आदेश बांदेकर ची पत्नी पहा किती सुंदर दिसते, त्यांची लव्हस्टोरी तर कमालच

‘होम मिनिस्टर’ ह्या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर हे लोकांच्या घराघरांत पोचले. हा कार्यक्रम सर्वात विवाहित लोकं जास्त पाहतात. ह्या कर्यक्रमादरम्यान जेव्हा सुद्धा कार्यक्रमात कोणत्याही भागात जोडप्यांची मुलाखत घेताना आदेश बांदेकरांना समजते कि, समोरच्या जोडप्याचे लव्ह मॅरेज झाले आहे. तेव्हा ते त्यांना तुम्ही कुठे भेटलात, कसे भेटलात ह्या गोष्टी नेहमी विचारतात. परंतु तुम्हांला कदाचित हे माहिती नसेल कि, आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर ह्यांचे सुद्धा लव्ह मॅरेज झालेले आहे. दोघांची लव्हस्टोरी देखील खूपच इंटरेस्टिंग आहे. सुचित्रा नववीत असल्यापासूनच आदेश ह्यांना आवडत होत्या. सुचित्रा बांदेकर ह्या त्यावेळी ‘रथचक्र’ सीरिअलसाठी काम करत होत्या. त्यावेळी सीरियलमध्ये आदेश बांदेकर ह्यांचे एका दिवसाचे शूटिंग होते. शूटिंग दरम्यान मोकळ्या वेळेत त्यांनी असंच सेटच्या बाहेर नजर फिरवली, तेव्हा सुचित्रा त्यांना पायऱ्यांवर बसलेली दिसली. त्यावेळी तिला बघीतल्यावरच आदेश बांदेकर ह्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडले. शूटिंग संपल्यानंतर त्यांनी ठरवले होते कि ह्या मुलीबद्दल जाणून घ्यायचे. त्यांनी तिचा पाठलाग केला. पाठलाग करत करत ते सुचित्राच्या शाळेपर्यंत पोहोचले. आदेश बांदेकर ह्यांचा प्रेमप्रवास सुरु झाला.

ते सतत तिच्या शाळेजवळ दिसत. रोज तिला पाहणे आणि तिच्या मागून शाळेला जाणे. असे रोजचंच होऊ लागले होते. आणि एके दिवशी आदेश बांदेकर ह्यांनी सुचित्राला प्रपोज केले. परंतु सुचित्रा ह्या गोष्टीला वैतागली होती. त्यामुळे तिने मला हे असलं काही जमणार नाही, माझा पाठलाग करत जाऊ नकोस, मी काय तुला होकार देणार नाही, असे सांगून निघून गेली. त्यामुळे आदेश बांदेकर निराश झाले आणि ते परत निघून गेले. परंतु त्यांच्या मनातून काही केल्या सुचित्रा जात नव्हती. त्यांना स्वप्नात आणि जागेपणी फक्त तीच दिसायची. त्यामुळेच त्यांनी सुचित्राचा विचार सोडला नाही. आणि पुन्हा एकदा दादर स्टेशनजवळील हॉटेलमध्ये तिला भेटायला बोलावले. सुचित्रा सुद्धा आदेशला भेटण्यासाठी एका मैत्रिणीला सोबत घेऊन गेल्या. सुचित्रा हॉटेलमध्ये आल्या, त्यांनी आदेशाकडे पाहिले. त्यावेळी आदेश सुचित्रांची वाट पाहत होते. त्यावेळी आदेश ह्यांनी सुचित्राला पाहिले नाही. ते विचारात मग्न होते. परंतु सुचित्राच्या मनात काय आले काय माहिती, त्यांना भीती वाटत असल्यामुळे त्या आदेशाला न भेटताच निघून गेल्या. आदेश तासंतास वाट पाहत राहिले.त्यांना कळतच नव्हतं नक्की काय झाले ते, आपला संदेश नक्की सुचित्रांपर्यंत पोहोचला तर नसेल का, म्हणून कदाचित त्या आल्या नसतील असे त्यांना वाटू लागले. अनेकतास वाट पाहूनही सुचित्रा आली नाही म्हणून ते थेट तिच्या घरी गेले. परंतु तेथे गेल्यावर त्यांना माहिती झाले कि सुचित्रा घरी नाहीत. त्यावेळी सुचित्रा दादरमधील एका दुसऱ्याच ठिकाणी फिरत होत्या. थोड्या वेळांनंतर सुचित्रा फिरून फिरून परत एकदा तिच्या घरी गेल्या. जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला, त्यांनी पाहिले कि आदेश आपल्या अगोदरच घरी येऊन बसलेला आहे. आणि आईसोबत मस्तपैकी गप्पा मारत आहे. त्यानंतर सुचित्रा ह्यांची आई आदेशला म्हणाली कि, तिला बाहेर जायचे आहे. तेव्हा आदेश सुद्धा म्हणाला कि काकू मी पण येतो तुमच्या बरोबर. आणि दोघेही बसस्टॉप पर्यंत पोहोचले. बस स्टॉप पर्यंत पोहोचल्यानंतर आदेश ह्यांनी सांगितले कि, माझे काही काम बाकी आहे. तुम्ही पुढे जा काकू, मी ते काम करून येतो. आणि असे बोलून ते पुन्हा सुचित्रांच्या घरी गेले. घरी आल्यावर सुचित्राने आदेशाला पाहिले. परंतु ह्यावेळी आदेश चिडला होता. वाट बघून कंटाळला सुद्धा होता. त्यांनी मुद्द्यावर बोलणे चालू केले. काय झाले, काय प्रॉब्लेम आहे, इतका वेळ का लावते आहेस हो म्हणायला.हो म्हणायचे असेल तर हो म्हण, नाहीतर नाही सांग. ह्यापुढे मी पुन्हा कधीच तुला विचारणार नाही. मी काय छपरी मुलांसारखा तुला फिरवून सोडून देणार नव्हतो. तुला लग्नाची मागणी घालून शेवटपर्यंत तुझी साथ निभावणार होतो. आणि मी तुला महालक्ष्मीच्या मंदिरात सुद्धा घेऊन जाणार होतो. मी तुला पाच मिनिटांचा वेळ देतो. मला तुझे उत्तर दे. असे बोलून त्यांनी पाच मिनिटाची वेळ दिली. आणि घड्याळाकडे पाहू लागले. बरोबर पाच मिनिटांनी ते उठले आणि जाऊ लागले. त्यांनी मनामध्ये निर्धार केला होता कि हो तर हो, नाहीतर नाही. तिचे उत्तर नाही असेल म्हणूनच कदाचित तिने काही उत्तर दिले नाही असे मनात म्हटले. जेव्हा आदेश दारापर्यंत पोहोचले आणि त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा सुचित्रानी म्हटले, तर मग कधी जायचं महालक्ष्मीला. आणि अश्याप्रकारे त्यांच्या ह्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. परंतु प्रेमाने सर्वकाही होत नाही. त्यावेळी आदेश हे स्ट्रगल करत होते. सुचित्राने सुद्धा घरामध्ये सांगण्याचे कोणतेही धाडस केले नाही. तिला असे वाटत होते कि घरातल्यांना सेटल मुलगाच पसंत पडू शकतो, त्यामुळे तिने ह्याबद्दल काहीच सांगितले नव्हते.जेव्हा सुचित्राच्या घरी हे माहिती झाले तेव्हा घरच्यांचा दोघांच्या प्रेमाला विरोध होता. परंतु घरच्यांना आवडणार नाही म्हणून त्यांनी आपले प्रेम थांबवले नाही. त्यांनी धाडसी निर्णय घेतला. मी क्लासला जाते, असे सांगून त्या घरातून निघाल्या आणि मुंबईतील वांद्रे कोर्टात पळून जाऊन लग्न केले. त्याकाळी कोर्टात केवळ ५० रुपयांत त्यांचे लग्न झाले होते. सुचित्रा ट्युशनच्या निमित्ताने लग्नाबाहेर पडली आणि थेट कोर्टात लग्नासाठी हजर झाली. हे जरी बालपणातले प्रेम असले तरी त्यांनी ते प्रेम आजपर्यंत टिकवून ठेवले आहे. प्रेम करण्याबरोबरच त्यांनी स्वतःचे करिअर सुद्धा घडवले. सुचित्राच्या साथीने आदेशने एक यशस्वी अभिनेता आणि एक उत्कृष्ट अँकर असा पल्ला गाठला आहे. त्यांना सोहम नावाचा मुलगा सुद्धा आहे. तरी अशी फिल्मी प्रकारची प्रेमकहाणी होती ह्या मराठमोळ्या स्टार्सची. तुम्हांला हि कहाणी कशी वाटली नक्की सांगा. आपल्या ह्या लाडक्या जोडीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून मनापासून शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *