बाबुराव म्हणजेच परेश रावल ची पत्नी आहे मिस इंडिया, एकदा पहाच

परेश रावल म्हटले कि आपल्या समोर ‘हेराफेरी’ चित्रपटातला जाड भिंगाचा चष्मा घातलेला ‘बाबू भैय्या’चा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आपल्या विनोदी भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. परेश रावल म्हणजे विनोद हे समीकरण तर आता ठरलेलेच आहे. परंतु परेश रावल हे असे अभिनेते आहेत ज्यांनी फक्त विनोदी भूमिकाच नाही तर खलनायकाच्या भूमिका सुद्धा खूप चांगल्यारीतीने निभावल्या आहेत. प्रेक्षकांनाही त्यांचा अभिनय खूप आवडला. परंतु ते खास करून आपल्या विनोदी भूमिकेसाठी जास्त ओळखले जातात. मित्रांनो, तुम्हांला परेश रावल त्यांच्या अभिनयाबद्दल तर माहितीच आहे, परंतु तुम्हांला माहिती आहे का ह्यांची पत्नी ‘मिस इंडिया’ झालेली आहे. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम सुद्धा केले आहे. त्या समाजसेविका सुद्धा आहेत. कोण आहे त्यांच्या पत्नी, त्या कश्या दिसतात, काय करतात चला तर आजच्या लेखात जाणून घेऊया.

परेश रावल ह्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप संपत आहे. ह्या एक अभिनेत्री आहेत. त्यांनी १९७९ मध्ये ‘मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला होता आणि ‘मिस इंडिया’ चा ताज आपल्या नावे केला होता. त्याच वर्षी त्यांनी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी ‘नरम गरम’ (१९८१), ‘हिम्मतवाला’ (१९८३), ‘करिष्मा’ (१९८४), ‘साथिया'(२००२), ‘सप्तपदी’ (२०१३) सारख्या चित्रपटांत काम केले आहे. १९८४ मध्ये आलेल्या ‘करिष्मा’ चित्रपटांत त्यांनी बिकनी घालून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी ‘कि अँड का’ (२०१६) चित्रपटांत करीना कपूरच्या आईची भूमिका निभावली होती. कॉमेडी टीव्ही शो ‘ये जो है जिंदगी’ साठी त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करण्यास नकार दिला होता. परंतु त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. कारण ‘ये जो है जिंदगी’ हा टीव्ही शो खूपच लोकप्रिय झाला होता.आपल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते कि, “जेव्हा मी मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती, तेव्हा लोकांना विश्वास बसत नव्हता. कारण मी अनेक वर्ष गावात एका झोपडीत राहिली आहे. इतकंच नाही जेव्हा मी चित्रपटांत काम करायची तेव्हा आरसा सुद्धा पाहत नसे. चित्रपटांत काय घालणार आहे, माझा लूक कसा असणार ह्याबद्दल मी कधीच चर्चा करत नसे.” चित्रपटसृष्टी सोडण्याबद्दल त्यांनी सांगितले होते कि, “८० च्या दशकानंतर चांगले चित्रपट बनणे बंद झाले होते. मला सुजाता आणि अनुराधा सारख्या चित्रपटांत काम करायचे होते. परंतु नंतर त्याप्रकारचे चित्रपट बनले नाहीत.” ‘हिम्मतवाला’ चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुमकुम बनवऱ्या ‘शृंगार’ कंपनीसाठी मॉडेलिंग सुद्धा केली आहे. त्या आता दिव्यांग मुलांना अभिनय शिकवतात. आताचे पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वरूप संपत ह्यांना मुलांसाठी असणाऱ्या एज्युकेशन विभागासाठी हेड म्हणून नियुक्त केले होते. शिक्षिका आणि समाजसेवा व्यतिरिक्त त्या एक चांगल्या लेखिका सुद्धा आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. परेश रावल ह्यांनी सुद्धा २०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम करून आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे आदित्य तर छोट्या मुलाचे नाव अनिरुद्ध आहे. ते पती पत्नी आणि त्यांची दोन मुले असे हे छोटेसे कुटुंब मुंबई मध्ये राहतात. आजही हे दोन्ही पती पत्नी बॉलिवूड चित्रपटांत काम करून खूप लोकप्रियता मिळवत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *