aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

गिरीश ओक यांची मुलगी पहा किती सुंदर दिसते, अमीर खान सोबत केले आहे

मित्रांनो झी मराठीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ हि मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. ह्या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘अग्गबाई सासूबाई’ ह्या मालिकेत शेफ अभिजित राजे ह्यांची भूमिका निभावली आहे ती लोकप्रिय अभिनेते गिरीश ओक ह्यांनी. ह्या मालिकेत ते एक महत्वाचे पात्र आहेत. अभिनेते गिरीश ओक म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्यांच्या अभिनयातील सहजता, देहबोली, शब्दफेक आणि हावभाव ह्यामुळे ते केवळ एक अभिनेतेच न राहता एक जिवंत व्यक्तिरेखा वाटतात. ह्यापूर्वी त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलेले आहे. मराठी चित्रपटांतील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यविषयी जाणून घेऊया. ते मूळचे नागपूरचे असून त्यांनी पुरुषोत्तम इंग्लिश मिडीयम स्कुल ह्या शाळेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एका सरकारी महाविद्यालयातीन मेडिकलची डिग्री प्राप्त केली. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. परंतु त्यांना अभिनयक्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांनी १९८४ साली रंगभूमीवर पाऊल ठेवले. ‘युटर्न’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘श्री तशी सौ’, ‘कहानी मे ट्विस्ट’ ह्यासारखी अनेक नाटकं त्यांनी गाजवली. त्याचबरोबरच त्यांनी अनेक मालिकांमध्ये कामे केलीत. त्यापैकी ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘दुहेरी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘अग्निहोत्र’, ‘अरे संसार संसार’ ह्यासारख्या लोकप्रिय मालिकेत त्यांनी काम केलेले आहे. गिरीश ओक ह्यांचे दोन लग्न झालेली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक आहे. त्यांचे दुसरे लग्न पल्लवी ओक ह्यांच्याशी २३ मार्च २००८ मध्ये झाले. दुसरी पत्नी पल्लवी पाठक हिच्यापासून त्यांना दुर्गा नावाची लहान मुलगी आहे. सध्या दुर्गा हि लंडनमध्ये असून तेथील महाविद्यालयात ती तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. सध्या गिरीश ओक हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत ठाण्यात राहत असून ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेची शूटिंग सुद्धा ठाण्यातच चालू आहे. अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी पहिल्या पत्नी पद्मश्री पाठक ह्यांच्यासोबत लग्न केले. गिरीश ओक ह्यांना पहिल्या पत्नी पद्मश्री पाठक ह्यांच्यापासून जी मुलगी झाली, ती मुलगी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले. गिरिजचा जन्म २७ डिसेंबर १९८७ साली नागपूरमध्ये झाला. गिरिजाने वयाच्या १५ व्या वर्षीच रुपेरी पडद्यावर काम केले. मुख्य अभिनेत्री म्हणून तिने ‘लज्जा’ ह्या मराठी मालिकेतून पर्दापण केले. ह्या मालिकेत तिने मुक्ता बर्वे, तेजश्री प्रधान ह्यांच्यासोबत काम केले.गिरिजाने अनेक मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे तिने मालिका आणि जाहिरातीत सुद्धा काम केलेले आहे. आपल्या वडिलांसारखी ती सुद्दा लोकप्रिय कलाकार असून तिने आपल्या अभिनयाचा ठसा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत उमटवला आहे. गिरीजा सध्या ‘लेडीज स्पेशल’ ह्या हिंदी सीरिअलमुळे खूप चर्चेत आहे. ती सिद्धार्थ जाधवसोबत ‘हुप्पा हुय्या’ ह्या चित्रपटामुळे जास्त लोकप्रिय झाली. तिने मराठी मध्ये ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘मानिनी’, ‘गुलमोहर’, ‘अडगुळा मडगुळा’, ‘नवरा माझा भवरा’ ह्यासारखे चित्रपट केलेत. त्याचप्रमाणे तिने हिंदी चित्रपटांत सुद्धा काम केलेले आहे. तिने आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटात जबीन ची भूमिका साकारली होती. हि भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिने ‘शोर इन द सिटी’, ‘सायकल किक’ ह्यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. २०११ साली गिरिजाचे लग्न सुहरुद गोडबोले ह्याच्याशी झाले. सुहरुद गोडबोले प्रसिद्ध मराठी अभिनेते, प्रोड्युसर आणि लेखक श्रीरंग गोडबोले ह्यांचा मुलगा असून तो सुद्धा कलाक्षेत्रातच काम करतो. गिरीजा आणि सुहरुद दोघांनाही १७ मे २०१३ मध्ये मुलगा झाला. वडील गिरीश ओक हे आपल्या पहिल्या पत्नीची मुलगी गिरीजा ओक हिच्या लग्नात आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत आशीर्वाद देण्यास उपस्थित होते. म्हणजेच त्यांचे दुसरे लग्न हे गिरीजा ओक हिच्या लग्नाअगोदरच झाले होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *