फोर्ड कंपनीने केला रतन टाटा चा अपमान, मग कसा घेतला बदला पहा

आता तुम्हीही रतन टाटा यांच्या अपमानाची ओळ वाचूनच थक्क झाले असाल. परंतु, हे शंभर टक्के सत्य आहे. परंतु हि गोष्ट स्वतः टाटा कंपनीचे मालक टाटा यांनी सांगितली आहे. कारण रतन टाटा यांचे नाव फक्त देशभरातच नाही तर संपूर्ण जगभर पसरलेले आहे. टाटा हे एक जगप्रसिद्ध नाव आहे. अशा परिस्थितीत, अपमानाबद्दल बोलणे कोणत्या गुन्ह्या पेक्षा कमी नाही. पण आज आम्ही तुम्हाला टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या जीवनाची एक गोष्ट सांगणार आहोत. जे सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहेत. १९९८ मध्ये टाटा मोटर्सने आपली पहिली कार ‘इंडिका’ बाजारात आणली. रतन टाटांचे हे आधीपासूनचे स्वप्न होते आणि त्यासाठी त्यांनी कठोर मेहनतही केली होती. बाजारात टाटाची पहिलीच कार असल्याने त्यांना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. चागंला प्रतिसाद न मिळाल्याने टाटा मोटर्सलाला बराच फटका बसला. कंपनीच्या सल्लागारांनी रतन टाटांना कंपनी विकण्याचा सल्लाही दिला आणि इच्छे विरुद्ध रतन टाटा कंपनीला विकण्यासाठी तयारही झाले. कंपनी विक्रीसाठी त्यांनी अमेरिकेतील कंपनी ‘फोर्ड’ शी संपर्क साधला.

रतन टाटा आणि फोर्ड कंपनीचे मालक ‘बिल फोर्ड’ यांच्यात बैठक झाली. यादरम्यान ‘बिल फोर्ड’ यांनी रतन टाटांना सांगितले, “ज्या व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती नाही त्या व्यवसायात तुम्ही इतके पैसे का घालवले की ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. या कंपनीला खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत.” उपकाराची गोष्ट ऐकून रतन टाटा यांना वाईट वाटले. म्हणून निराशेचा उद्रेक झाल्यानंतर तो करार रद्द करून पुन्हा भारतात परतले. ‘बिल फोर्ड’ यांचे ते शब्द रतन टाटांना शेवट पर्यंत लक्षात राहिले. यानंतर रतन टाटा यांनी निश्चय केला की, ते आता या कंपनीला यापुढे कोणालाही विकणार नाहीत आणि कंपनीला यशाची उंची गाठण्यासाठी काम करतील. या घटनेनंतर रतन टाटा यांनी एका मार्केट रिसर्च टीमची स्थापना करून कार खरेदीदारांशी बोलणी केली. लोकांना कशी कार हवीये, त्यांना कार मध्ये कोणत्या सोयीसुविधा हव्या आहेत, हे त्यांनी जाणून घेतले. काही काळानंतर ‘टाटा इंडिकाची’ अशी मागणी वाढली कि, बाजारात कार विकत घेणाऱ्यांची रांगच लागली. टाटा इंडिकाने केवळ देशच नाही तर विदेशातही नवीन उंची गाठल्या.दुसरीकडे, फोर्ड कंपनीच्या खराब दिवसांची सुरुवात झाली. 2008 मध्ये फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या काठावर पोहोचली. याप्रसंगी रतन टाटा यांनी फोर्डवर उपकार केले आणि त्यांची लक्झरी कार ‘लँड रोव्हर’ आणि ‘ज्याग्वार’ बनवणारी कंपनी ‘जेएलआर’ची ला विकात घेतले. बॉम्बे हाऊसमधील बैठकी आणि बैठकीचे निराकरण करण्यासाठी फोर्डचे अधिकारी भारतात आले. करार सुमारे २.३ अब्ज डॉलर्स मध्ये झाला. तेव्हा ‘बिल फोर्डने’ रतन टाटा यांच्यातील क्षमतेला ओळखले. आज ‘जेएलआर’ कंपनी टाटा ग्रुपचाच एक भाग आहे. रतन टाटांनी ठरवले असते तर त्याच वेळी बिल फोर्डच्या बैठकीत त्यांनी त्यांच्या झालेल्या अपमानाची उत्तरे दिली असती. पण महान लोक आपल्या यशाच्या माध्यमातून इतरांना उत्तर देतात. रतन टाटा यांचे जीवन देखील बर्याच चढ-उतारांनी भारलेल आहे. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक ‘जमशेदजी टाटा’ यांचे दत्तक नातवंड ‘नवल टाटा’ यांचे सुपुत्र आहेत. रतन टाटा यांनी ‘आयबीएम’ कंपनीची नोकरी सोडून टाटा ग्रुपच्या माध्यमातून आपल्या करियर ची सुरूवात केली होती. १९६१ मध्ये त्यांनी इथे नोकरी सुरु केली. १९९१ पर्यंत ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. रतन टाटा यांनी कंपनीला इतक्या वर्षांमध्ये यशाच्या उंच शिखरावर पोहोचविले. सोबतच कंपनीचे मूल्य ५० पटींनी वाढले.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *