Home / कलाकार / रेखा अक्षयच्या जवळ येत असताना चिडली होती रविना, पहा काय केले नंतर

रेखा अक्षयच्या जवळ येत असताना चिडली होती रविना, पहा काय केले नंतर

बॉलिवूडमध्ये कधी प्रेम आणि कधी ब्रेकअप होईल काही सांगता येत नाही. बॉलिवूडचे असे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतील. आज आम्ही तुम्हांला त्यापैकीच एक किस्सा सांगणार आहोत. १९९४ मध्ये ‘मोहरा’ सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमार आणि रविना टंडन ह्यांच्या अफेअर्सच्या खूप चर्चा होत होत्या. ह्या दोघांच्या नात्यात तेव्हा दरार आली जेव्हा अक्षय कुमारचे नाव रेखा सोबत जोडले गेले. हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अक्षय कुमार ‘खिलाडीयों का खिलाडी’ चित्रपटाची शूटिंग करत होता. ह्या चित्रपटात रेखा आणि अक्षय कुमार शिवाय रविना सुद्धा मुख्य भूमिकेत होती. रविना, अक्षय सोबत खुश होती आणि सर्व चांगले चालू होते.

परंतु तिला हे माहिती नव्हते कि अक्षय तिच्यासोबत सिरिअस रिलेशनमध्ये असून सुद्धा रेखा सोबत चित्रपटात मोकळेपणाने इंटिमेट दृश्ये देणार. ह्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अक्षय आणि रेखा एकमेकांच्या खूप जवळ आले. एका वेबसाईटच्या मते, अक्षयसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी रेखा आपल्या घरातून जेवण आणत असे आणि अक्षयसोबतच खात असे. रेखाची हि गोष्ट रवीनला आवडली नाही. जेव्हा हे प्रमाणाच्या वर जाऊ लागले तेव्हा तिने रेखाला ताकीद दिली. ज्याचा उल्लेख तिने एका मुलाखतीत सुद्धा केला होता. रेडीफला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने सांगितले होते कि, ‘अक्षय कधी रेखाच्या मागे लागला नाही आणि तो फक्त चित्रपटामुळे तिला सहन करत होता. ती त्याच्यासाठी घरातून जेवणाचा डब्बा आणायची.’सिने बिल्ट्झ ला दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने सांगितले होते कि, ‘जेव्हा कोणत्या अभिनेत्रीला माहिती आहे कि आम्ही दोघे सोबत आहोत तर ती अक्षय सोबत इतकी जवळीकता का वाढवत आहे. मी तिला मर्यादेत राहायला सांगू शकते, परंतु माझ्या मते अक्षयला माहिती आहे कि तिला कसे हॅण्डल करायचे आहे.’ शेवटी चित्रपटानंतर रेखा आणि अक्षय एकमेकांपासून दूर झाले. पण जेव्हा अक्षयच्या जीवनात शिल्पा शेट्टी आली तेव्हासुद्धा रविनाला खूप समस्या आल्या होत्या. बातमी आली होती कि अक्षय शिल्पा शेट्टी साठी रविनाला धोखा देत आहे. खरंतर अक्षयचे नाते रविना, शिल्पा आणि रेखा सोबत जास्त वेळ राहिले नाही.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.