पद्मावत चित्रपटामधून विकी कौशल ला दीपिका ने का बाहेर काढले

दीपिका पादुकोन बॉलिवूडची सर्वात आकर्षक अभिनेत्री आहे, बॉलिवूडचा आघाडीचा सुपरस्टार तिचा नवरा आहे आणि तिने बॉलिवूडमध्ये शाहरुख खान सोबत पर्दापण केले होते. आजच्या घडीला दीपिका पादुकोन बॉलिवूडची सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री आहे. खरंतर आताच्या काळात तिला एक चित्रपट करण्यासाठी चित्रपटाच्या हिरोपेक्षा सुद्धा जास्त पैसे मिळतात. जसे कि ‘पद्मावत’ चित्रपट. ह्याच चित्रपटाने दीपिका पादुकोनला नंबर एकच्या सिंहासनावर बसवलं आहे. खरंतर तुम्ही अश्या स्थानी येतात तेव्हा तुमचे वेगळे कायदे असतात. दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्सना तुमचे म्हणणे मानावेच लागते. कारण तुम्ही तेव्हा अव्वल स्थानावर असतात. दीपिका पादुकोनने आपल्या ह्याच नंबर एकच्या स्थानाचा वापर करून एकदा एका खूपच चांगल्या अभिनेत्याला चित्रपटातून काढले होते. आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि केव्हा दीपिकाला हा चित्रपट ऑफर झाला होता, का तिने त्याला ह्या चित्रपटातून काढले होते आणि कसे त्या अभिनेत्याने दीपिकाला चुकीचे ठरवले.

गोष्ट २०१५-१६ च्या दरम्यानची आहे, जेव्हा संजय लीला भन्साळी आपला ‘पद्मावत’ चित्रपटाच्या कास्टिंगसाठी प्लॅनिंग करत होते. चित्रपटासाठी त्यांनी रणवीर आणि दीपिकाला फायनल केले होते. कारण ह्या दोघांसोबत त्यांनी ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ सारख्या चित्रपटांत काम केले होते. ह्यामुळे दीपिका आणि रणवीर सिंग हे दोघेही संजय लीला भन्साळीचे फेव्हरेट होते. दीपिकाला चित्रपटांत अभिनेत्रीचा रोल मिळाला होता तर दुसरीकडे रणवीर सिंग नकारात्मक भूमिकेत होता तो रोल म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. ह्याव्यतिरिक्त चित्रपटात एक अजून रोल होता. तो रोल म्हणजे राजा रतनसिंगचा. ह्या रोलसाठी संजय लीला भन्साळीला एक नवीन कलाकार खूप जास्त आवडला होता. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विकी कौशल होता. विकी कौशलला संजय लीला भन्साळीने २०१५ ला त्याच्या ‘मसान’ चित्रपटात पाहिले होते. ह्या चित्रपटात विकी कौशलचा अभिनय त्यांना खूपच आवडला होता. त्यामुळे संजय लीला भन्साळींनी ह्या रोलसाठी विकी कौशलला विचारले. विकी कौशलला सुद्धा जेव्हा संजय लीला भन्साळीचा ह्या रोलसाठी फोन आला तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. ह्या रोलसाठी विकी कौशल संजय लीला भन्साळी ह्यांना भेटायला गेला. त्याने राजा रतनसिंगच्या रोलसाठी ऑडिशन सुद्धा दिले.विकी कौशलने जवळ जवळ हे स्वप्न पाहिलेच होते कि कसे त्याला बॉलिवूडमध्ये येताच संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात काम मिळाले. कारण असे सांगितले जाते कि ज्यांना संजय लीला भन्साळीच्या चित्रपटांत रोल मिळतात ते टॉपवर येतात. दीपिका पादुकोनला जेव्हा हि गोष्ट माहिती झाली तेव्हा तिने संजय लीला भन्साळीसमोर विकी कौशलला चित्रपटांत न घेण्याची अट ठेवली. दीपिकाने सांगितले कि जर विकी कौशलला ह्या रोलसाठी चित्रपटांत घेणार असाल तर ती चित्रपटांत काम करणार नाही. कारण चित्रपटात राजा रतनसिंगसोबत दीपिका पादुकोनचे खूप रोमँटिक सीन होणार होते. ह्यामुळे दीपिकाला वाटत होते कि ह्या रोलसाठी कोणी ए लिस्टर लोकप्रिय अभिनेत्यालाच घ्यायला हवे. विकी कौशल त्यावेळी ए लिस्टर अभिनेता नव्हता, कारण त्यावेळी त्याचा ‘मसान’ हा एकच चित्रपट रिलीज झाला होता. हेच कारण होते कि दीपिकाचे ऐकून संजय लीला भन्साळीला विकी कौशलला ह्या चित्रपटात घेण्याचा विचार सोडून द्यावा लागला. खरंतर आश्चर्याची गोष्ट अशी आहे कि, जेव्हा दीपिकाने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते तेव्हा तिने ए लिस्टर अभिनेता शाहरुख खान सोबत एंट्री केली होती. तेव्हा जर शाहरुख खान ‘ओम शांती ओम’ साठी फराह खानला असं बोलला असता कि माझ्यासोबत सुद्धा कोणी ए लिस्टर अभिनेत्रीला घ्या, तर कदाचित दीपिका पादुकोनची अश्या प्रकारे बॉलिवूडमध्ये ग्रँड एंट्री झाली नसती.खरंतर ‘पद्मावत’मध्ये काम न केल्यामुळे विकी कौशलसाठी चांगलेच झाले. कारण जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा दीपिका आणि रणवीरचे कॅरॅक्टर इतके मजबूत होते कि त्यांनी शाहिद कपूरच्या कॅरॅक्टरला झाकले होते. आणि चित्रपटाचे सर्व क्रेडिट दीपिका आणि रणवीरच्या वाट्याला गेले. तर दुसरीकडे विकी कौशलची गोष्ट कराल तर त्याच्यासाठी ह्या चित्रपटात काम न करणे खूप चांगले राहिले. कारण ह्यादरम्यान त्याने खूप दमदार भूमिका केल्या. जसे कि ‘संजू’ चित्रपटात कमलीचा रोल, ‘राजी’, ‘उरी’, ‘ल स्ट स्टोरीज’ ह्या सर्व चित्रपटांत विकी कौशलच्या कामाचे खूप कौतुक झाले. ह्या सर्व चित्रपटानंतर दीपिकाने सुद्धा विकी कौशलच्या टॅलेंटला मानले. आणि त्याच्यासोबत नंतर तिने ‘गोआयबीबो’ ची जाहिरात केली. तर अश्याप्रकारे विकी कौशलने ए लिस्टर बनून आपल्या टॅलेंटने दीपिकाला दिले उत्तर. आणि शेवटी दीपिकाला सुद्धा त्याच्यासोबत काम करावेच लागले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *