महिलेने भिकारी समजून रजनीकांतला भीक दिली त्यानंतर पहा

रजनीकांत कदाचित आपल्या चित्रपटांत केलेल्या भूमिकेमुळे सुपरस्टार असेल, परंतु त्याचे लोकांवरील प्रेम आणि आदर ह्यामुळे सुद्धा लोकांनी रजनीकांतला आपल्या मनात देवासारखे स्थान दिले आहे. आज आपण अशीच एक घटना पाहणार आहोत कि ज्यात एका महिलेने रजनीकांत ह्यांना भिकारी समजून १० रुपये दिले. परंतु त्यानंतर रजनीकांत ह्यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला त्यावरून सिद्ध होते कि ह्या माणसाने लोकांच्या मनात जी जागा कमावली आहे ती फक्त चित्रपटांमुळे नाही तर त्यानेही लोकांना तितकेच प्रेम दिलेले आहे. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांच ठाऊक आहे की, दक्षिणी चित्रपटसृष्टी शिवाय संपूर्ण जगात त्यांना देवासारख पुजल जात. परंतु, त्यांच्याबद्दल हि गोष्ट ऐकून तुम्ही थक्क हाल, की त्यांना एका महिलेने भिकारी समजले आणि १० रुपये भिकेच्या रुपात दिले होते.

तुमचा या गोष्टीवर विश्वासहि बसणार नाही की, संपूर्ण जगभरात ज्यांना पूजले जाते, अश्या प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांतला कोणी भिकारी समजू शकतं. परंतु, ही गोष्ट अगदी खरी असून, १२ वर्षाआधी रजनीकांतला भिकारी समजून एका महिलेने १० रुपयाची भिक दिली होती. हि घटना त्या वेळेसची आहे, जेव्हा २००७ मध्ये रजनीकांत चा ‘शिवाजी’ हा चित्रपट रिलीज झाली होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर हिट झालेला, ह्याच आनंदात रजनीकांत आपल्या साथीदारांसोबत मंदिरात देवदर्शनासाठी पोशाख बदलून गेले होते.एका महिलेणे रजनीकांतला त्यावेळेस भिकारी समजले होते. ते साधःरण कपडे घालून मंदिराच्या पायऱ्या चढत होते. हि महिला सुद्धा त्यांच्यासोबतच पायऱ्या चढत होती, जिने रजनीकांतला एक कमकुवत बुजुर्ग आणि भिकारी समजून १० रुपयेची नोट दिली. त्या महिलेने भिकारी समजून दिलेली १० रुपयेची नोट रजनीकांतने न नाकारता मोठ्या मनाने घेतली. महिलेकडून दिले गेलेले १० रुपयाची नोट घेऊन रजनीकांतने आपल्या पर्स मधील १० रुपयाची नोट काढून देवाच्या चरणी अर्पण केली. हे सगळे तिथे उभ्या असलेल्या महिलेने देखील बघितले आणि रजनीकांतला ओळखले. ती लगेचच रजनीकांत जवळ गेली आणि त्यांची माफी मागताना ते १० रुपये परत मागितले. रजनीकांतने त्या महिलेला सांगितले, आपण दिलेले दहा रुपये माझ्यासाठी आशीर्वाद आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *