बॉलिवूड मध्ये साईड डान्सर म्हणून केले काम आज आहे मराठीतला लोकप्रिय अभिनेता

मित्रांनो तुम्हांला झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका तर माहिती असेलच. हि मालिका सुरु झाल्यापासूनच मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर खूप आधीपासूनच राज्य केलं आहे. मालिकेतील राणादा आणि पाठक बाई तर प्रत्येकाच्या कुटुंबाचा जणू भागच बनले आहेत. राणा आणि पाठकबाईच्या ह्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रालाच वेड लावले. दोघांची प्रेमकथा फारच सुदंर रीतीने दाखवण्यात आलेली आहे. मालिकेत राणा दा अशिक्षित तर अंजली शिक्षिका असते. राणाचे अंजली वर प्रेम होते त्यानंतर दोघांचे लग्न सुद्धा होते. ‘चालतंय कि’ म्हणत प्रत्यके गोष्ट पूर्ण करणाऱ्या रानाला पाठकबाई लिहायला वाचायला सुद्धा शिकवते. ह्या मालिकेत दर आठवड्याला नवीन नवीन वळणं येत आहेत. त्यामुळे ह्या मालिकेची कथा सुद्धा फारच इंटरेस्टिंग बनल्यामुळे शो ला सुद्धा चांगलाच टीआरपी मिळत आहे. मालिकेतील हा राणादा म्हणजेच खऱ्या आयुष्यातील हार्दिक जोशी. त्याने बॉलिवूडच्या चित्रपटात साईड डान्सर म्हणून केले होते काम. तो चित्रपट कोणता होता आणि त्याचप्रमाणे त्याने ह्या अगोदर सुद्धा मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेले आहे. चला तर त्याच्याबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.

६ ऑक्टोबर १९८८ ला हार्दिकचा जन्म झाला. शाळेतील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने २००९ साली मुंबईमधील माटुंगा येथील खालसा कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याला मोटारबाईक्सची आवड असून तो स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या अगोदरसुद्धा त्याने काही मालिकांमध्ये काम केलेले आहे. ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ ह्यासारख्या मराठी मालिकांमध्ये त्याने छोट्या मोठ्या भूमिका केलेल्या आहेत. त्याशिवाय त्याने ‘क्राईम पेट्रोल’ ह्या हिंदी शो मध्ये पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्याने मराठी चित्रपटात सुद्धा काम केलेले आहे. मकरंद अनासपुरेच्या ‘रंगा पतंगा’ चित्रपटात त्याने एसीपी पाठक नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याला अभिनयाव्यतिरिक्त ढोल ताशा पथकाचे फार वेड आहे. तो ‘मौर्य ढोल ताशा पथका’ चा सदस्य सुद्धा आहे. त्याचा ढोलताश्या मधील वाद्य पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करतात.मालिकेत येण्यापूर्वी हार्दिक जोशीने खूप संघर्ष केलेला आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि तो एक उत्कृष्ठ डान्सर सुद्धा आहे. त्याने बॉलिवूडमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून सुद्धा काम केलेले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य ह्यांच्या हाथाखाली अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ ह्या चित्रपटाच्या गाण्यात हार्दिक जोशीने साईड डान्सर म्हणून काम केलेले आहे. ह्या चित्रपटाच्या टायटल सॉंग मध्ये त्याने काम केले असून त्याचा फोटोही त्याने त्याच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर ‘माय वर्क’ असे कॅप्शन ठेवून शेअर केलेला आहे. त्यानंतर त्याने अनेक सीरिअल्स आणि चित्रपटांसाठी ऑडिशन्सही दिले. त्याला क्राईम पेट्रोलच्या एका एपिसोडमध्ये भूमिका मिळाली होती. परंतु त्यानंतर हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. त्यानंतर त्याला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. परंतु त्याचा आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ हि मालिका. ह्या मालिकेमुळे हार्दिक जोशी महाराष्ट्रातील लोकांच्या घराघरांत पोहोचला. ५ फूट ११ इंच उंचीचा, पिळदार शरीरयष्टीचा, हँडसम पर्सनॅलिटीचा हार्दिक जोशी आता संपूर्ण महाराष्ट्रात राणादा म्हणूनच लोकप्रिय झालेला आहे. त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून हार्दिक शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *