बालकपालक मधील डॉली आता मोठी झाले आहे पहा किती सुंदर दिसते

रवी जाधवचा ४ जानेवारी २०१३ मध्ये आलेला ‘बालकपालक’ चित्रपट तर तुम्हांला आठवत असेलच. एक वेगळाच विषय घेऊन येणाऱ्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली. चित्रपट लहान मुलांवर आधारित असून बालवयात मुलांना पडलेले प्रश्न आणि ते उत्तरे मिळवण्यासाठी ह्या मुलांनी केलेली धडपड ह्या चित्रपटात ज्या पद्धतीने सादर केली गेली त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. ह्या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रथमेश परब, मदन देवधर ह्यासारख्या कलाकारांनी भूमिका निभावल्या होत्या. ह्या चित्रपटात अजून एका बालकलाकाराने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. ती भूमिका होती डॉलीची. अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने ह्या चित्रपटात डॉलीची भूमिका निभावली होती. दरम्यानच्या काळात ती आता मोठी झाली असून खूपच सुंदर दिसत आहे. आजच्या लेखात आपण बालकपालक चित्रपटात डॉलीची भूमिका साकारणाऱ्या शाश्वती पिंपळीकर हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

शाश्वती पिंपळीकर हीचा जन्म १६ नोव्हेंबर १९९६ मध्ये पुण्यात झाला असून ती लहानाची मोठी पुण्यातच झालेली आहे. तिचे बालपण पुण्यातच गेले. तिने तिचे प्राथमिक शिक्षण रोझरी हायस्कुल मधून पूर्ण केले असून तिने IGNOU मधून English Literature मध्ये आपले BA पूर्ण केले आहे. बालपणी अभिनयक्षेत्रात काम करायचे असं काही तिने ठरवलं नव्हतं. बालपणापासूनच नाटकात काम करायला सुरुवात केली. सातवीत असताना तिने रंगभूमीवर ‘रायगडला जेव्हा जग यते’ ह्या नाटकात काम केले. परंतु आठवीत असताना तिला ‘बंध रेशमाचे’ ह्या मालिकेत बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या मालिकेत तिने केवळ ४ महिने काम केले. त्यानंतर तिला लगेच बालकपालक चित्रपटाची ऑफर आली. ह्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी ती नववीत होती. ह्याच चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. हा चित्रपट तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर तिने मात्र आपले करियर अभिनयक्षेत्रातच करायचे असे ठरवले. त्यानंतर तिने ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ आणि ‘चाहूल’ ह्यासारख्या टीव्ही मालिका केल्या. तिने ‘देहभान’ ह्या नाटकामध्ये सुद्धा काम केलेले आहे. त्यानंतर तिने ‘मधु इथे चंद्र तिथे’, ‘हेडलाईन’ ह्या मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत.आपल्या चित्रपट करिअर विषयी बोलताना तिने सांगितले कि, ‘मला माहीत आहे की, या क्षेत्रात दररोज आपलं नशीब अजमावायला अनेक जण येत असतात, पण एवढया कमी वयात या क्षेत्रात येऊ इच्छिणारे फार कमी असतील. पण मला ही रिस्क घ्यायची आहे त्याचं तेच तर कारण आहे. त्यामुळे यात नुकसान झालं तर तेही कमी असेल,’’ ती एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे. जर अभिनयात आले नसते तर तिने डान्समध्येच करिअर केले असते असं ती सांगते. तिला हिंदी मालिकेमध्येही काम करायचे असल्याचे ती म्हणाली. ती आता फक्त मराठी चॅनेलवरील ‘सिंधू’ ह्या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ह्या मालिकेत ती पारंपरिक वेशभूषेत आपल्याला दिसत आहे. परंतु खऱ्या जीवनात ती खूपच मॉडर्न आहे. ती सोशिअल मीडियावर तिचे अनेक मॉडर्न फोटोज शेअर करत असते. पुण्याची असल्यामुळे तिला ढोल वादकांची खूप आवड आहे. गेणेशोत्सवाच्या काळात ती ‘कलावंत ढोलताशे’ ह्या पथकात गेल्या ५ वर्षांपासून ढोल वादक आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी ती तब्बल दहा दहा तास उभे राहून ढोल वाजवत असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *