ऐश्वर्यासाठी या सुंदर अभिनेत्रीला अभिषेखने सोडले पहा कोण आहे ती

अमिताभ बच्चन ह्यांचा मुलगा अभिषेक बच्चन ह्याला चित्रपटात म्हणावी तितकी लोकप्रियता मिळली नसली तरी ऐश्वर्या राय हिचा पती म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनी २००७ साली विवाह केला. बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ह्या जोडीकडे पाहिले जाते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरसुद्धा दोघांमधील प्रेम जराही कमी झालेले नाही. जिथे एका बाजूला ऐश्वर्या अभिषेकच्या प्रेमात बुडालेली दिसते तर दुसऱ्या बाजूला अभिषेक बच्चन आपली जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे निभावत आहेत. आज दोघेही खूप सुखाने संसार करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? ऐश्वर्याच्या अगोदर अभिषेकचे मन एका सुंदर अभिनेत्री वर आलं होत. तुम्ही विचार करत असतील कि आम्ही करिष्मा कपूर बद्दल बोलतोय. जर तूम्हाला असं वाटत असेल तर ते चुकीचे आहे. हे सत्य आहे कि करिष्मा कपूर सोबत त्याचे लग्न होता होता राहिले पण करिष्माच्या व्यतिरिक्त अभिषेकचे हृदय दुसऱ्या मुलीसाठी धडकत होत. असं बोललं जात कि ऐश्वर्या साठी अभिषेक ने त्या मुलीला सोडलं.

आम्ही ज्या मुली बद्दल बोलत आहेत ती दुसरा कोणी नसून उत्कृष्ट मॉडेल अभिनेत्री दीपानीता शर्मा आहे. सुमित जोशी यांचे पुस्तक ‘अफेअर्स ऑफ बॉलीवूड स्टार्स रिविल्ड’ या मध्ये सुद्धा लिहला आहे कि अभिषेक बच्चन आणि दीपानीता शर्मा यांची मैत्री सोनाली बेंद्रे हिने करून दिली. सोनाली आणि दीपानीता दोघीही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. अभिषेक आणि दीपानीता दोघेही एकमेकांना जवळजवळ १० महिने डेट करत होते त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. सूत्रांच्या माहितीनुसार त्याकाळी अभिषेक दीपानीताच्या खूप मागे लागला होता. तो जवळजवळ २ महिने दीपानीता ला फोन करायचा आणि भेटण्यासाठी आग्रह करायचा. परंतु दीपानीताला अभिषेक मध्ये काही खास इंटरेस्ट नव्हता. दीपानीता च्या साधेपणा आणि प्रामाणिकपणा अभिषेकला आवडायचा. फ्रीडम फाइटरच्या परिवारातील असणारी दीपानीता ला फिल्म इंडस्ट्री मधल्या कोणत्याही अभिनेत्या बरोबर संबंध ठेवणे पसंत नव्हते. परंतु अभिषेक ने तिचे हृदय चोरले होते.अभिषेक नेहमी त्याच्या व दीपानीता च्या प्रेम संबंधाला मीडिया पासून लांब ठेवत असे. या बद्दल त्याने कोणीही काही विचारले तर तो सरळ नकार देत असे. दीपानीता च्या एका जवळील व्यक्तीने मीडिया ला सांगितले कि अभिषेक दीपानीता ची फसवणूक करत आहे. दीपानीता अभिषेक च्या वाढदिवसाची तयारी करत होती, तिने या बद्दल अभिषेक ला सुद्धा सांगितले होते. पण अभिषेक ने तिला नकार दिला व शुटिंग मध्ये व्यस्त आहे व त्याच्या वडिलांची तब्येत खराब असल्याचे कारण सांगितले. नंतर समजले कि अभिषेक ने त्याच्या वाढदिवसाची मोठी पार्टी ठेवली होती ज्या मध्ये ऐश्वर्य रायला खास आमंत्रण होते. या पार्टी मध्ये अभिषेक दीपानीताला आमंत्रण सुद्धा नाही केले. या बद्दल दीपानीता ने स्वतः सांगितले. मॉडेलिंग च्या वेळी दीपानीता आणि बिपाशा रूम मेट होत्या. बीपाशा ने दीपानीता ला आधीच सांगितले होते कि अभिषेक ला ऐश्वर्या आवडते. ३८ वर्षाची दीपानीता शर्मा सुपर मॉडेल अभिनेत्री आहे. १९९८ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत तिने टॉप ५ मध्ये जागा मिळवली होती. त्यानंतर दीपानीता ने “१६ डिसेंबर”, “लेडीज वर्सेस रिकी बहल” आणि “कॉफी विद डी” अश्या चित्रपटात काम सुद्धा केले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *