तुमच्यासाठी कायपण मालिकेतल्या संग्रामाची बायको पहा किती सुंदर दिसते

२०१२ मध्ये आलेली ‘देवयानी’ मालिका तर तुम्हा सर्वांच्या लक्षात असेलच. ह्या मालिकेत ‘तुमच्यासाठी काय पण’ हा डायलॉग खूप फेमस झाला होता. आणि तो डायलॉग फेमस करणारा अभिनेता म्हणजेच संग्राम साळवी. ह्या मालिकेतील संग्राम आणि देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वे ह्यांची केमिस्ट्री लोकांना खूपच आवडली होती. हि मालिका लोकप्रिय झाल्याने त्याला अनेक मालिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर त्याला ‘सांजबहार’ मालिकेची ऑफर आली. ह्या मालिकेत त्याची जोडी जमली ती खुशबू तावडे हिच्याशी. ह्यावेळी दोघांची केमिस्ट्री खूप चांगली जुळली ती अगदी आयुष्यभरापर्यंतच. ह्या सीरिअल मध्ये काम करता करता त्यांना कधी एकमेकांवर प्रेम झाले हे त्यांनाही कळले नाही. ते दोघेही एकमेकांचे एकत्र फोटोज सोशिअल मीडियावर अपडेट करत. त्यामुळे दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सोशिअल मीडियावर होऊ लागल्या. परंतु दोघांनीही ह्याचे कोणतेच स्पष्टीकरण मीडियामध्ये दिले नव्हते. त्यानंतर मे २०१७ मध्ये साखरपुडा करून दोघांनीही सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्यानंतर ते गेल्याच वर्षी ५ मार्च २०१८ ला विवाहबद्ध झाले. त्यांचे मुंबईत महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न झाले. त्यांच्या लग्न आणि रिसेप्शनला अनेका सेलेब्रेटींनी हजेरी सुद्धा लावली होती.

खुशबूचा जन्म ५ सप्टेंबर १९८७ साली डोंबिवली मध्ये झाला. तिने तिचे प्राथमिक शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर अहमदाबाद इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून तिने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री मिळवली. त्यानंतर तिने एका एमएनसी कंपनीत काम केले. कंपनीत काम करत असतानाच तिने २००९ साली महाराष्ट्र टाइम्सच्या ‘श्रावण क्वीन्स’ स्पर्धेत भाग घेतला. ह्या ब्युटी कॉन्टेस्टमुळे तिचे नाव घराघरात पोहोचले. त्यानंतर तिने सह्याद्री वाहिनीवरील ‘कावळ्याच्या तोंडातील पुरी’ मालिकेत छोटीशी भूमिका करून छोट्या पडद्यावरील आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक हिंदी आणि मराठी सीरिअल्ससाठी ऑडिशन्स दिले. बऱ्याच प्रयत्नानंतर तिला ‘एक मोहर अबोल’ सारख्या मालिकेत काम मिळाले. ह्या मालिकेतील भूमिकेमुळे त्यानंतर तिला अनेक मालिकांच्या ऑफर्स आल्या आणि त्यानंतर तिने अनेक मालिका केल्या. ह्यादरम्यान तिला चंद्रशेखर गोखलेंच्या ‘सांजबहार’ मालिकेत काम मिळाले. ह्याच मालिकेत तिचा को-स्टार होता संग्राम साळवी. मालिकेतील सुदंर प्रेमकथा छोट्या पडद्यावर रंगवताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्यांना सुद्धा समजले नाही. दोघांच्या अफेअर्सच्या मीडियामध्ये चर्चा चालू असताना दोघांनी ह्या चर्चेकडे लक्ष न देता आपल्या करिअरकडे लक्ष दिले.त्यानंतर खुशबूने स्टारवन वरील ‘प्यार कि ये एक कहाणी’ आणि स्टार प्लस वरील ‘तेरे लिये’ सारख्या सीरिअल्समध्ये काम करून हिंदी मालिकेत सुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली. परंतु तिला सीरिअल मध्ये खरी ओळख मिळाली ती ‘धर्मकन्या’ ह्या मालिकेमुळे. २०१३ साली आलेल्या ह्या मालिकेत तिची प्रमुख अभिनेत्रीची भूमिका सर्वांनाच आवडली. त्यानंतर तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ह्या हिंदी सीरिअल मध्ये ‘बुलबुल’ चे कॅरॅक्टर साकारले. तिची हि भूमिका खूपच गाजली. ह्या कॅरॅक्टरमुळे ती खूप लोकप्रिय झाली. ह्याच वेळी तिला मराठी चित्रपटसृष्टीतील ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तिने ‘लव्ह फॅक्टर’ ह्या मराठी चित्रपटात काम करून मोठ्या पडद्यावर पर्दापण केले. तिने अनेक मराठी आणि हिंदी सीरिअल्समध्ये काम करून लोकप्रियता मिळवली. खुशबू तावडे हे नाव आता फक्त मराठी सीरिअल मध्येच नाही तर हिंदी सीरिअलमध्ये तितकेच लोकप्रिय आहे. खुशबू तावडे ची बहीण तितिक्षा तावडे हि देखील एक अभिनेत्री आहे. तिने देखील काही मराठी आणि हिंदी सीरिअल्स मध्ये काम केलेले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *