NMJOKE

बॉलिवूडच्या या अभिनेत्यामागे वेडी होती माधुरी पण

हि गोष्ट नवीन नाही आहे जेव्हा चित्रपटांत काम करता करता हिरो हिरोईनला एकमेकांसोबत प्रेम झाले असेल, मग भलेही मग हिरो विवाहित का असेना. जसे कि नर्गिस – राजकपूर, अमिताभ – रेखा आणि नव्वदीच्या दशकात अशीच अजून एक जोडी होती माधुरी आणि संजय दत्त. माधुरीला जेव्हा संजय दत्त सोबत प्रेम झाले होते तेव्हा संजय दत्त केवळ विवाहितच नव्हता तर त्याला एक मुलगी सुद्धा होती. आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि केव्हा संजय दत्त आणि माधुरी एकमेकांसोबत भेटले, कसे ह्या दोघांमध्ये प्रॉब्लेम आले आणि का ह्यांच्या प्रेमाचा शेवट झाला. माधुरीने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९८४ मध्ये आलेल्या ‘अबोध’ चित्रपटापासून केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले. परंतु १९८८ साली अनिल कपूरसोबत आलेल्या ‘तेजाब’ चित्रपटाने तिला लोकप्रिय केले. त्यानंतर तिचे अनिल कपूरसोबत ‘रामलखन’, ‘परिंदा’, ‘किशन कन्हैया’ हे सर्व चित्रपट हिट ठरले. मग आले १९९० साल. जेव्हा माधुरीला ‘ठाणेदार’ चित्रपट ऑफर झाला. ह्या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता होता संजय दत्त. खरंतर संजय दत्त आणि माधुरीने ठाणेदारच्या अगोदर सुद्धा काही चित्रपटांत काम केले होते. परंतु बोललं जातं कि ठाणेदार चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांना एकमेकांसोबत प्रेम झाले. चित्रपटाचे ‘तम्मा तम्मा’ गाणे सुद्धा खूप लोकप्रिय झाले. ह्यानंतर माधुरी आणि संजय दत्तच्या जोडीला सुद्धा पसंत केले जाऊ लागले.

त्यामुळे दोघांना ‘साजन’ चित्रपट ऑफर झाला. ‘साजन’ चित्रपट संजय दत्तचा असा पहिला चित्रपट होता ज्यात तो रोमँटिक भूमिका निभावत होता. ह्या अगोदर त्याने फक्त ऍक्शन हिरोच्या भूमिकाच निभावल्या होत्या. आणि ‘साजन’ चित्रपट सुद्धा सुपरहिट झाला. ह्या चित्रपटातील गाण्यांना सुद्धा खूप पसंत केले गेले. असं बोललं जातं कि हाच तो काळ होता जेव्हा माधुरी आणि संजय दत्तचे प्रेम ह्यादरम्यान खुलले होते. माधुरी संजय दत्तपासून लांब राहू शकत नव्हती. असं बोललं जातं कि माधुरी संजय दत्त सोबत जास्तीत जास्त वेळ घालवू इच्छित होती, त्यामुळेच जेव्हा संजय दत्त ओउटडोर शूट वर असायचा तेव्हा माधुरी दिवसभर त्याच्यासोबत फोनवर गप्पा मारत राहायची. माधुरीने संजय दत्तसोबतचे हे नातं सर्वांपासून लपवून ठेवले होते. कारण तिचे कुटुंब ह्या नात्याच्या विरुद्ध होते. त्याचसोबत संजय दत्त पहिल्यापासूनच विवाहित होता. संजय दत्तचे वैवाहिक जीवन त्यावेळी एका खडतर परिस्थितीतून जात होते. त्याच्या पत्नीला कँसर झाला होता आणि ती कॅन्सरच्या इलाजासाठी न्यूयॉर्कला शिफ्ट झाली होती. संजय दत्त एकटा होता म्हणून कदाचित माधुरीच्या जवळ गेला. परंतु जसा जसा काळ पुढे सरकत गेला तश्या ह्या बातम्या बाहेर जाऊ लागल्या. आणि एके दिवशी माधुरी आणि संजय दत्तच्या अफेअरची बातमी संजय दत्तची पत्नी रिचा पर्यंत गेली. जशी हि बातमी रिचाला समजली तशी ती न्यूयॉर्क मधून मुंबईला आली. ती ह्याबाबत संजय दत्त सोबत बोलली, तिने इतकं सुद्धा सांगितले कि ती संजय दत्तला सोडू इच्छित नाही, तिला संजय दत्त सोबत आपले कुटुंब पुढे घेऊन जायचे आहे.परंतु तोपर्यंत सर्व बिघडले होतं, दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. न्यूयॉर्कवरून आल्यानंतर फक्त १५ दिवसांतच रिचा कायमचीच न्यूयॉर्कला परतली. हीच ती वेळ होती जेव्हा माधुरी आणि संजय दत्त ‘खलनायक’ चित्रपटासाठी शूटिंग करत होते. दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचे मनोमन ठरवले होते. सर्वकाही ठीक चालू होते, परंतु अचानक १९९३ मध्ये संजय दत्तच्या जीवनात एक खूप मोठे वादळ आले. संजय दत्त टाडा केसमद्ये फसला. एप्रिल १९९३ दरम्यान संजय दत्त आणि माधुरी मध्ये प्रॉब्लेम येणे चालू झाले. त्यावेळी संजय दत्त परदेशी शूटिंग करत होता. तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण प्रियाचा कॉल जातो आणि संजय दत्त ताबडतोब भारतात परततो. भारतात पोहोचताच मुंबई पोलिसांनी संजय दत्तला अटक केली. ह्यानंतर ५ मे ला संजय दत्तला पुन्हा बेल मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा संजय दत्तला पहिली बेल मिळाली होती तेव्हा माधुरीने सर्वांना मिठाई वाटली होती आणि ती खूप खुश होती. खरंतर तिने अनेक दिवस संजय दत्त सुटण्यासाठी प्रार्थना सुद्दा केली होती. परंतु संजयचे प्रॉब्लेम काही थांबत नव्हते. ४ जुलैला त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आणि ह्यावेळी संजय दत्त १६ महिन्यासाठी तुरुंगात गेला होता. ह्या प्रकरणामुळे संजयची इमेज खूपच खराब झाली होती. तेव्हा माधुरीवर सुद्धा कुटुंबाकडून खूप दबाव येऊ लागले. माधुरीच्या आईवडिलांना आवडत नव्हते की त्यांची मुलगी अश्या मुलासोबत रिलेशनशिप मध्ये राहील जो मुलगा ड्रग्स घेतो, विवाहित आहे आणि आता तुरुंगात आहे. कुटुंबाचा दबाव आल्यामुळे माधुरीने संजय दत्तपासून दुरावा केला.असं बोललं जातं कि तुरुंगात असतेवेळी संजय दत्तने अनेकदा माधुरीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. एकदा जेलर सोबत सेटिंग करून त्याने माधुरीला कॉल सुद्धा केला परंतु माधुरी फोनवर आलीच नाही. ज्यावेळी संजय दत्त तुरुंगात होता त्यादरम्यान त्याचे इंड्रस्टीमधले मित्र आणि काही दिग्दर्शक त्याला भेटायला सुद्धा गेले होते. त्यापैकी एक होते महेश भट्ट. इतकी मित्रमंडळी भेटायला जात असतानादेखील माधुरी संजय सोबत फोनवर बोलली नाही आणि कधी त्याला भेटायलासुद्धा गेली नाही. जी मुलगी दिवसरात्र संजय दत्तबरोबर गप्पा मारत होती, त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला बघत होती. ती आज जेव्हा संजय दत्त वाईट परिस्थितीत आहे, तुरुंगात आहे तर ती त्याला भेटायला सुद्धा गेली नाही. ज्यावेळी संजय दत्तला सर्वात जास्त गरज माधुरीची होती त्याच वेळी तिने संजयपासून लांब राहणे पसंत केले होते. जेव्हा माधुरीला मीडियामध्ये संजय दत्त बद्दल विचारले गेले तेव्हा तिने ह्या विषयावर गप्प राहणेच पसंत केले. जेव्हा संजय दत्त तुरुंगातून सुटून आला तेव्हा त्यानेसुद्धा माधुरीबद्दल बोलायला नकार दिला. एकीकडे संजय दत्त तुरुंगात जाऊन आला होता तर दुसरीकडे बाहेर त्याचा ‘खलनायक’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. तो बॉक्स ऑफिसचा सुपरहिरो बनला होता. ह्या दरम्यान संजय आणि माधुरीचे नाते तुटण्याच्या मार्गावर होते. तेव्हाच त्यांना जास्तीत जास्त चित्रपट ऑफर होत होते. परंतु दोघांमध्ये दरार आली होती. हे नातं तुटलंच होतं. म्हणून त्यांनी एकमेकांसोबत चित्रपट साइन करणे बंद केले होते.संजय आणि माधुरीचा शेवटचा चित्रपट ‘महानता’ १९९७ ला आला होता. त्यानंतर १९९८ मध्ये संजय दत्तने एअरहोस्टेस्ट रिया पिल्लईसोबत लग्न केले. आणि माधुरी सुद्धा १९९९ साली डॉ. श्रीराम नेने सोबत लग्न करून अमेरिकेत शिफ्ट झाली. अमेरिकेत गेल्यानंतर माधुरी आपल्या वैवाहिक जीवनात व्यस्त होती. तर दुसरीकडे संजय दत्तच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स काही केल्या थांबत नव्हते. २००८ ला त्याने पुन्हा एकदा डिवोर्स घेतला. आणि त्यानंतर त्याने मान्यता सोबत लग्न केले. मान्यतापासून संजय दत्तला दोन मुले आहेत. आजसुद्धा संजय दत्त मान्यता सोबत आपले जीवन जगत आहे. तर दुसरीकडे माधुरीसुद्धा २०११ ला अमेरिका सोडून मुंबईला परतली. आणि पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. माधुरी आणि संजय दत्तने कधीच मीडियामध्ये एकमेकांबद्दल काही सांगितले नाही. दोघांनी कधी मीडियामध्ये येऊन ह्या नात्याला स्वीकारले नाही. अनेकवर्षे एकमेकांपासून दुरावा केल्यानंतर हे दोघे २०१९ ला अचानक चर्चेत आले. त्या दोघांना २०१९ मध्ये करण जोहरने ‘कलंक’ चित्रपटासाठी विचारले. तेव्हा मीडियामध्ये अशी चर्चा होती कि दोघे एकत्र चित्रपट करणार नाही. आणि जरी चित्रपटांत असले तरी दोघांचा एकत्र सिन नसणार. परंतु दोघांनीही ह्या चर्चेला खोटे ठरवत ह्या चित्रपटांत काम तर केलेच वरून त्यांचा क्लायमॅक्स दरम्यान एकत्र सिन सुद्धा आहे. एका मुलाखतीत संजय दत्तने हे सुद्धा सांगितले कि जेव्हा शूटिंग दरम्यान त्याची मुलं यायची तेव्हा त्याने त्यांची माधुरीसोबत ओळख करून दिली होती. तर अश्याप्रकारे संपली बॉलिवूडची अजून एक प्रेम कहाणी.
Exit mobile version