NMJOKE

अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनयासोबत मागील ११ वर्ष्यांपासून करत आहेत हा उद्योग

निवेदिता जोशी-सराफ ह्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी बालरंगभूमीपासून आपल्या कलेचा प्रवास सुरु केला. त्यांनी १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दे दणादण’ ह्या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पर्दापण केले. निवेदिता जोशी ह्या ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले आहे. त्यापैकी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर ह्यासारख्या गाजलेल्या अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेले आहे. त्यांनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदी टेलिव्हिजनवर सुद्धा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सध्या चित्रपटात चांगल्या भूमिका मिळत नसल्या कारणाने काम करणं थांबवलं असून, त्या एका चांगल्या भुमेकच्या शोधात आहेत. परंतु त्या मालिकेत काम करताना दिसत आहेत. सध्या त्या झी मराठी वरील ‘अगंबाई सासूबाई’ ह्या गाजत असलेल्या मालिकेत आसावरीची भूमिका निभावत आहेत. अभिनेते अशोक सराफ ह्यांच्यासोबात त्यांनी लग्न केले. त्यांना जेव्हा मुले झाली, त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे थांबवले होते. त्या वैवाहिक जीवन आणि मुलांच्या पालनपोषणात खूप व्यस्त होत्या. त्यादरम्यानच्या काळात त्या चित्रपटांत काम न करता आपल्या आवडीचा एक व्यवसाय करत होत्या. आजच्या लेखात आपण निवेदिता जोशींच्या त्याच साईड बिजनेस बद्दल जाणून घेणार आहोत.

त्यांना पहिल्या पासूनच साड्यांची खूप आवड होती. नवीन साड्या, त्यांचे वेगवेगळे डिझाइन्स आणि त्यांचे रंग ह्या निवेदितांना खूप आवडत असे. बाळंतपणानंतर त्यांना खूप मोकळा वेळ मिळाला होता. ह्यादरम्यान साड्यांचा व्यवसायाची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. पती अशोक सराफ ह्यांच्यासोबत त्यांनी ह्याबाबत चर्चा केली. पतीचा होकार मिळताच त्यांनी ह्या बिझनेसला सुरुवात केली. अगोदर त्या सर्व साड्या रेडिमेड घ्यायच्या आणि त्यांची विक्री करायच्या. परंतु असं करत असताना त्यांना लक्षात आले कि अनेक स्त्रियांना साड्या नेसता येत नाही. त्याचप्रमाणे साडी नेसताना वेळही खूप लागतो. ह्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतःच साडी डिझाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डिझाईन केलेल्या साड्या कोणत्याही ड्रेसवर घालू शकतात असे त्या म्हणतात. अगदी स्कर्टवर सुद्धा. त्यांनी डिझाईन केलेल्या साड्या घालायला फक्त ३० सेकंड इतकाच वेळ लागतो. साड्यांच्या बिजनेसबाबतची कल्पना कशी आली हे सांगताना त्या म्हणाल्या, चित्रपट सृष्टीत असताना मला साडय़ांमधील आवड निर्माण झाली. वेगळय़ा साडी घालण्याची हौस होती. एका कार्यक्रमामध्ये अशी एका प्रकारची आकर्षक शिवलेली साडी परिधान करायला मिळाली तेव्हापासून मला साडीची आवढ निर्माण झाली. गेल्या दहा वर्षापासून मी हा व्यवसाय करत आहे. माझ्या ब्रँडचा मथळा आहे ‘डिसाईन सारीईज इन ऍफोरडेबल रेट’ कमी किंमतीत महिलांना चांगल्या दर्जाची साडी देणे हा उद्देश आहे.हा बिझनेस त्या गेल्या ११ वर्षांपासून करत असून, त्या जवळजवळ ५ वर्षांपासून स्वतः डिझाईन केलेल्या साड्या विकत आहेत. त्यांनी ह्या साड्यांच्या ब्रँडला ‘हंसगामिनी’ असे नाव दिलेले आहे. त्यांचे पती अशोक सराफ ह्यांनीच हे नाव सुचवल्याचे त्या सांगतात. त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या ब्रँडचे प्रदर्शन ठेवले होते. ह्या ब्रँडमध्ये त्या सर्व प्रकारच्या साड्या विकत आहेत. ह्या ब्रँड मध्ये कमीत कमी किंमतीत डिझायनर्स साड्या मिळतात. साडी हा पोशाख अगदी गरिबांपासून ते श्रीमंतपर्यंत परिधान केला जातो. परंतु सध्याच्या घडीला साड्यांची किंमत अवाढव्य असल्यामुळे अनेकांना डिझायनर्स साड्या विकत घेता येत नाही. ह्यामुळे हास्यगामिनी ब्रँडतर्फे त्या कमीत कमी किंमतीत मिळून सर्वांना त्याचा फायदा व्हावा हा त्यामागे उद्देश असल्याचे त्या सांगतात. त्यांनी ह्या व्यायसायात अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध दिली. हा ब्रँड ग्रेस फॉरेव्हर ह्या एकत्रित प्रकल्पाचा एक भाग आहे. आपल्या ह्या प्रवासाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “कठोर परिश्रम, आत्मविश्वास तसेच ध्येय या तीन गोष्टी केल्या तर कुठलीच गोष्ट अशक्य होणार नाही. कुठल्या गोष्टीत आवड आहे त्यात लक्ष केंदीत करा. मला लहानपणापासून आईवडीलांचे तसेच गुरुजनांचे मार्गदर्शन लाभल्याने आज चित्रपट सृष्टीत तसेच एक उत्कृष्ट उद्योजिकता होण्याचा मान मिळाला.”
Exit mobile version