म्हणाले कि रणबीर त्याच्या मर्जीने हव्या त्या मुलीशी लग्न करू शकतो. रणबीर च्या खुशीमध्येच मी पण खुश आहे असे ऋषि कपूर यांनी सांगितले. त्यासोबत ऋषि कपूर यांनी असे देखील सांगितले होते कि ते मारण्यापूर्वी आपल्या नातवंडासोबत खेळू इच्छितात. मात्र त्यांचं हे स्वप्न रणबीर पूर्ण करू शकला नाही. देव ऋषि कपूर यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईशवरचरणी प्रार्थना.

About nmjoke.com

Check Also

कटप्पा ची मुलगी पाहून तुम्ही वेडे व्हाल एकदा पहाच

बाहुबली या चित्रपटाने भारतीय सिनेमा जगात आतापर्यंत आलेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *