धडाकेबाज मधील कवट्या महाकाल कोण होता पहा

तुम्हांला १९९० साली आलेला ‘धडाकेबाज’ चित्रपट तर आठवत असेलच. महेश कोठारे ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ह्या चित्रपटांत लक्ष्मी कांत बेर्डे ह्यांनी डबल रोल केला होता. ज्यात लक्ष्याला एक बाटली सापडते आणि त्या बाटलीत छोटा गंगाराम अडकलेला असतो. जो अगदी लक्ष्या सारखा दिसतो. त्या बाटलीत जोपर्यंत वाळू असते तोपर्यंत तो लक्ष्याची मदत करतो. जेव्हा जेव्हा लक्ष्या संकटात सापडतो तेव्हा तेव्हा हा गंगाराम त्याला त्या परिस्थितीतून सोडवतो. परंतु जेव्हा ती वाळू संपेल तेव्हा तो निघून जाईल. ह्या भावनिक कथेवर चित्रपटाचा पाया होता. अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट खूपच जास्त गाजला. ह्या चित्रपटांत लक्ष्या सोबत महेश कोठारे, अश्विनी भावे, दीपक साळवी ह्यांनी मुख्य भूमिका निभावल्या होत्या. परंतु ह्या चित्रपटांत अजून एक कॅरॅक्टर होते. ज्यामुळे चित्रपट तर गाजलाच परंतु ते कॅरॅक्टर सुद्धा खूप गाजले. ते कॅरॅक्टर म्हणजेच कवट्या महाकाळ. चित्रपटांत व्हिलनचे पात्र असूनही ते कॅरॅक्टर अजरामर झाले. ह्या कॅरॅक्टरमधील व्हिलनची तुलना तब्बल शोलेतल्या गब्बर सिंग सोबत सुद्धा केली जाते. धडाकेबाज चित्रपट थरारक बनवणारे हे पात्र, परंतु संपूर्ण चित्रपटात त्याला मुखवट्यामध्येच दाखवण्यात आले. चित्रपटात एकदाही कवट्या महाकाळचा चेहरा दिसला नाही. चित्रपट पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडला होता कि कवट्या महाकाळचे कॅरॅक्टर नक्की कोणी साकारले आहे. चला तर आजच्या लेखात आपण ह्याबद्दल जाणून घेऊया.

चित्रपटात कवट्या महाकाळची भूमिका कोणी निभावली ते तर आपण जाणणारच आहोत, त्याअगोदर ‘धडाकेबाज’ चित्रपटात कवट्या महाकाळ हे पात्र कसं आलं त्याचं गमतीदार किसा आपण पाहूया. महेश कोठारे ह्यांच्या चित्रपटातील व्हिलनची नावे तशी अतरंगी आणि खूप क्रिएटिव्ह अशीच असायची. उदारणार्थ टकलू हैवान, तात्या विंचू, खुबड्या खविस ह्यासारखे लोकप्रिय व्हिलन महेश कोठारे ह्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. कवट्या महाकाळ हे पात्र लिहिताना महेश कोठारे ह्यांनी हल्लीच एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला. त्यांच्या डोक्यात नेहमीच होते कि त्यांना एक असा व्हिलन आणायचा आहे कि त्याच्या चेहरा कधीच कोणाला दिसणार नाही. तो पूर्णपणे मुखवट्यात असेल. आणि तेही सांगाड्याच्या मुखवट्यात. त्यामुळे तो एकदम भयानक दिसेल. त्यांचे ह्याआधी रिलीज झालेल्या चित्रपट कसे व्यवसाय करत आहेत, लोकांचा त्या चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळत आहे हे पाहण्यासाठी ते अनेक ठिकाणी फिरले. एकदा ते एका गावी गेले होते त्या गावाचे नाव होते कवठे महंकळ. जेव्हा त्यांनी हे नाव पाहिले, तेव्हा त्यांना त्या नावात काहीतरी कुतूहल जाणवले. मग त्यांनी विचार केला कि त्यांना स्कल लूक म्हणजेच डोक्याची कवटी असलेला व्हिलन हवा आहे तर कवट्या महाकाळ हे नाव त्यासाठी खूप चांगले दिसेल. आणि तेथूनच मग कवट्या महाकाळचा जन्म झाला.मध्यंतरी २०१५ साली आलेल्या ‘बाहुबली’ चित्रपट पाहिल्यानंतर कट्टपाला बाहुबलीने का मा रले हा प्रश्न चांगलाच वायरल झाला होता. परंतु त्याचे उत्तर दोन वर्षांनी म्हणजेच २०१७ ला आलेल्या ‘बाहुबली २’ चित्रपटात मिळाले. परंतु त्यानंतर सोशिअल मीडियावर एक मिम्स चांगलाच वायरल झाला होता. ते मिम असे होते कि कट्ट्पाला बाहुबलीने का मा रले ह्याचे उत्तर तर मिळाले, परंतु धडाकेबाज चित्रपटांत कवट्या महाकाळ कोण होता ह्याचे उत्तर अजून २५ वर्षे झाली तरी मिळाले नाही. मग ह्यावर शेवटी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांनी उत्तर दिले. त्यांनी ट्विटरवर सांगितले कि सुरुवातीला कवट्या महाकाळची भूमिका ‘बिपीन वारती’ ह्या कलाकाराने साकारली होती. बिपीन वारती बद्दल सांगायचं झालं तर ते अभिनेते आहेतच परंतु त्याचबरोबर ते उत्कृष्ट दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांनी ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘चंगू मंगू’ आणि ‘डॉक्टर डॉक्टर’ ह्यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे. अगोदरच्या काळात कवट्या महाकाळ ह्याची भूमिका बिपीन वारती ह्यांनी केली. परंतु त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना ह्या चित्रपटासाठी वेळ देता आला नाही. त्यांना पुढे ह्या चित्रपटांत काम न करता आल्यामुळे तब्बल आठ कलाकारांनी हि भूमिका साकारली होती. इतकंच काय, चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांना सुद्धा त्या आठ कलाकारांची नावे आठवत नाहीत. परंतु हि भूमिका सुरुवातीला साकारणारा आणि त्याचा आवाज हा बिपीन वारती ह्यांचाच आहे, असे महेश कोठारे ह्यांनी सांगितले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *