अंकुश चौधीरीची पत्नी पहा किती सुंदर दिसते

मराठी चित्रपटसृष्टीत अंकुश चौधरी हे नाव काही नवीन नाही. ३१ जानेवारी १९७७ ला जन्मलेल्या अंकुशने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने १९९५ पासून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘डबल सीट’, ‘दगडी चाळ’ ह्यासारखे सुपरहिट चित्रपटांमुळे आताच्या घडीला एक आघाडीचा अभिनेता म्हणून अंकुशकडे पाहिले जाते. अंकुशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत असाल तर त्याने २००७ साली दीपा परब हिच्या सोबत लग्न केले. दीपा सुद्धा चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेले आहे. तिने वेगवेगळ्या जाहिरातीत सुद्धा काम केलेले आहे. दीपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावेसोबतच ‘क्षण’ हा चित्रपट लोकप्रिय झाला होता. त्या चित्रपटांत साकारलेल्या नीलांबरी बर्वेच्या भूमिकेमुळे दीपाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आता पाहूया अंकुश आणि दीप ह्या दोघांमध्ये प्रेम केव्हापासून झाले ते.

दीपाचा जन्म ३१ ऑक्टोबर १९८१ ला मुंबईत झाला. तिला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. आठवीत असतानाच तिने अभिनय करणे सुरु केले. तिने मुंबईच्या आयइएस किंग जॉर्ज शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने परेलच्या महर्षी दयानंद कॉलेजमधून आपले ग्रॅजुएशन पूर्ण केले. अंकुश चौधरी एमडी कॉलेज म्हणजेच महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकत असताना त्याची ओळख दीपाशी झाली. दीपा सुद्धा एमडी कॉलेजमध्ये शिकत होती. कॉलेजच्या लाईफमध्येच दोघांमधील प्रेमाला सुरुवात झाली. ‘बॉंबे मेरी जान’ हे दीपाचे पहिले नाटक होते. त्यानंतर दोघांनी एकत्र एका नाटकांत काम केले ते नाटक म्हणजे ‘ऑल द बेस्ट’. केदार शिंदेच्या ‘ऑल द बेस्ट’ ह्या नाटकात भरत जाधव सोबत अंकुश आणि दीपाने काम केले. हे नाटक खूप लोकप्रिय झाले होते. लग्नाअगोदर दोघांनी जवळजवळ १० वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर २००८ साली दोघांनी लग्न केले. अंकुश आणि दीपाला प्रिन्स नावाचा मुलगा आहे.लग्नानंतर तिने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. एका मुलाखतीत तिने सांगितले होते कि लग्न झाल्यानंतरचा काळ तिला अनुभवायचा होता. त्यानंतर ती काही वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. तिने हे सुद्धा सांगितले कि जेव्हा मुलगा तीन वर्षाचा झाला तेव्हा तिला वाटू लागले कि आता मी मुलाला आईकडे ठेवून चित्रपटांत काम करू शकते, तेव्हाच तिने चित्रपटात पुन्हा एंट्री करण्याचे ठरवले. २०१७ साली ती मराठी चित्रपटसृष्टीत परतली. ३० जून २०१७ ला तिचा ‘अंड्याचा फंडा’ हा चित्रपट रिलीज झाला. ह्या चित्रपटात तिने अरुण नलावडे आणि सुशांत शेलार ह्यांच्यासोबत काम केले होते. दीपाने नाटकापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिला जाहिरातीत काम मिळाले. त्यानंतर तिने मराठी मालिका आणि चित्रपटांत काम केले. तिने सह्याद्री वाहिनीवरील ‘दामिनी’ सीरिअल मध्ये काम केले आहे. परंतु मराठी सीरिअल पेक्षा तिला हिंदी सीरिअल मध्ये चांगली लोकप्रियता मिळाली. तिने ‘छोटी माँ’, ‘थोडी खुशी थोडा गम’, ‘मीट’, ‘रेत’ ह्यासारखे हिंदी डेली सोप्स केले. तसेच तिने ‘क्षण’ (२००६), ‘मराठा बटालियन’ (२००२), ‘चकवा’ (२००४), ‘कथा तिच्या लग्नाची’ (२००९), ‘मुलगा’ (२०१०), ‘उरूस’, ‘शान’ ह्यासारख्या मराठी चित्रपटांत काम केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *