मोहोब्बत्ते मधली हि अभिनेत्री पहा आता काय करते

‘मोहब्बतें’ चित्रपटात ‘किरण’ची भूमिका असलेली अभिनेत्री तर तुम्हांला आठवत असेलच. ती जिमी शेरगीलसोबत होती बघा. ह्या चित्रपटात तिने शांत आणि सहनशील विधवेची भूमिका निभावली होती. हो, तीच ती, त्या अभिनेत्रीचे नाव आहे प्रीती झंगियानी. ती एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. प्रीती ने राजश्री प्रोडक्शनच्या व्हिडीओ अल्बम ‘ये है प्रेम’ मधून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर प्रीती चित्रपटांत काम करू लागली. तिने बॉलिवूडमध्ये ‘मोहब्बतें’ चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली. तिने आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. प्रीतीचा जन्म १८ ऑगस्ट १९८० ला कर्नाटक मध्ये झाला होता. प्रीतीच्या वडिलांचे नाव गोविंद झंगियानी आणि आईचे नाव मनीका झंगियानी आहे. तिने मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. प्रितीने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त मल्याळम, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि राजस्थानी ह्यासारख्या भाषेतील चित्रपटांत काम केलेले आहे.

प्रितीने आपल्या करिअरची सुरुवात ‘ये है प्रेम’ ह्या व्हिडीओ अल्बमने केली होती. त्यानंतर १९९६ मध्ये अल्ताफ रजाच्या पहिला अल्बम ‘तुम तो ठहरे परदेशी’ ह्या गाण्यात ती दिसून आली. तिने १९९९ मध्ये ‘थम्डू’ आणि ‘मजहविलु’ सारखे दक्षिण भारतीय चित्रपटांत अभिनय करून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. प्रितीने २००० साली बॉलिवूडमध्ये ‘मोहब्बतें’ चित्रपटांद्वारे पर्दापण केले. हा चित्रपट खूप हिट ठरला होता. ह्या चित्रपटांत अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय सारखे मोठे मोठे स्टार होते. ज्यात प्रीतीने इतर पाच कलाकार शमिता शेट्टी, उदय चोप्रा, जुगल हंसराज, किम शर्मा आणि जिमी शेरगिल ह्यांच्यासोबत काम केले होते. ह्यानंतर प्रीतीचा लक्षात राहणारा चित्रपट म्हणजे ‘आवारा पागल दिवाना’. तिने ‘चांद के पार चलो’ (२००६), ‘सुख’ (२००५), ‘चाहत एक नशा’ (२००५), ‘चेहरा’ (२००५), ‘एलओसी कारगिल’ (२००३), ‘अनर्थ’ (२००२), ‘वाह तेरा क्या कहना’ (२००२), ‘आवारा पागल दीवाना’ (२००२) ह्यासारख्या चित्रपटांत काम केले आहे.ह्या प्रतिभावंत अभिनेत्रीला वेब ब्राउजिंग आणि संगीत ऐकणे आवडते. ‘आपल्या स्वप्नांना पूर्ण करा, जगा आणि जगू द्या’ हे तिच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य आहे. प्रीती आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील वांद्रा येथे राहते. प्रितीने २३ मार्च २००८ साली अभिनेता प्रवीण डबास ह्यांच्यासोबत लग्न केले. तिचा पती प्रवीण डबास मीरा नायरच्या ‘मान्सून वेडिंग’ चित्रपटांतून प्रकाशझोतात आला होता. चित्रपट आणि मॉडेलिंग व्यतिरिक्त तो एक स्कुबा डायवरसुद्धा आहे. ह्याशिवाय त्याला अंडर वॉटर फोटोग्राफीची आवड आहे. दोघांनी ११ एप्रिल २०११ ला मुलगा जयवीरला जन्म दिला. २७ सप्टेंबर २०१६ ला त्यांनी अजून एका मुलाला जन्म दिला होता ज्याचे नाव देव आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला ‘काश तुम होते’ हा तिचा शेवटचा हिंदी सिनेमा होता त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून लांब राहणे पसंत केले.प्रीती काही वर्षे आपल्या मुलांच्या पालनपोषणात व्यस्त होती. काही वर्षे चित्रपटसृष्टीपासून लांब राहिल्यानंतर तिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. तिने २०१७ साली ‘तावडो – द सनलाईट’ ह्या राजस्थानी चित्रपटांत काम केले. ह्यानंतर तिने भोजपुरी सुपरस्टार रवी किशनसोबत हिंदी सिनेमा ‘जय छठी माँ’ ह्या चित्रपटांत काम केले. हा चित्रपट ह्याच वर्षी म्हणजेच ५ एप्रिलला २०१९ ला रिलीज झाला होता. ह्या चित्रपटांत तिने देवीची भूमिका निभावली होती. चित्रपटांत काम केल्यानंतर आता ती डिजिटल जगात प्रवेश करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रीती एका नवीन वेबसिरीजपासून आपला नवीन प्रवास सुरु करायच्या तयारीत आहे. काही दिवसांअगोदरच प्रीतीला फ्युचर स्टुडिओ, गोरेगाव मध्ये वेब सिरीजच्या शूटिंग साठी पाहण्यात आले होते. ह्या सिरीज मध्ये लोकप्रिय निर्देशक जी अशोक मुख्य भूमिकेत असणार आहे. ह्याव्यतिरिक्त ती बॉलिवूड चित्रपटांतील एका चांगल्या भूमिकेच्या शोधात असून तिचा पूर्वीसारखा हरवलेला चार्म पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *