राजेश खन्नाची दुसरी मुलगी पहा किती सुंदर आहे या मोठ्या अभिनेत्यांसोबत केले आहे काम

तुम्हांला राजेश खन्ना ह्यांच्या पहिल्या मुलीचे नाव तर माहिती असेलच ट्विंकल खन्ना. ती अक्षय कुमारची पत्नीसुद्धा आहे. त्यामुळे ती अनेकांच्या परिचयाची आहे. परंतु खूपच कमी जणांना राजेश खन्ना ह्यांच्या दुसऱ्या मुलीबद्दल माहिती आहे. तुम्ही तिला चित्रपटात पाहिले सुद्धा आहे. तिचे खरे नाव रिंकल खन्ना. ट्विंकल आणि रिंकल ह्या राजेश खन्ना ह्यांच्या दोन मुलींची नावे आहेत. आज आपण आजच्या लेखात राजेश खन्ना ह्यांच्या दुसऱ्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. रिंकल खन्ना पुढे जाऊन बॉलिवूडमध्ये रिंकी खन्ना बनली. तिचा जन्म २७ जुलै १९७७ मध्ये झाला. वडील राजेश खन्ना बॉलिवूड चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार आणि आई डिम्पल कपाडिया एक उत्कृष्ट अभिनेत्री. तिची मोठी बहीण ट्विंकल खन्ना ने सुद्धा चित्रपटांत नशीब आजमावले होते.

१९९९ साली आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ ह्या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. ह्यात ती दिनो मोरिया सोबत दिसली. ह्या चित्रपटासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री’चा झी सिने पुरस्कार मिळाला होता. बॉलिवूडमध्ये पर्दापणाच्या वेळी ती केवळ २२ वर्षाची होती. तिचे मूळ नाव रिंकी होते, परंतु जेव्हा ‘मुझे कुछ केहना है’ हा चित्रपट आला तेव्हा तिचे नाव रिंकी करण्यात आले. ह्या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘जिस देश मे गंगा रेहता है’ चित्रपटात गोविंदा आणि सोनाली बेंद्रे सोबत काम केले. २००२ मध्ये तिने सलमान खानच्या ‘ये है जलवा’ चित्रपटांत सहाय्य्क अभिनेत्रीची भूमिका केली होती. २००३ मध्ये आलेल्या ‘चमेली’ चित्रपटात सुद्धा तिने साह्याय्यक अभिनेत्रीची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने तामिळ चित्रपटात काम केले. चित्रपटाचे नाव होते ‘मजुनू’. तिने काही बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटात काम केले.रिंकी खन्ना काही सुंदर गाण्यांमध्ये सुद्धा दिसली आहे. ‘मुसुमुसु हासी देओ मलाय लाय’, ‘मैने बोला केम छे’ ह्या सारख्या लोकप्रिय गाण्यांत तिने काम केले आहे. ह्याव्यतिरिक्त तिने २००२ साली ‘मँगो सफल’, २००३ साली ‘प्राण जाए पर शान ना जाए’, ‘झंकार बिट्स’ ह्यासारख्या चित्रपटात काम केले. गोविंदा, सलमान खान, दिनो मोरिया सारख्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर रिंकी खन्नाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. तिने ४ वर्ष चित्रपटसृष्टीत काम केले. त्यानंतर तिने ८ फेब्रुवारी २००३ रोजी समीर सरन नावाच्या उद्योगपतीशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. २००४ साली त्यांना मुलगी झाली तिचे नाव नाओमीका ठेवले तर २०१३ साली त्यांना मुलगा झाला. सूत्रांच्या माहितीनुसार रिंकी आपल्या कुटुंबासोबत लंडनला राहते. रिंकी खन्नाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते तेव्हा ती आई वडिलांप्रमाणे खूप लोकप्रिय होईल असे वाटले होते. परंतु तिला चित्रपटसृष्टीत जास्त यश मिळवता आले नाही. जरी तिला आपल्या आई वडिलांसारखे चित्रपटांत नाव कमावता आले नसले तरी तिने चित्रपट आणि कुटुंब ह्या दोघांमध्ये योग्य ताळमेळ साधले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *