पहा सलमान ची पहिली गर्लफ्रेंड, इतक्या कमी वयात झाले होते प्रेम

सलमान हा बॉलिवूडचा सर्वात हँडसम सुपरस्टार आहे. बॉलिवूडमध्ये नुसत्या त्याच्या नावावर चित्रपट चालतात. त्याचे कारोंडो फिमेल चाहते आहेत. परंतु त्याच्या करिअरमध्ये एकच प्रश्न सर्वात जास्त वेळा विचारला गेला आहे कि, भाईजान तुम्ही लग्न कधी करणार आहात. होय आम्ही सलमान खान बद्दल बोलतोय. सलमान खानचे आता ५० पेक्षा जास्त वय झाले आहे. तरी अजूनपर्यंत त्याने लग्न केलेले नाहीए. त्याचे लग्न म्हणजे एक सर्वात जास्त चर्चेत असलेला प्रश्न आहे. परंतु तुम्ही हे जाणून थक्क व्हाल कि १९ व्या वर्षीच सलमान खान इतक्या सिरिअस रिलेशनशिप मध्ये होता कि तो लग्न करणार होता. आम्ही संगीता बिजलानी बद्दल बोलत नाही आहोत किंवा नाही सौमी अलीची गोष्ट इथे होत आहे. त्याचे हे पहिले रिलेशनशिप होते. आणि आजच्या लेखात आम्ही तुम्हांला हेच सांगणार आहोत कि केव्हा सलमान खानला हि मुलगी भेटली, का तो ह्या मुलीसोबत इतका सिरिअस झाला होता, आणि कसे ह्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आली.

हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा सलमान खान १९ वर्षाचा होता. ह्या वयामध्ये सलमान खान आपल्या लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारमध्ये तासनतास मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजच्या बाहेर कोणाचीतरी वाट पाहत उभा असायचा. सलमान खान कॉलेजच्या बाहेर ज्या मुलीची वाट पाहायचा त्या मुलीचे नाव होते शाहीन जाफ्री. तुम्हांला सांगू इच्छितो कि शाहीन जाफ्री हि दिग्गज अभिनेते शहीद जाफ्रीची भाची आहे सोबतच ‘कबीर सिंग’ फेम अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि सलमान खान वयाच्या १९ व्या वर्षी शाहीन जाफ्रीच्या प्रेमात वेडा झाला होता. तो तिच्या प्रेमात इतका बुडाला होता कि तो तासनतास तिच्यासोबत घालवायचा आणि तिची वाट पाहत बसायचा. इतकंच काय, सलमान खानने शाहिनला आपल्या परिवारासोबत सुद्धा भेटवलं होतं आणि सलमानचे वडील सलीम खान ह्यांनी सुद्धा ह्या नात्याला स्वीकारले होते. सोबतच शाहीनचे कुटुंब सुद्धा ह्या नात्यामुळे खुश होते. सलमान शाहीनला कॉलेजला घ्यायला यायचा, दोघेही एकत्र व्यायाम करायचे, दोघेही एकमेकांसोबत एकमेकांच्या घरी वेळ घालवायचे, दोघांच्या कुटुंबियांना सुद्धा ह्या नात्यापासून कोणताच प्रॉब्लेम नव्हता. ते मनापासून एकमेकांचे झाले होते आणि त्यांच्या लग्नाची चर्चा सुद्धा होत होती. परंतु ते वयाने छोटे असल्यामुळे दोघांचे कुटुंब त्यांच्या मॅच्युर व्हायची वाट पाहत होते.ह्याअगोदर कि २१ वर्षाचा होऊन सलमान शाहीनसोबत लग्न करेल, ह्या लव्हस्टोरीमध्ये एक वळण आले. हे वळण आले १९८० ची मिस वर्ल्ड संगीता बिजलानीमुळे. होय, सीरॉक हेल्थ क्लब जिथे सलमान आणि शाहीन एकत्र जात असत, तिथेच संगीता बिजलानी सुद्धा येऊ लागली. आणि त्यावेळी संगीता बिजलानी आपल्या आयुष्याचा खूप कठीण प्रसंगातून जात होती. कारण तिचे ब्रेकअप झाले होते बॉयफ्रेंड बिंजू अली सोबत. त्यामुळे संगीत बिजलानीचे हृदय तुटले होते. हीच ती वेळ होती जेव्हा सलमान खान हळूहळू संगीता बिजलानीसोबत काळजीपोटी बोलायचा. परंतु जेव्हा सलमान संगीतासोबत बोलायचा तेव्हा तो हळूहळू तिच्यादिशेने आकर्षित होत गेला. कारण संगीता त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती, ती मॅच्युर गोष्टी करायची त्यामुळे सलमानला तिच्यासोबत बोलायला खूप आवडू लागले होते. सलमान आता संगीतासोबत जास्त वेळ घालवायला लागला होता. तो फक्त हेल्थ क्लबच नाही तर त्याच्या बाहेर सुद्धा दोघे अनेकदा भेटत होते. ह्याच कारणामुळे शाहीनने हळूहळू सलमानपासून दूर जायला सुरुवात केली. जेव्हा शाहीनने अनेकवेळा सलमानला संगीतापासून दूर राहायला सांगितले होते तरीसुद्धा सलमानने तिचे ऐकले नाही तेव्हा शेवटी एकदाचे शाहीनने ठरवले कि ती आता सलमानच्या आयुष्यापासून नेहमीसाठी लांब जाणार.शाहीनने सलमानला सोडले. तिने आपल्या करिअरवर लक्ष दिले आणि कॅटे पॅसेफिक एअरलाईन्स जॉईन केली. ह्यानंतर सलमान आणि संगीता बिजलानी एकमेकांच्या खूप जवळ आले. जिथे सलमान खान संगीताची मॅच्युरिटी पाहून खूप जास्त आकर्षित झाला होता तर दुसरीकडे सलमानच्या आजूबाजूचे फिल्मी माहोल पाहून त्याचा संगीतावर खूप प्रभाव पडत होता. दोघांची केमिस्ट्री खूप चांगली झाली होती आणि शाहीन ह्या दोघांमध्ये एक हरवलेली कथा बनून राहिली होती. खरंतर अनेकवर्षांनंतर सुद्धा सलमानने शाहीनसोबत मैत्री तोडली नाही. ते आजसुद्धा चांगले मित्र आहेत. असं सांगितलं जातं कि कियारा अडवाणी जी शाहीनच्या बहिणीची मुलगी आहे, तिला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी सलमान खानने खूप मदत केली. हि गोष्ट कियाराने स्वतः अनेकदा मुलाखतीत सांगितली आहे. खरंतर कियाराचे लहानपणीचे नाव होते आलीया. परंतु बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर तिने आपले नाव आलियावरून कियारा केले. आणि तिला हे नाव सलमान खाननेच दिले. तर अश्याप्रकारे आजच्या लेखात सलमानची पहिली लव्हस्टोरी जाणून घेतली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *