जॉनी लिव्हर ची मुलगी पहा किती सुंदर आहे, मुलाची बॉडी तर कमालच

जॉनी लिव्हरला आपण सगळे कॉमेडीसाठी ओळखतो. जॉनी लिव्हर बॉलिवूडमध्ये कॉमेडी किंग म्हणून लोकप्रिय आहे. १९८४ मध्ये त्याने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली होती. त्याने जवळजवळ ३०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. त्याला तब्बल १३ वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्या अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. परंतु आता बॉलिवूडच्या चित्रपटांत लवकरच अजून एका स्टारचा मुलगा दिसणार आहे. होय, लोकप्रिय अभिनेता जॉनी लिव्हरचा मुलगा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यास सज्ज झाला आहे. सोशिअल मीडियावर त्याचे फोटोज खूप वायरल होत आहे ज्यात तो शर्ट लेस होऊन सिक्स पॅक्स ऍब्ज दाखवताना दिसत आहे. पण तुम्ही कधी त्याच्या मुलाला पाहिले आहे का, तो सध्या काय करतो तर चला जाणून घेऊया.

जॉनी लिव्हरच्या मुलाचे नाव जेसी आहे. तो एक चांगला संगीतकार सुद्धा आहे. जरी त्याने बॉलिवूड चित्रपटांत छोट्या भूमिका केल्या असल्या तर. सूत्रांच्या माहितीनुसार तो मुख्य भूमिकेसाठी लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. तो एका चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे कारण त्याची एंट्री धमाकेदार असेल. जेव्हा जेसी १२ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या गळ्याला ट्युमर होता. पुढे जाऊन ते कॅन्सरमध्ये बदलले. अनके वर्ष परदेशात त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याला बरे वाटले. आजारातून बाहेर आल्यानंतर त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर लंडनमध्ये ह्युमन रिसोर्सेस मध्ये डिग्री पूर्ण केली. आपल्या वडिलांप्रमाणे तो एक चांगला अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट आहे. तो आपल्या लुक्स मुळे सोशिअल मीडियावर खूप जास्त चर्चेत असतो. त्याला ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटासाठी ओळखले जाते. ह्या चित्रपटांत त्याने जॉनी लिव्हरच्याच म्हणजे आपल्या वडिलांच्याच मुलाची भूमिका केली होती. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार तो स्वतःला फिट ठेवण्यासाठी अलीकडील काही दिवसांत जिम मध्ये खूप मेहनत घेत आहे. त्याला चित्रपटाच्या ऑफर्स सुद्धा येणे चालू झाले आहे. परंतु तो एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. त्याने आताच आलेल्या ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘वॉर’ चित्रपटांत छोटीशी भूमिका निभावली होती. त्याच बरोबर त्याने सैफच्या ‘लाल कप्तान’ चित्रपटांत काम केले आहे. येणाऱ्या काळात त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होतील.जॉनी लिव्हरच्या मुलीचे नाव आहे जॅमी लिव्हर आहे. ती भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि चित्रपट कलाकार आहे. जॅमीचा जन्म १० सप्टेंबर १९८० ला मुंबई मध्ये झाला. तिने आपले प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केले नंतर तिने लंडन युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग कम्युनिकेशन मध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात स्टँडअप कॉमेडियन म्हणून केली होती. ह्याशिवाय ती सोनी टीव्हीच्या ‘कॉमेडी सर्कस के महाबली’ ह्या कॉमेडी रिऍलिटी मध्ये दिसली आहे. तिने आपल्या चित्रपट अभिनयाची सुरुवात प्रोड्युसर अब्बास मस्तान ह्यांच्या ‘किस किसको प्यार करू’ ह्या चित्रपटातून केली होती. ह्याच चित्रपटांतून कपिल शर्माने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘राष्ट्रपुत्र’ चित्रपटात काम केले आहे. ह्याव्यतिरिक्त ती आता सध्या खूप चर्चेत असलेला चित्रपट ‘हाऊसफुल ४’ चित्रपटातही काम केलेले आहे. हा चित्रपट येत्या २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *