मांसाहार केल्याने कोरोना होतो का पहा

मित्रानो चीन मध्ये कोरोना वायरस या आजाराची लाट पसरली असल्यामुळे तेथील परिस्थिती खूपच भयावह आहे. चीन मध्ये फक्त १० दिवसांमध्ये १६०० रुग्ण राहतील असे हॉस्पिटल बनवले गेले. या हॉस्पिटल मध्ये १६०० बेड आहेत आणि फक्त कोरोना ची लागण झालेल्या लोकांनाच येथे प्रवेश आहे. इतर रुग्णांना इतर हॉस्पिटल असून फक्त कोरोनाची लग्न झालेल्यांसाठी हे हॉस्पिटल बनवले गेले आहे. चीनने फक्त १० दिवसांमध्ये इतके मोठे हॉस्पिटल बनवले यावरूनच समजते कि कोरोना किती भयानक आहे.

पुण्यामध्ये विमानतळावर एका चिनी व्यक्तीने उलटी केली त्यामुळे पुण्यात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जगभरातून चीन ला जाणारी विमाने देखील रद्द केली आहेत. चिनी लोक कोरोनापासून वाचण्यासाठी देश सोडून पळू लागले आहेत. कोरोनाचे रुग्ण देखील अनेक देशात आढळले आहेत आणि या आजारावर वैज्ञानिक औषध शोधत आहेत. हा आजार इतका भयानक असल्याने अनेकांनी सोशल मीडियावर खोट्या बातम्या देखील पसरवणे सुरु केले आहे. चिकन, मटण, मांस खाल्याने कोरोना हा आजार होतो असे सांगितले जात आहे.चिकन, मटण, मांस खाल्याने कोरोना होत नाही असे अनेक डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे देखील त्यांचे मत आहे. पण देशभर कोरोनाची चर्चा होत आहे यावरून हा आजार किती भयानक आहे हे लक्षात येते. हा आजार देखील आहे त्यामुळे मृत्यूला आमंत्रण देण्यापेक्षा आपण आपली काळजी स्वतः घेतलेली बरी. चिकन, मटण, मांस खाल्याने कोरोना होत नसेल देखील पण जर त्याने कोरोनाची लागण झाली तर हा आजार आणखीन पसरेल त्यामुळे काही दिवस मांसाहार न केलेलं योग्य राहील.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *