बॉलिवूड ने देखील या दहा मराठी चित्रपटांची कॉपी केली आहे, गोलमाल रिटर्न्स तर ह्या चित्रपटाची आहे कॉपी

‘सैराट’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर हा चित्रपट फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर हा संपूर्ण देशात गाजला. ‘सैराट’ हा चित्रपट नागराज मंजुळे ह्यांनी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ह्यांना घेऊन बनवला होता. ह्या चित्रपटाची कथा आणि यश पाहून करन जोहरने जान्हवी आणि इशांत ह्यांना घेऊन ह्या चित्रपटाचा बॉलिवूड ‘रिमेक’ बनवला. त्या चित्रपटाचे नाव होते ‘धडक’. मराठी चित्रपट जशाच्या तसे हिंदीत कॉपी करण्याची हि पद्धत काही नवीन नाही. ह्या अगोदरही अनेक मराठी चित्रपटांचा हिंदीमध्ये रिमेक बनवला गेला आहे. त्यातील काही लोकप्रिय चित्रपटांची नावे आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. ह्या सुपरहिट मराठी चित्रपटांचा हिंदीत रिमेक केल्यानंतर काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉपही झालेत. तर चला पाहूया, कोणती आहेत ती मराठी चित्रपटे ज्यांना हिंदीत रूपांतर केले गेले.

अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल ह्यांचा गाजलेला ‘भागमभाग’ हा चित्रपट तर लक्षात असेलच तुमच्या. हा चित्रपट २२ डिसेंबर २००६ ला रिलीज झाला होता. ह्या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. परंतु हा रीमा लागू ह्यांच्या मराठी चित्रपट ‘बिनधास्त’ चित्रपटाची कॉपी आहे. हा चित्रपट १८ जून १९९९ रोजी रिलीज झाला होता. आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर ह्यांचा ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०१५ ला रिलीज झाला होता. ह्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकर हिने खूप वजन वाढवले होते. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ह्या चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. परंतु हा चित्रपट मकरंद अनासपुरे आणि तृप्ती भोईर ह्यांचा ‘आगडबम’ चित्रपटाची कॉपी आहे. हा चित्रपट ८ ऑक्टोबर २०१० रोजी चित्रपटगृहात आला होता. सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे ह्यांचा ‘पोस्टर बॉईज’ हा चित्रपट ८ सप्टेंबर २०१७ ला आला होता. हा चित्रपट मराठी ‘पोश्टर बॉईज’ ह्या चित्रपटाचा रिमेक आहे. १ ऑगस्ट २०१४ मध्ये आलेल्या ह्या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, ह्रिषीकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव ह्यांनी काम केले होते.अक्षय कुमार, रितेश देशमुख, विद्या बालन ह्यांचा २४ ऑगस्ट २००७ ला ‘हे बेबी’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट १९८९ आलेल्या ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ ह्या चित्रपटाचा रिमेक होता. ह्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे आणि अलका कुबल ह्यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रितेश देशमुख, श्रेयस तळपदे ह्यांचा २००९ साली आलेला ‘पेईंग गेस्ट्स’ हा चित्रपट १९८८ मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सुशांत रे ह्यांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘अशी हि बनवाबनवी’ ह्या सुपरहिट मराठी चित्रपटाचा कॉपी आहे. २००१ मध्ये आलेला गोविंदाचा ‘क्योंकी मै झूठ नहीं बोलता’ हा चित्रपट १९९९ साली आलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे ह्यांच्या ‘धांगडधिंगा’ ह्या चित्रपटाचा रिमेक आहे. १९९६ मध्ये आलेला इंदर कुमार आणि आयेशा झुल्का ह्यांचा ‘मासूम’ हा चित्रपट महेश कोठारे ह्यांच्या १९९४ मध्ये आलेल्या ‘माझा छकुला’ ह्या चित्रपटाचा रिमेक आहे. २०१४ मध्ये आलेला ‘मुंबई दिल्ली मुंबई’ हा चित्रपट २०१० साली आलेल्या स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ह्यांचा ‘मुंबई पुणे मुंबई’ ह्या चित्रपटाचा रिमेक आहे. अजय देवगणचा २००४ साली आलेला ‘टारझन – द वंडर कार’ हा चित्रपट अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या १९८८ साली आलेला ‘एक गाडी बाकी अनाडी’ ह्या मराठी चित्रपटाची कॉपी आहे. २००८ मध्ये आलेला ‘गोलमाल रिटर्न्स’ हा १९८९ साली आलेला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या ‘फेकाफेकी’ चित्रपटाची कॉपी आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *