या चलाख चोरांची चोरी पोलिसांनी कशी पकडली पहा

काही घटना सिरिअस असतात पण त्या खूप मनोरंजक पद्धतीने घडतात. जसे कि हि घटना. हि काल्पनिक घटना नाही आहे. असं खरंच घडलं आहे, एखाद्या फिल्मी स्टाईलने. एक व्यक्ती होता, पोलीस त्याचा तपास करत होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो ट्रेनमध्ये बसून पळाला. पोलीस त्याला पकडण्यासाठी विमानाने स्टेशनला त्याच्या स्वागतासाठी वाट पाहत उभी होती. हि घटना बँगलोरमध्ये घडली. आणि संपली अजमेर मध्ये. गोष्ट आहे २२ वर्षीय कुशल सिंहची. त्याच्यावर आरोप आहे कि कुशल जिथे काम करत होता त्याच घरातील सोन्याचे दागिने आणि पैसे चोरून तो पळून गेला. आपल्या घरी येण्यासाठी त्याने बँगलोर वरून अजमेरला जाणारी ट्रेन पकडली. तीन दिवसाचा प्रवास होता. कुशलने विचार केला होता कि आता तो कोणाच्या हाती लागणार नाही परंतु बँगलोरची पोलीस त्याच्याहून जास्त हुशार निघाली. त्यांनी एअरपोर्ट वरून फ्लाईट पकडली आणि कुशल अजमेरला पोहोचण्याआधीच ते तिथे पोहोचले. नंतर जेव्हा कुशलची ट्रेन जेव्हा अजमेरच्या प्लॅटफॉर्मवर लागली तेव्हा पोलीस अगोदरपासून त्याची वाट पाहत होती.

‘टाइम्स नाऊ’ च्या बातमीनुसार, बँगलोर मधील व्यावसायिक महक वी पिरागल ह्यांना आपल्या घरातील कामासाठी एका हेल्परची गरज होती. एका मित्राने त्याला ह्यासाठी कुशल नावाच्या व्यक्तीचे नाव सुचवले. दिवाळीच्या दिवशीच महक ह्यांनी कुशलला कामाला ठेवले. महकच्या कुटुंबाचे एक कपड्यांचे दुकान आहे. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दुकानावर पूजा होणार होती. संपूर्ण कुटुंब दुकानात पूजेसाठी गेले. जाताना त्यांनी कुशलला घरावर लक्ष ठेवण्यास सांगितले. रात्री नऊ वाजता जेव्हा संपूर्ण कुटुंब पूजा करून घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिले कि संपूर्ण कपाट अस्ताव्यस्त पडलेले आहे. त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि पैसे गायब आहेत. कुशल सुद्धा गायब होता. परिवाराला कुशल वर शंका आली कि त्यानेच दागिने घेऊन पळ ठोकला म्हणून. त्यांनी ह्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात कळले कि कुशलने अजमेर साठी ट्रेनमधून रवाना झाला आहे.पोलिसांनी कुशलचा फोन नंबर ट्रेस केला. कुशलच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांना कळले कि तो चोरीचे सामान घेऊन अजमेर, राजस्थान ला जात आहे. नंतर पोलिसांच्या टीममधील काही लोकं विमानमार्गे अजमेरला पोहोचले. तिथे अजमेर प्लॅटफॉर्मवर त्यांनी कुशलला अटक केली आणि त्याला विमानमार्गे घेऊन पुन्हा बँगलोरला आणले. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने ‘टाइम नाऊ’ शी बोलताना सांगितले कि कुशल पहिल्यांदाच बँगलोरला आला होता. त्याचे ह्या अगोदर कोणतेच क्राईम रेकॉर्ड नाही आहे. त्याला फक्त लवकरात लवकर पैसे मिळवून सुखी जीवन जगायचे होते. त्यामुळे त्याने हा चोरीचा मार्ग अवलंबला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *