NMJOKE

फ्लिपकार्ट च्या पहिले ग्राहकाने पहा काय विकत घेतले होते

ऑनलाइन शॉपिंग आजच्या काळाची गरज झाली आहे. सध्या बाजारात खूप साऱ्या वेबसाईटवरून लाखो ग्राहक वेगवेगळ्या प्रकारचे सामान खरेदी करतात. पण हि गोष्ट 12 वर्षा पूर्वीची, सन 2007 ची आहे. ऑक्टोबरचा महिना होता, त्यावेळी ऑनलाइन शॉपिंग एक कोडं होतं. मेहबूब नगरच्या विविके चंद्रा एका पुस्तकाच्या शोधात होते आणि फ्लिपकार्टला त्यांचा पहिला ग्राहक मिळणार होता. चंद्राला वाचण्याचा – लिहिण्याचा खूप छंद होता, ते तेव्हा फ्रिलांस वेब कन्सल्टन्ट म्हणून काम करीत होते. विविके जॉन वुडचा पुस्तक ‘लिविंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज था वर्ल्ड’ हे पुस्तक त्यांना वाचायचे होते. हैदराबादमध्ये बऱ्याच दुकानात हे पुस्तक शोधले पण त्यांना कोणत्याच दुकानात ते सापडले नाही. विविके तेव्हा ब्लॉग लिहायचे. तेव्हा त्यांनी हे पुस्तक खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने ‘फ्लिपकार्ट’ ची लिंक पाठवली.

विविके चंद्राने लिंकवर क्लिक केले. तर ते पुस्तक वेबसाइटवर विकण्यासाठी उपलब्ध होते. तेव्हा त्यांना कळले कि, ह्या वेबसाइटवर पुस्तके विकतात आणि देशातील खूप जागी यांची पोहोचवण्याची सोय आहे. विविकेने असे पहिलेही नव्हते किंवा ऐकलेही नव्हते. पुस्तक कुठे मिळत नव्हते. अशावेळी एक प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही, वेबसाइटवर पुस्तकाची किंमत 500 रुपये होती. विविके चंद्रा ना पुस्तक खरेदी करायचे होते, पण ऑनलाइन शॉपिंग विषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्न येत होते. त्यांने नंतर ठरवले की पुस्तक घ्यायची रिस्क घेऊन बघायला हरकत नाही आणि त्यांनी 500 रुपये किमतीचे पुस्तक मागवायचे ठरवले. त्यांनी ऑर्डर दिली आणि पुस्तक मागवली, पण पुस्तक येण्यासाठी बरीच वाट पहावी लागली. कारण फ्लिपकार्ट जवळ पुस्तक शिल्लक नव्हती. अन फ्लिपकार्टचे कोफाऊंडर सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांना आपल्या पहिल्याच ग्राहकाला निराश करणे योग्य वाटले नाही.खूप शोधल्यानंतर बंगळूरच्या एका पुस्तकाच्या दुकानात सापडल पुस्तक. फ्लिपकार्ट कडून विविके चंद्राला ईमेल केले, त्यात लिहिले होते पुस्तक पाठवायला उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व. बिन्नी बंसल पुस्तक खरेदी करायला बागळूरला गेले तेव्हा खूप पाऊस पडत होता. जागोजागी रस्त्यावर पाणी साठले होते. त्यातून मार्ग काढत बिन्नी बंसल पुस्तकाच्या दुकानात पोहोचले. जेव्हा ते दुकानात पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांचा पाकीट विसरून आलेत. बिन्नीने आपल्या मित्रा कडून पैसे उसने घेतले आणि दुकानातून पुस्तक विकत घेतले. शेवटी ३१ ऑक्टोबर २००७ ला बिन्नी बन्सल ह्यांनी विवेक चंद्राला दिलेल्या पत्त्यावर पुस्तक पाठवले. विवेकला हे पुस्तक दोन दिवसानंतर मिळाले. अश्याप्रकारे विवेक चंद्रा फ्लिपकार्टचे पहिले ग्राहक बनले आणि त्यानंतर कंपनीने यशाचे शिकार पार करून इतिहास बनवला.
Exit mobile version