कुछ कुछ होता है मधली अंजली आता पहा किती सुंदर दिसते

मित्रांनो १९९८ मध्ये आलेला शाहरुख खान, काजोल आणि रानी मुखर्जी ह्यांचा चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ तर तुम्हांला माहितीच असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपरहिट झाला होता. ह्या चित्रपटांत तीन कलाकारांव्यतिरिक्त अजून एक मुख्य कॅरॅक्टर होते ते म्हणजे शाहरुखची मुलगी अंजलीचे. तिने चित्रपटांत एका चुलबुली मुलीची भूमिका साकारून प्रत्येकाच्या मनात जागा बनवली होती. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचे वय केवळ ८ ते ९ होते. इतक्या लहान वयात इतकी समजदार भूमिका निभावल्यामुळे अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले होते. ह्या चित्रपटातील अभिनयामुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. तिने त्यानंतर काही चित्रपटांत काम सुद्धा केले. काही काळानंतर ती बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर गेली. परंतु ‘कुछ कुछ होता है’ मधून प्रत्येकाच्या मनात जागा बनवणारी हि छोटी अंजली आता कुठे आहे, काय करते आणि कशी दिसते हे आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटांत छोट्या अंजलीची भूमिका निभावणाऱ्या ह्या अभिनेत्रीचे नाव सना सईद आहे. तिचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ साली मुंबईत झाला. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटांत बालकलाकाराच्या रूपात तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर २००० साली आलेल्या ‘बादल’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’ चित्रपटांत सुद्धा तिने काम केलेले आहे. ह्या तीन चित्रपटानंतर ती खूप काळ मोठ्या पडद्यावर दिसली नाही. नंतर एक मोठ्या ब्रेक नंतर २०१२ मध्ये रिलीज झालेल्या करन जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ मध्ये ती दिसून आली. ह्या चित्रपटात तिने तिच्या बोल्ड भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. ह्या चित्रपटात ती वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलीया भट्ट ह्यांच्या बरोबर मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपटांव्यतिरिक्त सनाने अनेक टेलिव्हिजन शो केले आहेत. ‘बाबुल का आंगन छुटे ना’, ‘लो हो गायी पूजा इस घर कि’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘लाल इष्क’ ह्यासारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलेले आहे.ह्या व्यतिरिक्त तिने अनेक रिऍलिटी शो जसे ‘झलक दिखला जा ६’, ‘झलक दिखला जा ७’, ‘नच बलिये ७’, ‘झलक दिखला जा ९’, ‘खतरों के खिलाडी’ ह्या मध्ये काम केलेले आहे. २००८ मध्ये ती झी टीव्ही च्या ‘जझ बात’ मालिकेत दिसली होती. एक चांगली अभिनेत्री असण्यासोबत ती एक चांगली डान्सर सुद्धा आहे. दिसायला ती पहिल्यासारखी क्युट तर आहेच, पण आजसुद्धा ती बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. ती सध्या पूर्णपणे आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच तिने अनेक ब्रँडच्या मॉडेलिंग साठी काम केलेले आहे. सना सोशिअल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती नियमीत आपले अपडेट्स आणि फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचा आगामी चित्रपट ‘स्ट्रेन्जर ग्रुप’ मध्ये ती काम करत असून, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *