या मराठमोळ्या अभिनेत्रीवर सुनील शेट्टी करत होता प्रेम, नंतर काय झाले पहा

बॉलिवूडमध्ये अण्णाच्या नावाने लोकप्रिय असलेला सुनील शेट्टी एकेकाळी ऍक्शन हिरो म्हणून खूपच लोकप्रिय होता. सध्यातरी तो चित्रपटसृष्टीपासून दूर आहे आणि मोजक्याच चित्रपटात काम करताना दिसतो. सुनील शेट्टी ने आपल्या बॉलिवूड करियरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्या. मग त्या रोमँटिक असो, सिरीयस असो किंवा मग कॉमेडी असो. त्याने काही चित्रपटांत व्हिलनची भूमिका सुद्धा केलेली आहे. परंतु त्याला ऍक्शन हिरो म्हणूनच सर्वात जास्त ओळखले जाते. त्याने बॉलिवूडमध्ये २५ पेक्षा जास्त वर्षे काम केले आहे. ह्या काळात त्याने जवळजवळ ११० पेक्षासुद्धा जास्त बॉलिवूड चित्रपटात काम केलेले आहेत. त्याने १९९२ मध्ये आलेल्या ‘बलवान’ ह्या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करियरची सुरुवात केली होती. सुनील शेट्टी चाहत्यांचा नेहमीच फेव्हरेट अभिनेता होता. आज आम्ही त्याच्याबद्दल अशी गोष्ट सांगणार आहोत जी खूप कमी लोकांना माहिती आहे. हि कहाणी आहे त्याच्या बॉलिवूडमधील अभिनेत्री सोबत झालेल्या प्रेमाची. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत कि कोणत्या चित्रपटादरम्यान सुनील शेट्टी बॉलिवूडच्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता, कसे दोघांमध्ये प्रेम झाले होते, आणि कोणत्या कारणामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

त्याकाळी सुनील शेट्टीची ओळख एक ऍक्शन हिरोची होती. कारण चित्रपटात येण्याअगोदर सुनील शेट्टी किक बॉक्सिंगचा खूप चांगला खेळाडू राहिला आहे आणि ह्याचा कारणामुळे सुनील शेट्टीला बहुतेक ऍक्शन चित्रपट मिळाले. सुनील शेट्टी बॉलिवूडमधील असा पहिला अभिनेता आहे ह्याला किकबॉक्सिंग मध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. ऍक्शन हिरोसाठी प्रसिद्ध असल्यामुळे सुनील शेट्टीला एक ऍक्शन चित्रपट मिळाला होता. १९९७ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘भाई’ चित्रपटात सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे मुख्य भूमिकेत होते. ह्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. खरंतर, सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रेने ‘टक्कर’, ‘सपूत’, ‘कहर’ ह्या सारख्या अनेक हिट चित्रपटात एकत्र काम केलेले होते. ह्या चित्रपटांत लोकांना त्यांची जोडी खूप आवडली होती. आणि ९० च्या दशकात हि जोडी खूप लोकप्रिय मानली जात होती. अनेक चित्रपटात एकत्र काम करण्यामुळे सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे दोघेही एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असे. जेव्हा ‘भाई’ चित्रपटाची शूटिंग चालू होती तेव्हा दोघेही एकमेकांसोबत खूप वेळ घालवत होते आणि ह्यादरम्यान त्यांचे प्रेम फुलू लागले होते.सोनाली सुद्धा मनोमन सुनील शेट्टीवर प्रेम करू लागली होती. ह्या गोष्टीची जाणीव सेटवर फक्त काही लोकांनाच होती. दोघांमधले प्रेम वाढत चालले होते. बघता बघता सोनाली बेंद्रे ने सुनील शेट्टी ला लग्नासाठी सुद्धा विचारले. दोघांबद्दल बॉलिवूडमध्ये खूप चर्चा होऊ लागली होती. परंतु दोघांचे लग्न होऊ शकले नाही. दोघांचे लग्न न होण्यामागचे खूप मोठे कारण होते. सुनील शेट्टीने सोनाली बेंद्रेला लग्नासाठी नकार दिला. कारण १९९७ मध्ये ‘भाई’ हा चित्रपट येण्याच्या कितीतरी अगोदर साली म्हणजे १९९१ मध्ये सुनील शेट्टीने आपल्या बालपणीची मैत्रीण माना शेट्टी सोबत लग्न केले होते. सोनाली बेंद्रेसोबत लग्न करून सुनील शेट्टीला आपल्या पत्नीला धोखा द्यायचा नव्हता. सुनील शेट्टीने एका मुलाखतीत सोनाली बेंद्रे सोबत लग्न न करण्याबाबत खुलासा केला होता कि जर तो विवाहित नसता तर सोनाली सोबत लग्नाबद्दल नक्की विचार केला असता. तर दुसरीकडे सुनील शेट्टीने लग्नासाठी नकार दिल्यानंतर सोनाली बेंद्रे ने २००२ साली गोल्डी बहल सोबत लग्न केले. गोल्डी एक फिल्ममेकर आहे. त्याने ‘अंगारे’, ‘बस इतना स खाँब है’ आणि ‘लंडन पॅरिस न्यूयॉर्क’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते. आज सुनील शेट्टी एक यशस्वी अभिनेता आहे आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. तो त्याच्या व्यायसायात व्यस्त असतो. त्याला दोन मुले आहेत. त्यांची नवे अहान आणि आथिया शेट्टी आहे. आथिया शेट्टीने ‘हिरो’ चित्रपटातून सूरज पांचोलीसोबत बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. तर दुसरीकडे सुनील शेट्टी आपला मुलगा अहानच्या बॉलिवूडमध्ये पर्दापणाच्या तयारीत लागला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *