NMJOKE

रीमा लागू यांची मुलगी पहा किती सुंदर दिसते आणि काय करते

रिमा लागू ह्या बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे अनेक मालिका आणि नाटकंही त्यांनी गाजवली. रीमा लागू ह्यांचे खरे नाव नयन भडभडे. त्यांनी मुंबईमधील विल्सन महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी नाटकात काम करणे सुरु केले. त्यादरम्यानच्या त्यांनी श्याम बेनेगल ह्यांच्या एका जाहिरातीत काम केले. हि जाहिरात खूप गाजल्यामुळे त्यांनी मग ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे ठरवले. त्याच दरम्यान त्या बँकेत सुद्धा कामाला होत्या. परंतु त्यामुळे त्यांना अभिनयाकडे फारसा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे नोकरी सोडून त्यांनी अभिनयासाठी वेळ दिला. त्याच दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि त्यांच्या बँकेतील सहकारी विवेक लागू ह्यांच्याशी लग्न केले. अश्याप्रकारे नयन भडभडे रीमा लागू झाल्या. परंतु त्यांचा विवाह अधिक काळ टिकू शकला नाही. परंतु त्यांनी त्यांचे रिमा लागू हेच नाव कायम ठेवले.

रीमा लागू ह्यांचा जन्म २१ जून १९५८ साली मुंबई मध्ये झाला. १९७९ साली आलेल्या ‘सिंहासन’ ह्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. तर १९८५ साली आलेल्या ‘खानदान’ ह्या मालिकेतून त्यांनी हिंदी टेलिव्हिजन मध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर ‘श्रीमान श्रीमती’ ह्या मालिकेत त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांत काम केले. १९९४ साली आलेल्या ‘तू तू मैं मैं’ ह्या मालिकेत त्यांनी सुप्रिया पिळगावकरसोबत सासू सुनेची जोडी बनून प्रेक्षकांना खूप हसवले. हि मालिका खूपच गाजली. तर बॉलिवूडमध्ये ‘हम आपके है कौन’ ह्या चित्रपटातील अभिनयामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘वास्तव’, ‘मैने प्यार किया’, ‘साजन’, ‘जय किशन’, ‘हम साथ साथ है’ ह्यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत सलमान खानच्या आईची भूमिका त्यांनी साकारली. रीमा लागू ह्यांनी १८ मे २०१७ साली कोकिलाबेन रुग्णालयातून जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्या फक्त ५९ वर्षाच्या होत्या.रिमा लागू ह्यांच्या मुलीचे नाव मृण्मयी. ती देखील एक अभिनेत्री आहे. २०१० साली आलेल्या ‘हॅलो जिंदगी’ ह्या हिंदी चित्रपटांत मृण्मयीने काम केलेले आहे. त्याचप्रमाणे ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ चित्रपटात तिने पुष्कर ओकच्या पत्नीची भूमिका निभावली होती. ह्या चित्रपटातील कामासाठी तिला अजूनही आठवले जाते. ह्या चित्रपटात मकरंद अनासपुरे सोबत प्रसाद आणि मृण्मयीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्याचप्रमाणे ‘बायको’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’ ह्या निवडक मराठी चित्रपटांत तिने काम केलेले आहे. चित्रपटांत अभिनयाव्यतिरिक्त तिने सेकंड युनिट डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून ‘तलाश’, ‘थ्री इडियट्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारख्या चित्रपटांसाठी काम केलेले आहे. त्याच सोबत तिने ‘दंगल’, ‘जेट ट्रॅश’, ‘पीके’, ‘गुलाब गॅंग’ ह्यासारख्या चित्रपटांसाठी स्क्रिप्ट सुपरवाईसर म्हणून काम केलेले आहे. मृण्मयीने १ डिसेंबर २०१४ साली विनय वायकुळ ह्या असिस्टंट डायरेक्टर सोबत लग्न केले. दोघंही मुंबईत राहतात. तर अश्या ह्या गुणी अभिनेत्रीला मराठी गप्पा कडून तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Exit mobile version