अमीर मुळे जुहीने राजा हिंदुस्थान चित्रपटात काम केले नाही कारण

१९८८ मध्ये एक चित्रपट आला होता, ह्या चित्रपटांत आपल्याला दोन निरागस चेहरे आणि त्यांची लव्हस्टोरी पाहायला मिळाली होती. हा चित्रपट होता ‘कयामत से कयामत तक’. हा चित्रपट सुपरहिट झाला. खरंतर आमिर खान आणि जुही चावला ह्यांच्या करिअरमधला हा पहिलाच सुपरहिट चित्रपट होता. ह्यानंतर ह्या जोडीला एकत्र अनेक चित्रपट ऑफर झाले. ह्यांनंतर हि जोडी आपल्याला ‘लव्ह लव्ह लव्ह’ आणि ‘हम है राही प्यार के’ चित्रपटांत दिसली. आणि ह्या चित्रपटांना सुद्धा बॉक्स ऑफिस वर चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटांत एकत्र काम करता करता आमिर खान आणि जुही चावला ह्यांच्यात चांगली मैत्री सुद्धा झाली होती. आणि ह्यामुळे दोघांमध्ये थट्टामस्करी खूप चालायची. ह्या दोघांना दरम्यानच्या काळात एकत्र अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. आमिर आणि जुहीची जोडी बॉलिवूड मध्ये नंबर एक जोडी बनली होती. परंतु तुम्हांला माहिती आहे का ह्या जोडीमध्ये एकेकाळी इतका वाद झाला कि आमिर आणि जुहीने ५ वर्ष फक्त एकमेकांशी बोलले नाही तर दोघांनी एकमेकांसोबत काम सुद्धा केले नाही. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत केव्हा आमिर आणि जुही मध्ये घट्ट मैत्री झाली, का ह्यांच्या मैत्रीत फूट पडली आणि कसे नंतर दोघांनी आपले वैयक्तिक वाद मिटवून पुन्हा मैत्री केली.

गोष्ट १९९७ ची आहे, आमिर आणि जुही दोघेही इंडस्ट्री मध्ये नवीन होते. त्याकाळी आमिर खान बद्दल बोललं जायचं कि तो खूप थट्टामस्करी करतो आणि आपल्या चित्रपटांच्या सेटवर खूप प्रॅन्क्स आणि मस्ती करतो. असंच काहीसं ‘इश्क’ चित्रपटाच्या सेटवर घडलं. ह्या चित्रपटात आमिर खान, अजय देवगण, जुही चावला आणि काजोल हे मुख्य भूमिकेत होते. ह्या चित्रपटाच्या सेटवर एकदा आमिर खान आणि जुही चावला एकत्र बसले होते तेव्हा आमिर खानने जुही चावलाला सांगितले कि त्याला हातावरून भविष्य सांगता येते. त्याला हाताची विद्या येते असे त्याने विश्वासपूर्ण सांगितले. जेव्हा आमिरने असे सांगितले तेव्हा जुहीने लगेच तिचा हात त्याला दाखवला आणि सांगितले कि माझे हात पाहून माझे भविष्य सांग. त्यानंतर आमिर खानने संपूर्ण सेटवरील लोकांसमोर तिच्या हातावर थुंकले. हीच ती गोष्ट होती जी जुहीला खूप खटकली. ह्याअगोदर सुद्धा आमिर आणि जुही मध्ये थट्टामस्करी होत होती. परंतु ह्यावेळची थट्टा जुहीला बिलकुलसुद्धा आवडली नाही. आणि त्याच दिवसानंतर तिने आमिर खान सोबत बोलणेच सोडून दिले. जरी त्या घटनेनंतर दोघांनी आपले शूटिंग ‘इश्क’ चित्रपटासाठी चालू ठेवले.परंतु त्यानंतर ती केव्हाच अमीर सोबत बसली नाही आणि त्यानंतर कधी त्याच्यासोबत बोललीसुद्धा नाही. खरंतर असंच काहीसा प्रॅन्क आमिर खानने ‘इश्क’ चित्रपटात सुद्धा केलेले आहे. परंतु तो चित्रपटासाठी केलेला प्रॅन्क होता. आणि हा खऱ्या आयुष्यात केलेला प्रॅन्क होता. जो आमिर खानला खूपच महागात पडला. ह्यानंतर जुही चावलाला आमिर खानच्या विरुद्ध ‘राजा हिंदुस्थानी’ चित्रपट ऑफर झाला. परंतु जुहू चावलाने आमिर खानसोबत हा चित्रपट करण्यास नकार दिला, त्यामुळे हा चित्रपट करिश्मा कपूरला मिळाला. त्यादरम्यानच्या काळात आमिर खान आणि जुही चावला दोघांनीही बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. दोघांचे करिअर चांगले चालू होते. जुहीला सुद्धा चित्रपट ऑफर होत होते आणि शाहरुख सोबत तिची जोडी लोकांना खूप आवडत होती. तर दुसरीकडे आमिर खान आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री सुद्धा खूप चांगली जमली होती. दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले होते. परंतु नंतर आले २००२ साल. तेव्हा अमीरच्या आयुष्यात असं काही घडलं कि शेवटी जुहीला आपला इगो बाजूला ठेवून आमिरला फोन करावाच लागला.हि ती वेळ होती जेव्हा आमिर खान आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका समस्येतून जात होता. त्याच्या डिवो र्स ची वेळ होती. त्याची पहिली पत्नी रीना सोबत त्याचे पटत नव्हते आणि शेवटी त्याने रिनाला डिवो र्स दिला होता. जेव्हा जुहीला हि गोष्ट माहिती झाली तेव्हा तिने आपला इगो, आपला राग सर्व बाजूला ठेवून आपली मैत्री डोळ्यासमोर ठेवून आमिरला फोन केला आणि त्याला आपल्या जवळ भेटायला बोलावले. जुही फक्त अमिरचीच नाही तर रिनाची सुद्धा खूप चांगली मैत्रीण होती. तिने समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. परंतु जर मैत्रीची गोष्ट कराल तर जुही नेहमीच मैत्रीत खरी उतरली आहे. जसे कि तिची मैत्री शाहरुख सोबतच पहा, ती शाहरुखची इतकी चांगली मैत्रीण आहे कि तिने शाहरुख सोबत आयपीएल मध्ये सुद्धा भागीदारी केली. सोबत ती शाहरुखच्या रेड चिल्लीज प्रोडक्शन मध्ये सुद्धा भागीदार आहे. जरी आपला इगो आणि राग ह्यामुळे तिने आमिर सोबत चांगले चित्रपट गमावले असतील परंतु आमिर खान सोबत पुन्हा मैत्री केली. आम्ही फक्त हीच अपेक्षा करू शकतो कि हे दोघेही कलाकार पुन्हा एकदा एकत्र चित्रपटात दिसतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *