निर्माता बनण्याआधी रोहित शेट्टी या अभिनेत्रीच्या साडीला इस्त्री करायचा

असं म्हणतात कि सोनं भट्टीत तापलं कि त्याची चमक आणि मूल्य सर्वांचे मन मोहून घेते, हीच गोष्ट माणसाच्या यशालाही लागू होते. मेहनत आणि संघर्ष ह्यांच्या आधारावर जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचता येऊ शकते. आपली चित्रपटसृष्टी सुद्धा ह्याला अपवाद नाही आहे. ग्लॅमरच्या चंदेरी नगरी मध्ये लोकप्रिय ठरलेल्या प्रत्येक स्टार्सच्या मागे संघर्षाची एक भलीमोठी कहाणी लपलेली आहे. अशीच एक कहाणी आताचे यशस्वी डायरेक्टर रोहित शेट्टीची आहे. ज्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टीने स्वतः केला आहे. गोलमाल सारख्या सुपरहिट चित्रपटांची सिरीज देणाऱ्या रोहित शेट्टीने सांगितले कि एका जमान्यात तो तब्बू, काजोल सारख्या हिरोईनच्या स्पॉटबॉय चे काम करायचा. चला तर ‘चेन्‍नई एक्‍सप्रैस’, ‘दिलवाले’, ‘सिंघम’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचा डायरेक्टर रोहित शेट्टीच्या जीवनातील संघर्षमय सत्य पाहूया.

आपल्या सुपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवणाऱ्या रोहित शेट्टी सोबत काम करण्यासाठी आताच्या काळात मोठे मोठे स्टार्स वाट पाहत आहेत. आपल्या चित्रपटांत ऍक्शन आणि कॉमेडीचा तडका लावून लोकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या रोहितला आज एक यशस्वी डायरेक्टरच्या रूपात सर्वच जण ओळखतात, परंतु भरपूर कमी लोकांना माहिती आहे कि रोहित कधी स्पॉट बॉयचे काम करत होता. खरंतर ह्या गोष्टीचा खुलासा रोहित शेट्टीने ‘इंडियाज नेक्‍स्‍ट सुपरस्‍टार’ ह्या रिऍलिटी शो च्या दरम्यान केला आहे. शो मध्ये रोहितने आपल्या चित्रपट करियरच्या स्ट्रगलच्या आठवणी सांगताना सांगितले कि, १९९५ मध्ये आलेल्या अजय देवगण आणि तब्बू ह्यांच्या ‘हकीकत’ चित्रपटासाठी रोहित शेट्टी स्पॉट बॉय होता आणि त्यावेळी तो अभिनेत्री तब्बूच्या साडींना प्रेस करण्याचे काम कराचा. आणि नशीब म्हणाल तर त्याच रोहित शेट्टी ने अजय आणि तब्बूला घेऊन ‘गोलमाल अगेन’ हा सुपरहिट चित्रपट बनवला. तसेच काजोल आणि शाहरुख सोबत ‘दिलवाले’ चित्रपट बनवणारे रोहीतने एकेकाळी स्पॉट बॉयचे काम करताना काजोलचे मेकअप आणि केसांचं सेटअप सुद्धा केले आहे.तसेच रोहित शेट्टीने अजय देवगणच्या ‘फूल और कांटे’, ‘सुहाग’, ‘प्‍यार तो होना ही था’ आणि ‘राजू चाचा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टरच्या स्वरूपात काम केले आहे. हेच कारण आहे कि इतक्या मोठ्या संघर्षानंतर डायरेक्टरचे काम करताना सुद्धा रोहित आज आपल्या चित्रपटांत प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर नजर ठेवून असतो, आणि त्यामुळेच त्याचे चित्रपट सुपरडुपरहिट ठरत आहेत. रोहितच्या चित्रपटासाठी चाहते सुद्धा अधीरतेने प्रतीक्षा करत असतात. रोहित शेट्टीच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. प्रेक्षकही त्याचे चित्रपट एन्जॉय करत असतात. तसेतर रोहित आपल्या चित्रपटात जबरदस्त ऍक्शन सिन साठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांत उडणाऱ्या गाड्या आणि धमक्यांचे सिन हमखास असतातच. एकेकाळी स्पॉटबॉय असणारा रोहित शेट्टीने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *