अग्गबाई सासूबाई मधली मॅडी पहा किती सुंदर दिसते

झी मराठी वरील ‘अग्गबाई सासूबाई’ हि मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. ह्या मालिकेतील जवळजवळ सर्वच कलाकार लोकांना आवडत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान, निवेदिता जोशी-सराफ आणि गिरीश ओक ह्यासारखी दिग्गज कलाकारमंडळी असलेल्या ह्या मालिकेत काही नवीन कलाकार सुद्धा आहेत. अभिनेते गिरीश ओक हे ह्या मालिकेत शेफ अभिजित राजे ह्यांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या हॉटेल मध्ये मॅडी नावाची काम करणारी एक मुलगी दाखवली आहे. आजच्या लेखात आपण शेफ अभिजित राजे ह्यांच्या हॉटेल मध्ये मॅडीची भूमिका साकारणाऱ्या ह्या अभिनेत्री आणि तिच्या पती विषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हांला ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हा कॉमेडी शो तर माहितीच असेल. जर तुम्ही हा शो पाहिला असेल तर तुम्ही मॅडीची भूमिका साकारणाऱ्या ह्या अभिनेत्रीला ओळखलंच असेल.

ह्या अभिनेत्रीचे खरे नाव आहे भक्ती रत्नपारखी. भक्ती रत्नपारखी हिने ह्याअगोदर काही चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलेले आहे. परंतु सध्या तिला ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत मॅडीच्या रूपात खूप लोकप्रियता मिळत आहे. ह्या मालिकेत ती मॅडीच्या रूपात एक विनोदी व्यक्तिरेखा साकारत आहेत. ‘अग्गबाई सासूबाई’ ह्या मालिकेत मॅडीच्या भूमिकेसाठी अगोदर वेगळ्या कलाकाराची वर्णी लागली होती. परंतु त्यानंतर भक्ती रत्नपारखी हिला ह्या रोलसाठी घेण्यात आले. तिने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ह्या शो मधून प्रेक्षकांना मनमुराद हसवले. भक्तीने अक्षय कुमार आणि परेश रावल ह्यांच्यासोबत ‘ओह माय गॉड’ ह्या चित्रपटात काम केलेले आहे. ह्यासोबतच तिने ‘सी कंपनी’, ‘देऊळ’ ह्यासारख्या लोकप्रिय चित्रपटांत काम केलेले आहे. रत्नपारखी हे आडनावात वाचून तुम्हांला अंदाज आलाच असेल कि अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हि मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते निखिल रत्नपारखी ह्यांच्या पत्नी आहेत. निखिल ह्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका निभावल्या आहेत. निखिल रत्नपारखी ह्यांनी ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई कि लव्हस्टोरी’ ह्यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ ह्यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक टीव्ही शो आणि जाहिरातीत सुद्धा काम केलेले आहे.भक्ती रत्नपारखी आणि निवेदिता जोशी ह्या दोघीही ‘अग्गबाई सासूबाई’ ह्या सीरिअल मध्ये एकत्र काम करत आहेत. भक्ती हि निवेदितांची खूप मोठी फॅन असून भक्तीला त्यांच्यासोबत काम करायचे होते. काही दिवसांअगोदर भक्तीने सोशिअल मीडियावर निवेदिता जोशींबद्दल एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने लिहिलं होतं कि मी लहानपणापासूनच निवेदिता जोशींचे काम बघत आलेली आहे. मला त्यांच्यासोबत काम करायला मिळू शकेल असं जराही वाटलं नव्हतं. ‘अग्गबाई सासूबाई’ च्या ऑडिशनला जेव्हा मी गेले तेव्हा निवेदिता मॅडमने ‘तूच हे मॅडी कॅरॅक्टर करणार आणि खूप छान करणार’ असे मला सांगितले, तेव्हा माझा आत्मविश्वास खूप वाढवला. तिच्या बद्दलचा आदर अजूनच वाढला. काम करता करता ती माझी निवेदिता ताई कधी झाली हे मला सुद्धा कळलं नाही. तर अश्या भक्ती रत्नपारखी हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून मनापासून शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *