‘ऍक्शन का स्कुल टाईम’ मधील जाहिरातीतील तो छोटा मुलगा पहा आता काय करतो

नव्वदच्या दशकातील अनेक जाहिराती तुमच्या लक्षात असतील. निरमा, फेविकॉल, मॅग्गी अश्या प्रकारच्या त्या जुन्या जाहिरातींना आपल्या मनात वेगळेच स्थान आहे. त्या जाहिरातींसोबत त्यांचे जिंगल्स सुद्धा प्रत्येकाच्या तोंडपाठ होते. त्याच जाहिरातींमधील एक जाहिरात तुम्हांला आठवत असेल. तो कुरळ्या केसवाला मुलगा. ‘ओ हो हो स्कुल टाईम, ऍक्शनचा स्कुल टाईम, क्लासवर्क, होमवर्क, पनिशमेंट अँड लेक्चर. गुड …गुड मॉर्निग टीचर.’ हे गाणं ऐकूनच तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. बालपणी आपण टीव्हीवरील ज्या जाहिरातींना बघून ऐकून मोठे झालो, त्यातलीच एक जाहिरात म्हणजे ‘अकॅशन का स्कूल टाईम’ ची जाहिरात. ९० च्या शतकातील प्रत्येक जण हि जाहिरात गुणगुणला असेल. तो कुरळ्या केसाचा मुलगा आपल्याला जाहिरातीत त्याचे चकचकणारे शूज दाखवायचा आणि आपण आई बाबां पाशी हट्ट करून तेच शूज मागायचो.

बालपणीचे ते दिवस आणि वेळ निघून गेली आणि आपण सगळेजणच आपल्या जीवनात पुढे गेलो. तो कुरळ्या केसाचा मुलगा सुद्धा मोठा झाला. असे कळले की, तो आपल्या जीवनात खूपच पुढे गेला आहे. टीव्ही जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या त्या मुलाचे नाव आहे तेजन दिवानजी. तेजनने त्या वेळेत फक्त ‘स्कुल टाईम शूज ‘ चीच जाहिरात केली नव्हती, तर तो ‘मॅगी ‘ आणि ‘बॅन्डेड’ च्या जाहिरातीत सुद्धा दिसला. हेच नाही तर तो ‘पहिला नशा’ च्या रीमिक्स वर्जन मध्ये दिसला. परंतु आपल्याला माहिती आहे का? तेजन आत्ता कुठे आहे आणि काय आहे ? एकदा जाहिराती आणि अल्बम मध्ये दिसलेले बरेचसे बालकलाकार पुढे टीव्ही इंडस्ट्री मध्ये येतात. परंतु तेजन पूर्णतः इंडस्ट्री पासून वेगळ्या अश्या प्रोफेशन मध्ये काम करत आहे.तेजन दिवानजी आत्ता एमडी झाले आहेत. तो आता कॅन्सरवर उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या रेडिएशन उपचारांचा तज्ज्ञ आहे. तो रेडिएशन ऑन्कोलॉजीचे स्पेशालिस्ट आणि कॅन्सरवर ईलाज करतो. तेजनने २००८ साली नॉर्थ कैरोलीन युनिव्हर्सिटीतून बायोमेडिकल इंजिनीअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्याने डॉक्टर ऑफ मेडिसिन च्या शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ मॅरिलँड स्कुल ऑफ मेडिसीन जॉईंट केले. साल २०१३ मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसीनचा शिक्षण पूर्ण करून डॉक्टर तेजनने एक वर्ष बाल्टीमोर, मेरिलॅन्डची मेडस्टर युनियन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅन्ड मेडिकल सेंटर मधून आपली रेजिडेंसी कंप्लिट केली. त्याच वर्षी २०१८ मध्ये डॉ. तेजन दिवानजीने फॅकल्टी शिवाय युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मध्ये रुजू झाला. आत्ता तो सिल्वेस्टर कंप्रिहेन्सीव कॅन्सर सेंटर मध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. डॉ. तेजन मेरिलॅन्ड मधेच राहतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *