NMJOKE

क्रांती रेडकर आहे याची मालकीण आणि तिचा नवरा काय करतो तुम्हीच पहा

क्रांती रेडकर हे नाव मराठी सिनेरसिकांसाठी काही नवीन नाव नाही. क्रांतीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. ‘जत्रा’ चित्रपटापासून तिला खरी लोकप्रियता मिळाली. चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही काम केलेले आहे. क्रांतीने २९ मार्च २०१७ ला समीर वानखेडे ह्या आयपीएस अधिकाऱ्याशी लग्न केले. तिने लग्नाविषयी खूपच गुप्तता पाळली होती. तिच्या लग्नात जवळचे काही मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. या बद्दल सांगताना ती म्हणाली कि माझे पती देश सेवेत असल्यामुळे त्यांची ओळख उघड करणे खूपच अवघड आहे आणि त्यामुळेच आम्ही दोघांनी अगदी सध्या पद्धतीने लग्न केले. मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायला आवडते. त्यामुळे माझ्यातील वेडेपणा आयुष्यभर राहू देणारा नवरा मला मिळायला पाहिजे, असे माझ्या मैत्रिणींना नेहमीच वाटायचे आणि तो तसाच आहे. लग्नानंतर ती संसारात रमली. गेल्याच वर्षी तिने जुळ्या मुलींना जन्म दिला.

आजच्या काळात कलाकार मंडळी अभिनयाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्येही लक्ष देऊ लागले आहेत. एक चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच क्रांती रेडकरने चित्रपटात दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून सुद्धा काम केले आहे. परंतु आता ती ह्या व्यतिरिक्त स्वतःचा साईड बिजनेससुद्धा करत आहे. तिने ह्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यातच आपल्या ब्रँडचे उदघाटन केले. तिने स्वतःचे फॅशन ब्रँड लाँच केले आहे. तिच्या ह्या क्लोथिंग ब्रँडचे नाव ‘ZZ झिया झायदा’ आहे. क्रांतीने ब्रँडचे नाव ठेवण्यामागे एक खास कारण आहे. ‘zz झिया झायदा’ नावाशी तिचे खास कनेक्शन सुद्धा आहे. कारण तिच्या मुलींची नावे ह्या ब्रँडशी जोडली गेली आहेत. ह्या ब्रॅण्डच्या उदघाटनाला मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्री आणि तिच्या जवळच्या लोकांनी उपस्थिती लावली होती. सुचित्रा बांदेकर, ऋजुता देशमुख, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर आणि हर्षदा खानविलकर ह्यासारख्या अभिनेत्री तिच्या ब्रँड उदघाटनाला उपस्थित होत्या.क्रांती ब्रॅण्डच्या उभारणीसाठी ‘अ‍क्षय बर्दापूर’च्या प्लॅनेट टॅलेंटशी जोडली गेली आहे. क्रांती नवीन काहीतरी करण्याच्या हेतूने एका प्लॅटफॉर्मच्या शोधात होती जिथे तिच्या नवीन कल्पना, योजना समजून घेतल्या जातील. ती अश्याप्रकारच्या नवीन टॅलेंटच्या शोधात असतानाच तिची भेट अक्षय बर्दापूरकर आणि ‘प्लॅनेट टॅलेंट’ सोबत झाली. क्रांतीला ज्याप्रकारचा प्लॅटफॉर्म हवा होता तसाच प्लॅटफॉर्म तिला ‘प्लॅनेट टॅलेंट’ च्या माध्यमातून मिळाला. आणि त्यांच्या माध्यमाच्या मदतीने तिने तिच्यातील टॅलेंट प्रेक्षकांसमोर आणले. त्यामुळे ‘ZZ ZIYA ZYDA’ च्या माध्यमातून क्रांतीच्या क्रिएटीव्हीटीचा आस्वाद घेता येईल यात शंका नाही. म्हणजेच आता अभिनया सोबतच स्वतःचा वेगळा बिझनेसचा हा नवीन ट्रेंड बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच मराठी कलाकारांमध्येसुद्धा पाहायला मिळत आहे. क्रांतीला तिच्या ह्या नवीन बिझनेस साठी आपल्या मराठी गप्पा कडून हार्दिक शुभेच्छा.
Exit mobile version