Home / कलाकार / लालबाग परळ मधली मामी आहे मोठी बॉलिवूड अभिनेत्री पहा

लालबाग परळ मधली मामी आहे मोठी बॉलिवूड अभिनेत्री पहा

तुम्हांला लालबाग परळ चित्रपटातली मामी तर लक्षात असेलच. ह्या चित्रपटात भडक दृश्यांमुळे ती खूप चर्चेत आली होती. परंतु तुम्हांला माहिती आहे का ती हिंदी चित्रपटातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. इतकंच नाही तर तिचा पती सुद्धा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय विनोदी अभिनेता असून तो गोविंदाचा भाचा आहे. तर मित्रांनो ह्या अभिनेत्रीचे नाव आहे कश्मिरा शाह. कश्मिराचा जन्म २ डिसेंबर १९७१ मध्ये मुंबईत झाला. कश्मिरा मराठी-गुजराती कुटुंबातून असून ती लोकप्रिय शास्त्रीय गायिका अंजनीबाई लोलकेर ह्यांच्या नात आहेत. तिने आपले शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. तिने १९९४ मध्ये हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने १९९६ पासून चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. अभिनयासोबतच ती एक चांगली मॉडेल आणि डान्सर सुद्धा आहे. मॉडेल असताना तिने ‘मिस युनिव्हर्सिटी वर्ल्ड’ आणि ‘मिस इंडिया टॅलेंट’ सारखे पुरस्कार ती जिंकली आहे. त्याचबरोबर कश्मिराला शॉपिंग, पार्टी आणि फिरायला खूप आवडते.

तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. ती बिग बॉस च्या पहिल्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. २००७ मध्ये डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’ मध्ये सुद्धा तिने भाग घेतला होता. २०११ मध्ये ‘खतरों के खिलाडी’ मध्ये सुद्धा ती दिसली होती. कश्मिराने चित्रपटात मुख्य भूमिका खूपच कमी केल्या आहेत परंतु तिला छोट्या छोट्या भूमिकेत जास्त वेळा पाहिले गेले आहे. कश्मिराने शाहरुख खानच्या ‘यस बॉस’ चित्रपटात सिमा चौधरीचे कॅरॅक्टर साकारले होते. ह्या व्यतिरिक्त ‘प्यार तो होना ही था’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘हेरा फेरी’, ‘कही प्यार ना हो जाए’, ‘लालबाग परळ’, ‘रेवती’, ‘जंगल’, ‘शिकारी’ ह्यासारख्या लोकप्रिय हिंदी आणि मराठी चित्रपटांत तिने काम केलेले आहे. ह्याच बरोबर तिने ‘कुरुक्षेत्र’ चित्रपटांत ‘बंथन’, ‘मर्डर’ चित्रपटात ‘दिल को हज़ार बार रोका’ ह्यासारख्या अनेक लोकप्रिय आयटम सॉंग वर नृत्य केले आहे.कश्मिराच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तिने सर्वात अगोदर कॅलिफोर्नियाच्या चित्रपट दिग्दर्शक ‘ब्रॅड लिस्टरमॅन’ला काही वर्षे डेट केल्यानंतर २००२ मध्ये दोघांनी लग्न केले. परंतु लग्नाच्या काही वर्षातच दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. त्यामुळे २००७ ला ते वेगळे झाली. त्यानंतर ती हिंदी टेलिव्हीजन अभिनेता आणि कॉमेडियन ‘कृष्णा अभिषेक’ ला डेट करू लागली. कृष्णा हा लोकप्रिय अभिनेता गोविंदा ह्याचा भाचा आहे. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. कश्मिरा आणि कृष्णा दोघानांही २ मुले आहेत. डान्स, मॉडेल आणि अभिनयाव्यतिरिक्त ती आता प्रोड्युसर क्षेत्रात सुद्धा वळली आहे. ह्याच वर्षी तिने पती कृष्णा सोबत ‘मरने भी दो यारो’ हा चित्रपट प्रोड्युस केला होता. ह्या चित्रपटात कश्मिरा आणि कृष्णाच्या मुख्य भूमिका सुद्धा होत्या. आपल्या मराठी गप्पा करून कश्मिराला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.