अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयात आहे इतके जास्त अंतर पाहून चकित व्हाल

चित्रपटांत सेलेब्रेटींची प्रेमकहाणी पाहून प्रत्येकाच्या मनात हा विचार तर नक्कीच आला असेल, कि पडद्यावर प्रेम कहाणी दाखवणाऱ्या ह्या कलाकारांना खऱ्या आयुष्यात कश्याप्रकारे प्रेम होत असेल. आपल्याला सुद्धा त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी जाणून घेण्याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यातला त्यात आपल्या आवडत्या कलाकाराची प्रेम कहाणी म्हटलं कि एक पर्वणीच. आजच्या लेखात आपण अश्याच एका अभिनेत्याच्या प्रेमकहाणी बद्दल जाणून घेणार आहोत जो महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या मनात आहे. ज्याने आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सर्व चाहत्यांचे मन जिंकले. होय आम्ही तुम्हांला मराठी चित्रपटसृष्टीतले सर्वांचे लाडके कलाकार अशोक मामा ह्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत. अशोक सराफ ह्यांचे लग्न सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी ह्यांच्या सोबत झाले. दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. दोघांमध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर असून देखील त्यांची नाळ कसं काय जुळली, हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ ह्यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयातून त्यांनी आपले माविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तर निवेदिता जोशी ह्यांचा जन्म ६ जून १९६५ ला झाला. प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. अगदी हीच गोष्ट दोघांनाही खरी ठरली. प्रेम करताना रंग रूप, वय वैगेरे काही दिसत नाही. ह्या गोष्टीचे भान नसतेच म्हणा ना. त्यावेळी फक्त समोरच्याचे मन आणि त्याच्या मनात असणारी आपल्याबद्दलची काळजी ह्याच गोष्टी सर्वात जास्त परिणाम करतात. अगदी असंच झाले ह्या दोन कलाकारांमध्ये. ह्या दोन्ही जोडप्यात तब्बल १८ वर्षांचा फरक आहे.दोघांची ‘डार्लिंग डार्लिंग’ ह्या नाटकावेळी पहिली भेट झाली होती. निवेदिताच्या वडिलांनी अशोक सराफ ह्यांच्याशी ओळख करून देताना एका छोट्या मुलीशी हि माझी मुलगी अशी ओळख करून दिली होती. १९७१ साली अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी त्यांचे वय २४ वर्षे होते. तर निवेदिता सराफ १९७१ साली केवळ सहा वर्षांच्या होत्या. त्यानंतरच्या काही काळात अशोक सराफ ह्यांचे चित्रपट करियर चांगले चालू होते. निवेदिता जोशी सुद्धा चित्रपटांत अभिनेत्रीची भूमिका निभावत होत्या. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ह्या चित्रपटांत अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे दोघेही कलाकार होते. त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांचे एकमेकांशी कधीच बोलणे झाले नाही. हा चित्रपट लोकांना खूप आवडला आणि ह्या चित्रपटापासूनच ह्या दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. त्यानंतर ‘तू सौभाग्यवती हो’ ह्या चित्रपटात देखील हे दोन्ही कलाकार होते. परंतु तेव्हा सुद्धा त्यांच्यात जास्त संभाषण होत नव्हते. परंतु ‘धुमधडाका’ हा चित्रपट दोघांमधील खरे प्रेम होण्यास कारणीभूत ठरला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *