‘जब वी मेट’ त्या सिन नंतर बॉबी देओलने नंतर कधीच करीनासोबत काम

करीना कपूर बॉलिवूडच्या पहिल्या फिल्मी कुटुंबातून आहे, तिने नवाब सैफ अलीखान सोबत लग्न केले आहे. तिने प्रत्येकवेळी समाजापुढची बंधने तोडून एक नवीन आदर्श निर्माण केला. मग ते परिवारात मुलींनी चित्रपटसृष्टीत येणे असू दे किंवा गरोदरपणी चित्रपटांत काम करणे असू दे. तिने आपले काम आणि व्यक्तिमत्वाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. चित्रपट तर करिनाने खूप केले आहेत, परंतु जेव्हा ती ‘जब वी मेट’ मध्ये गीत बनून आली तेव्हा सर्वांची मने जिंकली. ‘जब वी मेट’ मध्ये शाहिद कपूरच्या ऐवजी कोणी वेगळा अभिनेता काम करणार होता. परंतु असं बोललं जातं कि करीना कपूरने त्या अभिनेत्याला काढून शाहिद कपूरला ह्या चित्रपटात घेतले. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि केव्हा करीनाला ‘जब वी मेट’ चित्रपट ऑफर झाला, का तिने त्या अभिनेत्यासोबत काम करायला नकार दिला. आणि कसे ह्या अभिनेत्याला तिने चित्रपटांतून काढून टाकले.

गोष्ट २००५ ची आहे, डायरेक्टर इम्तियाज अलीचा अभय देओल आणि आयेशा टाकिया ह्यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘सोचा न था’ रिलीज झाला होता. हा चित्रपट रिलीज होताच इम्तियाज अलीने आपल्या पुढचा प्रोजेक्ट म्हणजेच ‘जब वी मेट’ वर काम करायला सुरुवात केली होती. ह्या चित्रपटाचे सुरुवातीचे नाव ‘गीत’ ठेवले गेले होते. इम्तियाज अली ह्या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेसाठी कलाकार शोधत असताना त्यांनी ह्याबाबतीत अभय देओलसोबत गप्पागोष्टी केल्या. तेव्हा अभय देओलने इम्तियाज अलीची बॉबी देओलशी भेट करून दिली. जेव्हा इम्तियाज अली बॉबी देओलशी भेटला तेव्हा त्याला बॉबी देओल चित्रपटासाठी योग्य वाटला आणि त्याला चित्रपटासाठी फायनल केले गेले. इम्तियाज अलीला आपल्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेता तर मिळाला होता, आणि बॉबी देओलच्या येण्याने इम्तियाज अलीला अजून एक फायदा झाला होता कारण बॉबी देओल हा धर्मेंद्रचा मुलगा आणि सनी देओलचा भाऊ आहे त्यामुळे इंडस्ट्री मध्ये त्याची खूप ओळख होती. हेच कारण होते कि बॉबी देओलने इम्तियाज अलीला एक प्रोड्युसर सुद्धा आणून दिला होता.हा प्रोड्युसर होता अष्टविनायक. बॉबी देओल आणि इम्तियाज अली दोघेही मिळून अष्टविनायक प्रोडक्शनकडे गेले. त्यांना ह्या चित्रपटाची कथा खूप आवडली. आणि ते हा चित्रपट प्रोड्युस करण्यासाठी तयार सुद्धा झाले. परंतु त्यांनी दोघांसमोर एक छोटीशी अट ठेवली. अष्टविनायक प्रोडक्शनची ती अट अशी होती कि ह्या चित्रपटात अभिनेत्री फक्त आणि फक्त करीना कपूरच असायला हवी. करीना कपूरला चित्रपटांत घेण्यासाठी बॉबी देओलला सुद्धा कोणता प्रॉब्लेम नव्हता आणि इम्तियाज अलीला सुद्धा कोणताच प्रॉब्लेम नव्हता. उलट बॉबी देओलने तर त्या अगोदर सुद्धा करीना कपूर सोबत ‘अजनबी’, ‘दोस्ती – फ्रेंड्स फॉरेव्हर’ ह्यासारखे चित्रपट केले होते. इम्तियाजने एक छोटीशी अट ठेवली होती कि तो करिनाशी वैयक्तिक भेटूनच तिला चित्रपटासाठी फायनल करणार होता. शेवटी इम्तियाजने करिनासोबत पर्सनल मिटिंग केली. आणि त्यांनी ह्या चित्रपटासाठी करीनाला फायनल केले. करिनाने चित्रपटासाठी होकार तर दिला परंतु त्यासोबत तिने इम्तियाज अली समोर एक अट सुद्धा ठेवली. तिने इम्तियाज असलीसमोर हि अट ठेवली कि ती ह्या चित्रपटांत ‘गीत’ चा रोल तेव्हाच करेल जेव्हा ह्या चित्रपटांत मुख्य अभिनेता शाहिद कपूर असेल. कारण करीना त्यावेळी शाहिद कपूरला डेट करत होती. तिला त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता.जर करीनाच्या करिअरची गोष्ट करत असाल तर त्यावेळी करीनाचे करिअर यशाच्या शिखरावर होते. तिने ‘डॉन’ आणि ‘ओमकारा’ सारख्या चित्रपटांत काम केले होते. त्यामुळे तिच्या मागण्यांना नकार देणे डायरेक्टर प्रोड्युसरना खूप अवघड होते. इम्तियाज अलीचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. प्रोड्युसर त्याला मिळाला होता. हिरोईन सुद्धा त्याला मिळाली होती. फक्त हिरो त्याला हिरोईनच्या आवडीचा घ्यायचा होता. शेवटी इम्तियाज अलीला करीनाची हि मागणी मान्य करावीच लागली. त्यांनी करीनाच्या मागणीनुसार बॉबी देओलला ह्या चित्रपटातून काढून टाकले आणि शाहिद कपूरला ह्या चित्रपटांत घेतले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. लोकांना हा चित्रपट खूपच आवडला. शाहिद, करीना आणि इम्तियाज अली ह्या तिघांच्याही करिअरमधला हा चित्रपट एक माईलस्टोन ठरला. परंतु ह्या चित्रपटानंतर करिनाने खूप काही गमावले. ह्या चित्रपटाच्या दरम्यान करीना आणि शाहिद जे रिलेशनशिप मध्ये होते, बोललं जातं कि ह्या चित्रपटाच्या दरम्यानच दोघांचे नातं तुटले. करिनाने ह्या चित्रपटातून बॉबी देओलला काढून टाकले होते त्यामुळे तिने बॉबी देओलसारखा चांगला मित्र सुद्धा गमावला. हाच तो चित्रपट होता त्यानंतर बॉबी देओलने करीना कपूरसोबत चित्रपटात पुन्हा कधी काम केले नाही. परंतु शाहिद सोबत ती ‘उडता पंजाब’ चित्रपटात जरुर दिसली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *