अजय देवगण ला नाहीतर काजोलने शाहरुख ला निवडले त्यावेळी काय घडले पहा

१९९६ मध्ये अजय देवगण आणि काजोलच्या रोमान्सच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. तेव्हा लोकांना ह्यावर विश्वास ठेवणं मुश्किल वाटू लागलं कि दोन परस्पर विरुद्ध स्वभाव असलेल्या स्टार्सची जोडी सुद्धा जमू शकते. त्याकाळी काजोल खूप मोठी स्टार बनली होती. तर दुसरीकडे अजय देवगणचे करिअर डळमळीत होते. अशामध्ये अशी सुद्धा चर्चा होती कि अजय देवगणने काजोलला आपल्या करियरची पायरी बनवून वापर केला. परंतु त्यांच्यात वेगळेच घडले होते. अजय देवगणचा शांत स्वभाव आणि खोलवर डोळ्यांवर काजोल भाळली होती. आणि पुढे ह्या नात्याला दोघांनी लग्न करून एक नवीन नाव सुद्धा दिले. ‘हलचल’ चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले. ह्याच चित्रपटामुळे दोघांमध्ये प्रेम झाले. परंतु तुम्हांला हे वाचून आश्चर्य होईल कि जेव्हा हा चित्रपट काजोलला ऑफर झाला होता तेव्हा चित्रपटांत अजय देवगण आहे म्हणून तिने चित्रपटांत काम करण्यास नकार दिला होता. परंतु नंतर एका अटीवर ती चित्रपटात काम करण्यास तयार झाली. आजच्या लेखात आम्ही हे सांगणार आहोत कि केव्हा काजोलला हा चित्रपट ऑफर झाला होता, कसे काजोलने ह्या चित्रपटातून अजय देवगनला काढण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर कसे ती स्वतःच अजयच्या प्रेमात पडली.

आम्ही २०१६ साली आलेल्या दिग्दर्शक प्रियदर्शन ह्याच्या ‘हलचल’ चित्रपटाबद्दल बोलत नाही आहोत. तर १९९५ साली आलेल्या अजय आणि काजोलच्या ‘हलचल’ बद्दल बोलत आहोत. जेव्हा ह्या चित्रपटाची ऑफर जेव्हा काजोलला दिली गेली होती, तेव्हा काजोलने ह्या चित्रपटातून अजय देवगणना काढून शाहरुख खानला घेण्याचा हट्ट केला होता. कारण त्यावेळी काजोल शाहरुख ह्या जोडीची खूप क्रेज होती. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना तर खूप आवडत होती. परंतु त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री सुद्धा खूप चांगली होते. ते दोघेही खूप चांगले मित्र बनले होते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर काजोल बॉलिवूडची मोठी स्टार बनली होती. त्याकाळी हिरोईनचे बजेट हिरोंपेक्षा कमी असल्यामुळे प्रत्येक प्रोड्युसर दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटांत काजोल अभिनेत्री असावी, असे वाटत होते. त्याच दरम्यान निर्माती शबनम कपूर आणि निर्देशक अनिश बजमी ह्यांनी काजोलला ‘हलचल’ चित्रपटाची ऑफर दिली. ह्या चित्रपटासाठी त्यांनी ह्या अगोदर अभिनेत्री दिव्या भारतीला साईन केले होते. परंतु तिच्या आकस्मिक जाण्याने हा रोल काजोलला ऑफर झाला होता.जेव्हा दोघेही काजोलला चित्रपटासाठी साईन करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले तेव्हा काजोलचा पहिला प्रश्न हा होता कि, चित्रपटाचा हिरो कोण आहे. जेव्हा तिला अजय देवगणबद्दल सांगितले गेले तेव्हा तिने चित्रपटात काम करण्यास सरळ सरळ नकार देत सांगितले कि चित्रपटाचा हिरो शाहरुख खान असेल तरच मी हा चित्रपट करेल. तेव्हा चित्रपटाच्या निर्माती शबनम कपूरने तिला सांगितले कि शाहरुखला चित्रपटांत घेण्याइतके बजेट त्यांच्याकडे नाही आहे. निर्देशक अनिश बजमी आणि काजोल ह्यांची चांगली मैत्री होती. त्यांनी काजोलला चित्रपटांत घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावर काजोल चित्रपटांत काम करण्यासाठी एका अटीवर तयार झाली कि जर तिला अजय देवगणचा अभिनय आवडला नाही तर ती मध्येच हा चित्रपट सोडेल. तिची हि अट मान्य करण्यात आली. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अजय देवगणच्या शांत डोळ्यांनी काजोलच्या मनात अशी हलचल केली कि ती आपल्या पहिल्या बॉयफ्रेंडला सोडून अजयच्या प्रेमात पडू लागली. त्यानंतर त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. आणि पुढचं तर तुम्हांला माहितीच आहे. २४ फेब्रुवारी १९९९ साली दोघांनीही लग्न केले. हि जोडी बॉलिवूडची एक आदर्श जोडी म्हणून ह्यांच्याकडे पाहिले जाते. दोघांनाही ‘न्यासा’ नावाची मुलगी आणि ‘युग’ नावाचा मुलगा आहे. न्यासा आता १६ वर्षाची आहे तर युग आता ९ वर्षाचा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *