सिद्धार्थ चांदेकर चे होणार आहे लग्न पहा किती सुंदर दिसते बायको

सेलिब्रेटींच्या चित्रपटांची जितकी चर्चा होत नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी होत असते. आजच्या घडीला सेलिब्रेटीज आपल्या रोजच्या आयुष्याच्या घटना सोशिअल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यामुळे चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या छोट्या छोट्या अपडेट्स मिळत राहतात. सेलिब्रेटीज नेहिमीच आपल्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी सांगत राहतात. आणि जर गोष्ट कपल्स बद्दल होत असेल तर मग चाहत्यांना देखील अश्या गोष्टीत चांगलाच रस असतो. मराठीत अनेक सेलिब्रेटी जोड्या लोकप्रिय आहेत. अशोक सराफ – निवेदिता जोशी, सचिन-सुप्रिया ते अगदी प्रिया बापट-उमेश कामत इतक्या पर्यंत. ह्या लोकप्रिय सेलेब्रेटीज कपल्सची नेहमीच चर्चा होत असते. आज आपण अश्याच एका मराठमोळ्या सेलेब्रेटीज कपल विषय जाणून घेणार आहोत.

सिद्धार्थ चांदेकर हा मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या अभिनयाची कमाल अनेक चित्रपटांत दाखवलेली आहे. ‘झेंडा’, ‘क्लासमेट्स’, ‘सतरंगी रे’, ‘गुलाबजाम’ ह्यासारख्या अनेक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवली आहे. आज आपण पाहणार आहोत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ह्याच्या लव्हस्टोरी बद्दल. सिद्धार्थ चांदेकर ह्याची होणारी बायको आहे मराठी अभिनेत्री. तिने ‘उर्फी’, ‘आम्ही बेफिकर’, ‘बिल्लू’ ह्यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. सिद्धार्थ आणि मिताली ह्यांनी त्यांच्या नात्याची कबुली सोशिअल मीडियावरच दिली होती. मितालीचा ११ सप्टेंबरला जन्मदिवस असतो, आणि तिच्या ह्या स्पेशिअल दिवशीच सिद्धार्थने तिला रिंग देऊन प्रपोज केले होते. मितालीने सिद्धार्थसोबतचा फोटो आणि त्याने दिलेली रिंगचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. खरंतर त्या अगोदरपासून सोशिअल मिडीआवर दोघांचे अनेक काळापासून एकत्र फोटोज दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याविषयी गप्पा रंगल्या होत्या. परंतु ह्या गप्पा तेव्हा थांबल्या जेव्हा मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःहून कबुल केलं कि ‘सिद्धार्थने मला प्रपोज केले आणि मी त्याला होकार दिला. मी त्याने दिलेली रिंग स्वीकारली आहे.’सिद्धार्थ आणि मिताली दोघांनीही एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लव्हस्टोरी बद्दल सांगितले. एका शो दरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनीही सोशिअल मीडियावर एकमेकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही काही काळ रिलेशनशिप मध्ये होते. त्यांनी जवळजवळ वर्षभर एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघांनीही ह्याच वर्षी २४ जानेवारीला मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये खाजगी पद्धतीने साखरपुडा केला. ह्या साखरपुड्याला कुटुंबातील लोकं, नातेवाईक आणि काही मोजकेच मित्रमंडळी उपस्थित होती. लवकरच हे जोडपं लग्न करणार असून चाहत्यांना सुद्धा त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय असलेल्या सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात मिताली मयेकरने ‘गुलाबजाम’ बनून गोडवा निर्माण केलेला आहे. दोघांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून हार्दिक शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *