या तरुणीने वजन कमी करण्यासाठी घेतली गोळी आणि झाला मृत्यू

मित्रानो आजकाल सर्वाचेच वजन खूप वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी अनेक उपाय लोक शोधतात. व्यायामाचा कंटाळा येतो म्हणून तसेच वेळ, श्रम यांची बचत करण्यासाठी लोक वजन कमी करण्यासाठी नवीन उपाय शोधतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी उपाय सांगत असतात. वजन कमी करण्यासाठी गोळ्या औषधे देखील लोक घेतात. याच गोळ्याचा परिणाम वाईट देखील हू शकतो आणि ठाण्यातील एका तरुणीला वजन कमी करण्याच्या गोळ्या घेणं महागात पडलं आहे.

वजन कमी करणासाठी असलेली गोळी घेतल्यानंतर काही तासातच ठाण्यातील एका तरुणीचा मृत्यू झाला. मेघना देवगडकर या २२ वर्षीय तरुण मुलीचा जीव गेला आहे. हि तरुणी म्हणजेच मेघना पेशाने नृत्यांगना होती त्यासोबतच ती जीम मध्ये ट्रेनर म्हणून देखील काम करायची. मात्र वजन कमी करण्यासाठी ज्या गोळया घेण्यावर बंदी होती, त्याच गोळया मेघनाने घेतल्या असे मुंबई मिरर या वृत्ताने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार जीम मध्ये वर्कआऊटला निघण्याआधी तिने या गोळया घेतल्या.गोळया घेतल्यानंतर मेघनाला उलटया होऊ लागल्या. तिला सुरुवातीला घराजवळच्या दवाखान्यात नेले गेले. त्यानंतर लाइफलाइन हॉस्पिटल आणि पुन्हा तिथून सायन रुग्णालयात पाठवले गेले. तिला आयसीयूमध्ये दाखल केले होते पण मेघनाचा कार्डीअक अरेस्टने मृत्यू झाला. मेघनाने गोळया घेतल्यानंतर पंधरा तासांच्या आतच मृत पावली. बंदी घातलेल्या गोळया घेतल्यानंतर मेघनाला हायपरथरमियाचा त्रास सुरु झाला. तिच्या शरीरातील तापमान सामान्यपेक्षा जास्त झाले. रक्तदाब आणि ह्दयाचे ठोके वाढले असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कार्डीअक अरेस्टने तिचा मृत्यू झाला. तुम्ही देखील वजन करण्यासाठी असले काही उपाय करत असाल तर ते थांबवा व चालून पळून नैसर्गिकरित्या वजन कमी करा आणि स्वतःची काळजी घ्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *