NMJOKE

काजोलची बहीण पहा किती सुंदर दिसते, मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे

तनुजाची मुलगी आणि अजय देवगणची पत्नी काजोलला संपूर्ण बॉलिवूड ओळखतो. काजोलने आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. सध्या जरी ती खूपच कमी चित्रपटांतून दिसत असली तरी तिची लोकप्रियता अजूनही कायम आहे. प्रेक्षक तिला अजूनही ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटासाठी लक्षात ठेवतात. काजोलने अनेक हिट चित्रपट दिले आहेत त्यामुळे ती सर्वांच्याच परिचयाची आहे. परंतु तुमच्यापैकी काही जणांना काजोलच्या बहिणीबद्दल माहिती नसेल. तिनेही काही बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. सोबत तिने एका मराठी चित्रपटात सुद्धा काम केलेले आहे. त्याच प्रमाणे एका अभिनेत्यासोबत तिचे अफेअर सुद्धा होते. आज आपण आजच्या लेखात काजोलच्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत.

काजोलच्या बहिणीचे नाव तनिषा मुखर्जी आहे. तिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त मराठी, तामिळ आणि तेलगू चित्रपटांत सुद्धा काम केलेले आहे. तनिषाचा जन्म १ जानेवारी १९७८ ला मुंबई मध्ये झाला. ती एका फिल्मी परिवारातून आलेली आहे. ती स्वर्गीय निर्माता निर्देशक सोमू मुखर्जी दिग्गज आणि अभिनेत्री तनुजा ह्यांची मुलगी आहे. तिची बहीण काजोल लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती स्वर्गीय अभिनेत्री नूतन ह्यांची भाची आहे. तनिषाने आपल्या करिअरची सुरुवात चॅनेल वी साठी विडिओ जॉकी म्हणून केली होती. ‘शुह्ह्ह कोई है’ ह्या चित्रपटांतून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. ह्या चित्रपटांत ती दिनो मोरिया सोबत दिसून आली. नंतरच्या काळात तिने ‘पोपकोर्न खाओ मस्त हो जाओ’ (२००४), ‘टॅंगो चार्ली’ (२००५) आणि अमिताभ बच्चन ह्यांच्यासोबत ‘सरकार’ (२००५) ह्या चित्रपटांत काम केले. परंतु तिला यशाची पायरी चढता आली नाही. तनिषाने इतर बॉलिवूड चित्रपटांत अभिनय केला, ज्यात ‘एक दोन तीन’ (२००८), ‘तुम मिलो तो सही’, ‘सरकार राज’ आणि ‘सावधान’ (२०११) ह्यासारखे चित्रपट समाविष्ट आहेत.तनिषाने फक्त बॉलिवूड चित्रपटांतच अभिनय केला नाही तर काही मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ चित्रपटातही काम केले आहे. तिने २००७ मध्ये ‘अनननेल अननले’ ह्या तामिळ चित्रपटात काम केले आहे, ह्या साठी तिला ‘सर्वोत्तम पर्दापण अभिनेत्री’च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने तेलगूत ‘कांतरी’ आणि बंगालीत ‘मुक्ति हसी’ हे चित्रपट केले आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अंतर’ ह्या मराठी चित्रपटात तिने काम केले आहे. ह्या चित्रपटात सुमित राघवन ह्याची मुख्य भूमिका होती. तिला सर्वात जास्त कोणत्या चित्रपटासाठी लक्षात ठेवले जाते ते म्हणजे उदय चोप्रा सोबत आलेला चित्रपट ‘निल अँड निक्की’. हा चित्रपट जरी फ्लॉप ठरला तरी तिचा ग्लॅमरस लूकची खूपच चर्चा झाली होती. चित्रपटांव्यतिरिक्त तिने लोकप्रिय हिंदी रिऍलिटी शो ‘बिग बॉस’ च्या सातव्या सीजन मध्ये भाग घेतला होता. ह्या शो मध्ये ती रनरअप ठरली होती. ह्या शो दरम्यानच तिचे बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली सोबत चांगले ट्युनिंग जमले. त्यांच्यात जवळीकता निर्माण होऊन प्रेम झाले होते. अरमान कोहलीने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. तरी लोकं त्याला मल्टीस्टारर ‘जानी दुश्मन’ ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी लक्षात ठेवतात.ह्या दोघांच्याही अफेअर्सच्या चर्चा मीडियामध्ये खूप रंगल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर अरमान कोहलीने २०१५ मध्ये ‘निरू रंधावा’ हिच्यासोबत लग्न केले. बिग बॉस व्यतिरिक्त ‘खतरों के खिलाडी’, ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’, ‘एंटरटेनमेंट कि रात’ ह्यासारख्या रिऍलिटी शो मध्ये ती दिसून आली आहे. तनिषाचे सध्याचे वय ४१ असून ती अजून अविवाहित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही महिन्याअगोदरच तिने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस बनवले आहे. येत्या काही काळात तिने प्रोड्युस केलेले चित्रपट पडद्यावर दिसतील. एकीकडे काजोल विवाहित आणि दोन मुलांची आई असूनदेखील बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तर दुसरीकडे तनिषा अजूनही चित्रपटातील आपल्या मोठ्या ब्रेकसाठी वाट पाहत आहे.
Exit mobile version