विराटच नाही तर या सहा क्रिकेटर्सनी देखील बॉलिवूड अभिनेत्र्यांशी लग्न केले आहे

१. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली : सध्या खूप चर्चेत असलेली जोडी म्हणजे विराट आणि अनुष्का. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेटचा कर्णधार तसेच स्टार फलंदाज विराट कोहलीला आपला जोडीदार निवडला. ११ डिसेंबर २०११ ला दोघांचे लग्न इटली येथील लक्जरी सुविधा असलेल्या रिसॉर्ट मध्ये झाले. २. हेजल कीच आणि युवराज सिंग : अभिनेत्री हेजल कीच आणि क्रिकेटर युवराज सिंग ह्यांचे १२ नोव्हेंबर २०१५ ला लग्न झाले. हेजल ला चित्रपटात जास्त यश मिळाले नाही परंतु तिने आपला जीवनसाथी युवराज सिंगला निवडले. त्यांचे लग्न पारंपरिक शीख रितीरिवाजानुसार झाले.

३. गीता बसरा आणि हरभजन सिंग : अभिनेत्री गीता बसरा ने क्रिकेटपटू हरभजन ला आपले लाईफ पार्टनर निवडले. गीता बसराने बॉलिवूड शिवाय अनेक पंजाबी चित्रपटात काम केले आहे. ह्या दोघांच्या लग्नाला २ वर्ष झाले आहेत. ४. संगीता बिजलानी आणि मोहम्मद अजरुद्दीन : आपल्या पहिल्या बायकोपासून वेगळे झाल्यानंतर लोकप्रिय क्रिकेटपटू मोहम्मद अजरुद्दीन ह्याने बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी सोबत लग्न केले. ह्यांचे वैवाहिक जीवन जास्त काळ न चालल्यामुळे हे दोघेही वेगळे झाले.५. शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी : भारतीय क्रिकेटसंघाचे माजी कर्णधार नवाब मन्सूर अली खान पतौडी ने अभिनेत्री शर्मिला टागोर सोबत लग्न केले. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि बॉलिवूडमधील लोकप्रियअभिनेता सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान हे तिघे भाऊ बहीण ह्यांचे मुलं आहेत. ६. सागरिका घाटगे आणि जहीर खान : लोकप्रिय चित्रपट ‘चक दे इंडिया’ चित्रपटात काम केलेली बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे ने २३ नोव्हेंबर २०१७ ला भारतीय क्रिकेटपटू जहीर खान सोबत लग्न केले. मुंबईतील कोर्टात गुप्तरित्या लग्न केले. त्यानंतर २७ नोव्हेंबरला त्यांनी ताज हॉटेलमध्ये भव्य रिसेप्शन ठेवले होते. ह्या रिसेप्शन पार्टीत अनेक बॉलिवूड क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *